Maharashtra Corona Update : दिलासादायक! राज्यात कोरोनाचा आलेख उतरतोय, मंगळवारी बाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक
Maharashtra corona cases : राज्यात आतापर्यंत 79,58, 170 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.10 टक्के इतकं झालं आहे.
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांचा (Corona Update) आकडा हळूहळू कमी होताना दिसत आहे. कोरोनाचा आलेख उतरणीला लागला आहे. राज्यात बरे होण्याचे प्रमाण 98.10 टक्क्यांवर आले आहे.. तर राज्यात आजही नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आज 730 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली तर 1075 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यात 1075 रुग्ण कोरोनामुक्त (Maharashtra Corona Update)
राज्यात गुरूवारी 730 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 1075 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
चार कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू (Maharashtra Corona Death)
राज्यात चार कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.82 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,58, 170 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.10 टक्के इतकं झालं आहे.
राज्यात एकूण 5513 सक्रिय रुग्ण (Maharashtra Corona Active Cases)
राज्यात एकूण 7082 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 1574 इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 1072 सक्रिय रुग्ण आहेत.
देशात 5 हजारांहून कमी रुग्णांची नोंद ( India Coronavirus Cases)
गेल्या 24 तासांत 4 हजार 369 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर एकूण कोरोना बाधितांची संख्या 4 कोटी 45 लाख 4 हजार 949 झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं (Ministry Of Health) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात सक्रिय रुग्णांची (Active Cases) संख्या 46 हजार 347 वर पोहोचली आहे. मंत्रालयानं जारी केलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 3 लाख 50 हजार 468 चाचण्या झाल्या आहेत. जर आपण कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण आकडेवारी पाहिली तर ही संख्या 5 लाख 28 हजार 185 वर पोहोचली आहे. तसेच, देशात नोंदवलेल्या एकूण आकडेवारीपैकी 4 कोटी 39 लाख 30 हजार 417 लोक कोरोनामुक्त (Recovered) झाले आहेत.