एक्स्प्लोर

Who is Brij Bhushan Sharan Singh : राज ठाकरेंना नडले, सलग 6 वेळा खासदार, कुस्तीचा छंद, कोण आहेत बृजभूषण सिंह?

Who is Brij Bhushan Sharan Singh : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करुन देशभरात चर्चेला आलेले बृजभूषण शरण सिंह हे गेल्या अनेक महिन्यांपासून वेगळ्याच वादात आहेत. भारताच्या ऑलिम्पिकपदकविजेत्या पैलवानांनी त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत.

Brijbhushan Singh  : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करुन भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह हे देशभरात चर्चेत आले होते. मात्र गेल्या 6 महिन्यांपासून बृजभूषण शरण सिंह यांच्याकडे देशभरातील महिला पैलवान विलन म्हणून पाहिलं जात आहे. ऑलिम्पिकपदक विजेती पैलवान साक्षी मलिक (Sakshi Malik), विनेश फोगट (Vinesh Phogat) यासारख्या पैलवानांनी बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. त्यासाठी दिग्गज पैलवानांनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात दिल्लीत आंदोलनही केलं होतं. मात्र आता कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी आपल्याच सहकाऱ्याला बसवून बृजभूषण शरण सिंह यांनी कुस्ती  महासंघातील आपला दबदबा दाखवून दिला आहे. या प्रकारामुळे दुखावलेल्या साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी कुस्तीला रामराम ठोकला आहे.  

भारतीय कुस्तीला ऑलिम्पिक स्पर्धेत (Olympic Games) चमकावणाऱ्या महिला पैलवान साक्षी मलिक ( Sakshi Malik Quit Wrestling) आणि विनेश फोगट (Vinesh Phogat) यांनी अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. दोन्ही कुस्तीपटूंनी कुस्तीला रामराम ठोकण्याची घोषणा केली. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याच समर्थकाची नियुक्ती झाली आहे. संजय सिंह (Sanjay Singh) हे कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले आहेत. मात्र ज्या बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करत, तब्बल 40 दिवस दिल्लीत आंदोलन करुनही, त्यांच्याच माणसाची नियुक्ती महासंघाच्या अध्यक्षपदी विराजमान होत असेल, तर कुस्तीला रामराम ठोकलेला बरा, असं म्हणत साक्षी मलिक ढसाढसा रडली. 

कोण आहेत बृजभूषण शरण सिंह ? (Who is Brij Bhushan Sharan Singh)

बृजभूषण सिंह हे भाजपचे उत्तर प्रदेशातील विद्यमान खासदार आहेत. गेल्या वर्षी जेव्हा राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार होते, त्यावेळी बृजभूषण यांनी त्यांना विरोध केला होता. उत्तर भारतीयांना मारहाण, शिवीगाळ करणाऱ्या राज ठाकरे यांनी आधी माफी मागावी, मगच अयोध्येत पाय ठेवावा, असा इशारा बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांनी दिला होता.  बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या या दौऱ्याला विरोध दर्शवण्यासाठी स्वत:च्या मतदारसंघात साधूसंत आणि समर्थकांचा मेळावा आयोजित केला. जोपर्यंत राज ठाकरे माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, असा निर्धार बृजभूषण सिंह समर्थकांनी केला होता. 

  •  बृजभूषण शरण सिंह हे भाजपचे विद्यमान खासदार आहेत. उत्तर प्रदेशातील बहराईच जिल्ह्यातील कैसरगंज लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्त्व करतात. 
  • बृजभूषण शरण सिंह हे एक-दोन वेळा नव्हे तर तब्बल 6 वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे बृजभूषण शरण सिंह यांची ताकद, लोकप्रियता याचा अंदाज येऊ शकतो. 
  • बृजभूषण शरण सिंह हे सध्या भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे तालीम, पैलवान यांच्यात त्यांची उठबस असते. 

राम मंदिर आंदोलनानंतर पहिल्यांदा खासदार

बृजभूषण शरण सिंह हे सुद्धा आंदोलनांसाठी प्रसिद्ध आहेत. 1993 मध्ये राम मंदिर आंदोलनानंतर वादग्रस्त घुमट पाडल्याप्रकरणी ज्या 40 आरोपींना  अटक झाली होती, त्यामध्ये बृजभूषण शरण सिंह यांचाही समावेश होता. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत बृजभूषण शरण सिंह मैदानात उतरले आणि पहिल्यांदाच खासदार झाले. 

विद्यार्थी आंदोलन ते संसदेत प्रवेश 

बृजभूषण शरण सिंह यांना विद्यार्थी संघटनेची पार्श्वभूमी आहे. बृजभूषण शरण सिंह यांनी 1979 मध्ये विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढली होती. त्या निवडणुकीत विजय मिळवून त्यांनी राजकीय प्रवेशाची झलक दाखवली होती. या निवडणुकीनंतर ते युवानेते म्हणून उदयास आले. 

ऊस परिषदेचे अध्यक्ष

विद्यार्थी संघटनांमध्ये काम केल्यानंतर बृजभूषण शरण सिंह यांनी 1987 मध्ये ऊस परिषदेची निवडणूक लढवली. या निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवून ऊस परिषदेचे चेअरमन झाले. 

भाजपच्या संपर्कात 

विद्यार्थी संघटना, ऊस परिषद, शेतकरी आंदोलन हे सुरु असताना बृजभूषण शरण सिंह हे 1988 मध्ये भाजपच्या संपर्कात आले. भाजपमध्ये स्थिरस्थावर झाल्यानंतर एक हिंदुत्ववादी नेता म्हणून त्यांची नवी ओळख निर्माण झाली. भाजपकडून त्यांनी पहिल्यांदा विधानपरिषद निवडणूक लढवली. मात्र त्यांचा 14 मतांनी पराभव झाला. 

मंदिर आंदोलनात सक्रिय सहभाग 

एकीकडे हिंदुत्ववादी नेता म्हणून ओळख निर्माण होत असताना, बृजभूषण शरण सिंह यांनी रामजन्मभूमी आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला होता. अयोध्येतील महंत रामचंद्र परमहंस, नृत्य गोपाल दास, हनुमान गढीचे स्वामी धर्मदास यांचा आशिर्वाद घेऊन ते मंदिर आंदोलनात उतरले होते. इथेच त्यांची लालकृष्ण आडवाणींश भेट झाली. आंदोलनातील सक्रीय सहभागानंतर बृजभूषण शरण सिंह यांना जेलमध्येही जावं लागलं. 

भाजप सोडून सपा, पुन्हा भाजपा

बृजभूषण शरण सिंह यांचे भाजपमध्ये काहीकाळ मतभेद झाले. वैयक्तिक नाराजीमुळे त्यांनी थेट भाजपला रामराम ठोकला आणि समाजवादी पक्षात (SP) प्रवेश केला. सपाकडून त्यांनी कैसरगंजमधून लोकसभेची निवडणूक लढली आणि जिंकली. मात्र सपामध्ये वैचारिक मतभेदामुळे त्यांनी पुन्हा घरवापसी करत भाजपचं कमळ हाती घेतलं. 

कुस्ती, धावणे ते घोडेस्वारी 

बृजभूषण शरण सिंह यांना व्यायामाची आवड आहे. कुस्ती, धावणे, घोडेस्वारी हा त्यांचा छंद आहे. या स्पर्धांमध्ये त्यांच्या नावे अनेक पैजा, अनेक स्पर्धा भरवल्या जातात.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार

व्हिडीओ

Mumbai congress Nagarsevak : BMC मध्ये काँग्रेसचे 24 नगरसेवक, कोणते मुद्दे घेऊन पालिकेत जाणार?
Sanjay Raut vs Navnath Ban : राऊतांची कारकीर्द काळवंडलेली,नवनाथ बन यांचा राऊतांवर हल्लाबोल
Imtiaz Jaleel Sambhajinagar डान्सबारमध्ये लोकं नोटा उधळतात, मी ते करत नाही; नोटा उधळण थांबवणार नाही
Vinayak Raut On Kalyan Dombivli : विनायक राऊत यांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती
Nandurbar Kalicharan Maharaj : राजकारणी हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखी शेपूट हलवतात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश
कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश
Eknath Shinde VIDEO : बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
Embed widget