एक्स्प्लोर
Advertisement
सरंजामी संज्ञा न वापरता फक्त नावाचा उल्लेख करा, सुनील केंद्रेकरांचं परिपत्रक
आदरणीय, सर यासारख्या सरंजामी संज्ञा न वापरता फक्त नावाचा उल्लेख करा, असं परिपत्रक सुनील केंद्रेकरांनी काढलं आहे.
पुणे : कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले राज्याचे कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कृषी विभागातील सर्वांसाठी परिपत्रक काढलं आहे. या परिपत्रकामध्ये त्यांनी आपल्याला माननीय, आदरणीय,सर अशी कोणतीही उपाधी लावू नका असे निर्देश दिले आहेत. त्याऐवजी फक्त नाव आणि पदाचा उल्लेख करण्याच्या सूचना केंद्रेकरांनी दिल्या आहेत.
कृषी आयुक्त सुनील केंद्रेकरांनी पत्रव्यवहारासाठी माननीय, Honourable, Sir अशा सरंजामी संज्ञा न वापरता केवळ आपलं नाव किंवा पदनामाचा उल्लेख करावा, असं परिपत्रकच जारी केलं आहे. सुनील केंद्रेकरांच्या या निर्णयाचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे.
व्हीआयपी कल्चरला लगाम घालण्यासाठी सरकारनं लाल दिव्यांच्या गाडीवर निर्बंध आणले होते 1 मे च्या कामगार दिनापासून व्हीव्हीआयपींचं लालदिव्याचं कल्चर मोडीत निघालं आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री आणि अधिकाऱ्यांचे लाल दिवे आता कायमचे बंद करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सांगली
निवडणूक
Advertisement