एक्स्प्लोर

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली असतानाही कर्ज वसुलीसाठी नोटीस, एसबीआय बँकेच्या उदगीर शाखेला पाच हजारांचा दंड

Latur: महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत 1 एप्रिल 2012 ते 30 जुन 2016 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ केलेले असतानाही, शेतकऱ्याला नोटीस पाठवून थकबाकी भरुन घेण्यास सांगणाऱ्या एसबीआय बँकेला ग्राहक मंचने चांगलाच दणका दिला आहे.

Latur: महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत 1 एप्रिल 2012 ते 30 जुन 2016 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ केलेले असतानाही, शेतकऱ्याला नोटीस पाठवून थकबाकी भरुन घेण्यास सांगणाऱ्या एसबीआय बँकेला ग्राहक मंचने चांगलाच दणका दिला आहे. बँकेला पाच हजारांचा दंड ठोकून सदर शेतकऱ्यास बेबाकी प्रमाणपत्र आणि 7/12 वरिल बोजा कमी करण्याचे आदेश दिले आहेत.

उदगीर तालुक्यातील चोंडी येथील रहिवाशी असलेले शिवाप्पा रामन्ना चिट्टे यांनी 22 मे 2013 रोजी उदगीर येथील मोंढा रोड वरील भारतीय स्टेट बँकच्या शाखेकडून, 'एटीएल कॉम्प मायनर एरिगेशन' या कामासाठी 2 लाख रुपयांचे मुदत कर्ज घेतले होते. त्यानंतर त्यांनी कर्जाची नियमीत परतफेड केली. दरम्यान,  कर्जाची परतफेड थकल्यामुळे उदगीरच्या एसबीआय बँकेकडून त्यांना 30 नोव्हेंबर 2017 कर्जाची थकबाकी 44 हजार 777 रुपये आणि त्याचे व्याज 15 हजार 432 रुपये असे एकूण 60 हजार 209 रुपयांचा भरणा करा अशी नोटीस बजावली. त्यानंतर बँकेने पैसे भरण्यासाठी 9 मे 2019 रोजी दुसरी नोटीस बजावली होती.

राज्य सरकाने 1 एप्रिल 2012 ते 30 जुन 2016 या काळात कर्ज घेतलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज 'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना' या योजने अंतर्गत माफ केले होते. त्यामुळे सदर शेतकऱ्यांनी याची कल्पना बँकेला दिली आणि बेबाकी प्रमाणपत्र आणि 7/12 वरील बोजा कमी करण्याची विनंती बँकेकडे केली होती. मात्र बँकेने याला नकार दिला. त्यामुळे शिवाप्पा चिट्टे यांनी एड. डी. आर. डाड यांच्या मार्फत जिल्हा ग्राहक मंचात तक्रार दाखल केली. याची गंभीर दखल घेत ग्राहक मंचने भारतीय स्टेट बँक, शाखा मोंढा रोड, उदगीर येथील शाखा प्रबंधकांना हजर राहण्यास सांगीतले. मात्र बँकेच्या वतीने कोणीच हजर राहिले नाही. त्यामुळे ग्राहक मंचने एकतफी निकाल दिला. ग्राहक मंचने निकाल देताना म्हटले आहे की, एसबीआय बँकेने शेतकऱ्यास थकबाबीदार म्हणून नोटीस दिलेली आहे. याचा अर्थ सदर शेतकरी बँकेचे थकबाकीदार आहेत हे निश्चत आहे. शासनाने ज्या कालावधीतील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे त्याच कालावधीत सदर शेतकरी बसतात त्यामुळे त्यांचे कर्जही शासनाने माफ केलेले आहे. असे असतानाही बँकेने त्यांना नोटीस पाठविली. तसेच, त्यांना बेबाकी प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आणि 7/12 वरिल बोजा कमी करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे बँकेने सदर शेतकऱ्यास मानसीक त्रासापोटी 3 हजार रुपये व न्यायालयीन खर्च 2 हजार रुपये असे पाच हजार रुपये 45 दिवसांच्या आत शेतकऱ्यास द्यावेत, असे आदेश दिले. सदर आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्ष रेखा जाधव आणि सदस्य रविंद्र राठोडकर यांनी दिले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई-पुणे Expresswayवर मोठा बदल! पनवेल एक्झिट उद्यापासून 6 महिन्यांसाठी बंद, पर्यायी मार्ग कोणते?
मुंबई-पुणे Expresswayवर मोठा बदल! पनवेल एक्झिट उद्यापासून 6 महिन्यांसाठी बंद, पर्यायी मार्ग कोणते?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ ट्रेडनं विदेशी गुंतवणूकदार घाबरले, भारतीय शेअर बाजारातून काढता पाय, 6 दिवसात 7342 कोटी काढून घेतले
अमेरिकेच्या टॅरिफ ट्रेडचा धसका, विदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय, भारतीय शेअर बाजारातून 7342 कोटी काढून घेतले
Mumbai Accident: मुंबईत कोस्टल रोडवर भीषण अपघात, कार दोनदा पलटली, कॉलेजमधील तरुणीचा मृत्यू
कोस्टल रोडवर हाजीअलीच्या वळणावर भीषण अपघात, कार रेलिंगवर आपटली, कॉलेजमधील तरुणीचा मृत्यू
Ladki Bahin Yojana : दीड लाख लाडक्या बहिणींची योजनेतून स्वत:हून माघार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी संख्या घटली
दीड लाख लाडक्या बहिणींकडून योजनेतून बाहेर पडण्यासाठी अर्ज, सरकारनं देखील घेतला मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uday Samant On Rajan Salvi : सामंत बंधूंचा साळवींच्या पक्ष प्रवेशाला विरोध नाही : उदय सामंतABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 10 February 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सSpecial Report : Raj Thackeray VS Ajit Pawar : राज ठाकरेंचा अटॅक, अजितदादांचा पलटवार; इंजिनाची धडक, घडाळ्याचे ठोकेTop 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 09 Feb 2025 : ABP Majha : 11PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई-पुणे Expresswayवर मोठा बदल! पनवेल एक्झिट उद्यापासून 6 महिन्यांसाठी बंद, पर्यायी मार्ग कोणते?
मुंबई-पुणे Expresswayवर मोठा बदल! पनवेल एक्झिट उद्यापासून 6 महिन्यांसाठी बंद, पर्यायी मार्ग कोणते?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ ट्रेडनं विदेशी गुंतवणूकदार घाबरले, भारतीय शेअर बाजारातून काढता पाय, 6 दिवसात 7342 कोटी काढून घेतले
अमेरिकेच्या टॅरिफ ट्रेडचा धसका, विदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय, भारतीय शेअर बाजारातून 7342 कोटी काढून घेतले
Mumbai Accident: मुंबईत कोस्टल रोडवर भीषण अपघात, कार दोनदा पलटली, कॉलेजमधील तरुणीचा मृत्यू
कोस्टल रोडवर हाजीअलीच्या वळणावर भीषण अपघात, कार रेलिंगवर आपटली, कॉलेजमधील तरुणीचा मृत्यू
Ladki Bahin Yojana : दीड लाख लाडक्या बहिणींची योजनेतून स्वत:हून माघार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी संख्या घटली
दीड लाख लाडक्या बहिणींकडून योजनेतून बाहेर पडण्यासाठी अर्ज, सरकारनं देखील घेतला मोठा निर्णय
शिरीष महाराजांनी सुसाईड नोटमध्ये कर्जाचा हिशोब मांडला, तेच 32 लाख शिंदेंनी झटक्यात फेडले!
शिरीष महाराजांनी सुसाईड नोटमध्ये कर्जाचा हिशोब मांडला, तेच 32 लाख शिंदेंनी झटक्यात फेडले!
IPO Update : पैसे तयार ठेवा, आठवड्यात  9 आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी 
गुंतवणूकदारांना कमाईची संधी, शेअर बाजारात 9 आयपीओ येणार, जाणून घ्या सविस्तर 
Rohit Sharma : कटकमध्ये रोहित शर्माची कडक बॅटिंग; एका झटक्यात दिग्गजांना मागं टाकलं, अर्धा डझन रेकॉर्डची भर
कटकमध्ये रोहित शर्माची कडक बॅटिंग; एका झटक्यात दिग्गजांना मागं टाकलं, अर्धा डझन रेकॉर्डची भर
Rohit Sharma Half Century : लेट पण थेट! हिटमॅन आला अन् सगळ्यांच तोंड केलं बंद, भावानं धावांचा पाडला पाऊस; थेट ख्रिस गेललाही टाकलं मागे
लेट पण थेट! हिटमॅन आला अन् सगळ्यांच तोंड केलं बंद, भावानं धावांचा पाडला पाऊस; थेट ख्रिस गेललाही टाकलं मागे
Embed widget