Uddhav Thackeray Vs Devendra Fadnavis : गेट वेल सून उद्धव ठाकरे विरुद्ध गेट आऊट सून फडणवीस! शाब्दिक चकमकीनंतर आता पोस्टर वाॅर सुरु
भाजपकडून Get Well Soon पोस्टर ठाकरेंचा भाग असलेल्या कलानगरच्या सिग्नलला लावण्यात आले. हे पोस्टर लावण्यात आल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाकडून त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

मुंबई : पुण्यामध्ये झालेली दिवसाढवळ्या शरद मोहोळची हत्या, उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये केलेला गोळीबार अन् त्यानंतर अभिषेक घोसाळकर यांची झालेली निर्घृण हत्या यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कायदा व सुव्यवस्था ढासळल्याने घणाघाती प्रहार सुरू केला होता. ठाकरे यांनी जनसंवाद यात्रेतून सातत्याने फडणवीस यांच्यावर तोफ डागली.
शाब्दिक चकमकीनंतर आता पोस्टर वाॅर सुरु
यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ठाकरे यांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर देतत गेट वेल सून उद्धवजी (Get Well Soon) अशी टीका केली होती. यानंतर उद्धव ठाकरे यांनी गेट आऊट सून (Get Out Soon) अशी टीका करत प्रत्युत्तर दिलं होतं. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय संघर्ष टोकाला गेला आहे. हा संघर्ष एका बाजूने सुरू असतानाच आता रस्त्यावर सुद्धा पोस्टर वाॅर सुरु झालं आहे.
मातोश्री समोरील कलानगर सिग्नलवर पोस्टर
आज (16 फेब्रुवारी) पहिल्यांदा भाजपकडून Get Well Soon पोस्टर ठाकरेंचा भाग असलेल्या कलानगरच्या सिग्नलला लावण्यात आले. हे पोस्टर लावण्यात आल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाकडून त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. आता कलानगरच्या सिग्नलवरच Get Out Soon फोडनवीस ( FO Done 20) असे पोस्टर्स लावले आहेत. शिवसेना वांद्रे पूर्व विधानसभा यांच्या वतीने हे पोस्टर्स लावण्यात आलेत.
दरम्यान, मातोश्री समोरील कलानगर सिग्नलवर उद्धव ठाकरे यांचा Get Well Soon असा बॅनर शिवानी दानी वाखरे यांनी हा बॅनर लावल्याची माहिती आहे. शिवानी वाखरे या भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकारी असल्याची माहिती आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
