एक्स्प्लोर
ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचा फोन न घेतल्यानं एक डॉक्टर निलंबित तर तीन कर्मचाऱ्यांना मेमो
एकाच वेळी अनेक रुग्ण महाविद्यालयात आले त्यावेळी डॉक्टर आणि स्टाप रुग्णांची परिस्थिती हाताळत होते काहींची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांची त्यांच्यावर उपचार करताना तारांबळ सुरू होती.
यवतमाळ : महाविकास आघाडी सरकारमधली मंत्र्याचा फोन उचलला नाही म्हणून निवासी डॉक्टरवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर एका नर्सला आणि 2 वॉर्ड बॉयला मेमो देण्यात आलाय. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. फोन न घेतल्यानं एका कनिष्ठ निवासी डॉक्टरला सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. सोमवारी (3 फेब्रुवारी) संध्याकाळी 9.30 वाजता हा प्रकार घडला आहे.
वैद्यकीय पदव्युतर अभ्यासक्रमाला शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याची कनिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून अपघात कक्षात ड्युटी होती. एकाच वेळी अनेक रुग्ण महाविद्यालयात आले त्यावेळी डॉक्टर आणि स्टाप रुग्णांची परिस्थिती हाताळत होते काहींची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांची त्यांच्यावर उपचार करताना तारांबळ सुरू होती. तेवढ्यात राजकीय वशीला घेऊन आलेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकाने थेट मंत्र्यांना फोन लावला.
उपचारात व्यस्त असलेल्या स्टापला तो कॉल मिळाला नाही मात्र तेवढ्या गोंधळात राजकीय वशिला घेऊन आलेल्या व्यक्ती ने भाऊंचा फोन आहे असे सांगितले. मात्र ‘फोनपेक्षा मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णावर उपचार करणे गरजेचे असल्याने ते सर्व रुग्ण सेवेत होते. रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यातले हे संभाषण फोनवर असलेल्या भाऊने ऐकले. यानंतर कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला दुसऱ्या दिवशी थेट सहा महिने निलंबन करण्यात आल्याचे पत्रच मिळाले.
हा प्रकार पाहून या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याला जबर धक्का बसला. कुठलाही दोष नसताना हे सर्व झाल्याने इतकी मोठी शिक्षा का? असा प्रश्न त्याने आपल्या वरिष्ठांपुढे उपस्थित केला आहे. या प्रकरणी डॉक्टर समोर बोलायला तयार नाहीत. या प्रकरणानंतर घाबरून गेले असून माध्यमांसमोर प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला आहे.
Wardha Woman Ablaze | हिंगणघाट प्रकरणाचा तपास आता महिला अधिकाऱ्याकडे | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement