एक्स्प्लोर

Morning Headlines 19 July: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

नितीश कुमार, ओमर अब्दुल्ला यांनी INDIA ऐवजी सुचवलेली 'ही' नावं; वाचा विरोधी पक्षांच्या बैठकीची इन्साईड स्टोरी

Opposition Alliance: भाजप विरोधी पक्षांची काल (मंगळवारी) बंगळुरूमध्ये (Bengaluru) दुसरी महाबैठक पार पडली. या बैठकीत सर्व विरोधी पक्षांच्या आघाडीचं नाव जाहीर करून विरोधी पक्षांनी लोकसभा निवडणुकीचं बिगुल फुंकलं. बंगळुरूमध्ये दोन दिवसांच्या मंथनानंतर मंगळवारी (18 जुलै) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोठी घोषणा केली आणि आमच्या आघाडीचं नाव 'भारत' (INDIA) असेल, असं जाहीर केलं. ज्याचा फुल फॉर्म 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स' (INDIA), असा असेल, असंही खर्गेंनी जाहीर केलं. काँग्रेसच्या अध्यक्षतेखाली भाजप विरोधी पक्षांची ही दुसरी बैठक बंगळुरूमध्ये पार पडली. वाचा सविस्तर 

Monsoon Session: उद्यापासून संसदेचं पावसाळी अधिवेशन, केंद्र सरकारनं आज बोलावली सर्वपक्षीय बैठक

Monsoon Session : उद्यापासून (20 जुलै) संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज (19 जुलै) केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अधिवेशनासंदर्भातील अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच हे अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली जाणार आहे. वाचा सविस्तर 

Weather Update : उत्तर भारतात मुसळधार पाऊस, अनेक भागात जनजीवन विस्कळीत; हिमाचलमध्ये 122 जणांचा मृत्यू 

Weather Update News : सध्या उत्तर भारतात (North India) मुसळधार पाऊस (Rain) कोसळत आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाल्यांना पूर आल्यानं काही भागातील नागरिकांचं स्थलांतर देखील करण्यात आलं आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार 22 जुलैपर्यंत उत्तर भारतात पावसाचा जोर कायम राहणार आहे. वाचा सविस्तर

Delhi Flood : दिल्लीत पुराचे पाणी कमी होत असताना सापांचा वाढता धोका; वनविभागाकडून हेल्पलाईन क्रमांक जारी

Delhi Flood : दिल्लीत (Delhi) पुराचे पाणी ओसरल्यानंतर आता सापांचा धोका वाढला आहे. दिल्लीचे वन आणि पर्यावरण मंत्री गोपाल राय (Gopal Rai) म्हणाले की, पुराचे पाणी ओसरल्यानंतर यमुना नदीकाठच्या घरातून साप बाहेर पडण्याच्या तक्रारी, तसेच पूर मदत छावण्यांजवळ साप आढळून आल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन वनविभागाला रॅपिड रिस्पॉन्स टीम (Rapid Response Team) स्थापन करण्यास सांगितले आहे. या टीम सर्व पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये काम करतील अशा सूचना देण्यात आल्या आहेत. याबरोबरच वनविभागाने यासाठी 1800118600 हा हेल्पलाईन क्रमांकही जारी केला आहे. वाचा सविस्तर 

सतत मोबाईल वापरण्यावरुन वडिलांनी फटकारलं; रागाच्या भरात मुलीची थेट चित्रकोट धबधब्यात उडी, VIDEO

Chitrakote Waterfall Bastar: छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) मिनी नायगारा (Niagara Falls) नावाच्या चित्रकोट धबधब्याजवळ (Chitrakote Waterfalls) एक धक्कादायक घटना घडली आहे. चित्रकोट धबधब्यात (Chitrakote Waterfall) एका मुलीनं उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच तिचा वाचवण्यात आल्यामुळे सुदैवानं मोठा अनर्थ टळला. मुलीनं एवढं टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारण समोर आलं आहे. हे कारण ऐकून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. वाचा सविस्तर 

Seema Haider : सीमा हैदर-सचिन लव्हस्टोरीत नवा ट्विस्ट! खोटी ओळख निर्माण करून घरात राहत असल्याचा घरमालकाचा दावा

Seema Haider : पाकिस्तानची सीमा हैदर (Seema Haider) आणि भारताचा सचिन मीना (Sachin Meena) यांची प्रेमकहाणी सध्या चर्चेत आहे. मात्र, सीमा हैदरवर आता पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, दीड महिना राहून पोलिसांना चकमा देणाऱ्या सीमा हैदरबाबत अनेक महत्त्वाची माहिती उघड झाली आहे. वाचा सविस्तर 

India A vs Pakistan A: टीम इंडिया आणि पाकिस्तानचा आज महामुकाबला; कधी अन् कुठे पाहाल सामना?

India A vs Pakistan A Emerging Teams Asia Cup 2023: टीम इंडिया (Team India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील शानदार सामना क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. हा सामना टीम इंडिया आणि पाकिस्तानच्या 'अ' संघामध्ये होणार आहे. हा सामना ACC मेन्स एमर्जिंग टीम्स आशिया कप 2023 स्पर्धेअंतर्गत खेळवला जाईल. वाचा सविस्तर 

Banks Nationalisation: इंदिरा गांधींचा धडक निर्णय आणि 14 खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण; बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्राचा समावेश

Banks Nationalisation: अनेक समस्या समोर घेऊन आपला देश स्वतंत्र झाला. देशात त्यावेळी गरीबी, अशिक्षितता, आर्थिक विषमता, आरोग्यविषयक समस्या अशा आणि इतर सामाजिक समस्या देशासमोर आ वासून उभ्या होत्या. अशा वेळी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. वाचा सविस्तर 

19th July In History: मंगल पांडे आणि खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचा जन्म, देशातील 14 खाजगी बँकांचे राष्ट्रीयीकरण; आज इतिहासात

19th July In History: इतिहासात 19 जुलै हा दिवस देशाच्या बँकिंग इतिहासात महत्त्वाचा मानला जातो. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 19 जुलै 1969 रोजी 14 खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले होते. या बँका बहुतांशी मोठ्या औद्योगिक घराण्यांच्या मालकीच्या होत्या. राष्ट्रीयीकरणाची दुसरी फेरी 1980 मध्ये आली, त्या अंतर्गत आणखी सात बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. वाचा सविस्तर 

Horoscope Today 19 July 2023 : मेष, कन्यासह 'या' राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे खूप खास; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 19 July 2023 : आज बुधवार हा महत्त्वाचा दिवस आहे. सिंह राशीचे लोक त्यांच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ आपल्या जोडीदारासाठी काढतील, तर कुंभ राशीच्या लोकांना नवीन वाहनाचा आनंद मिळेल. मेष ते मीन राशीसाठी कसा असेल बुधवारचा दिवस? काय सांगतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Sabha Election 2024: हायकमांडचा आदेश आल्यास नागपूरमधील विधानसभेच्या 6 सगळ्या जागा ठाकरे गटासाठी सोडू: विकास ठाकरे
हायकमांडचा आदेश आल्यास नागपूरमधील विधानसभेच्या 6 सगळ्या जागा ठाकरे गटासाठी सोडू: विकास ठाकरे
Aaditya Thackeray : बदलापूरमध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज करणारा जनरल डायर कोण? आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल
बदलापूरमध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज करणारा जनरल डायर कोण? आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल
'...तर मी स्वत: आंदोलनात उतरेन'; पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी शरद पवारांचा अल्टिमेटम
'...तर मी स्वत: आंदोलनात उतरेन'; पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी शरद पवारांचा अल्टिमेटम
Badlapur School Akshay Shinde: बदलापूरमध्ये अक्षय शिंदेच्या घरी तोडफोड, गावकऱ्यांनी कुटुंबीयांना हुसकावून लावले, घरात सापडली खेळणी
बदलापूरमध्ये अक्षय शिंदेच्या घरी तोडफोड, गावकऱ्यांनी कुटुंबीयांना हुसकावून लावले, घरात सापडली खेळणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  8 AM : 22 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 22 ऑगस्ट 2024 : ABP MajhaKabirdas Maharaj : बंजारा समाजाने जरांगे पॅटर्न स्वीकारावा - कबीरदास महाराजTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 22 ऑगस्ट 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Sabha Election 2024: हायकमांडचा आदेश आल्यास नागपूरमधील विधानसभेच्या 6 सगळ्या जागा ठाकरे गटासाठी सोडू: विकास ठाकरे
हायकमांडचा आदेश आल्यास नागपूरमधील विधानसभेच्या 6 सगळ्या जागा ठाकरे गटासाठी सोडू: विकास ठाकरे
Aaditya Thackeray : बदलापूरमध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज करणारा जनरल डायर कोण? आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल
बदलापूरमध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज करणारा जनरल डायर कोण? आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल
'...तर मी स्वत: आंदोलनात उतरेन'; पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी शरद पवारांचा अल्टिमेटम
'...तर मी स्वत: आंदोलनात उतरेन'; पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी शरद पवारांचा अल्टिमेटम
Badlapur School Akshay Shinde: बदलापूरमध्ये अक्षय शिंदेच्या घरी तोडफोड, गावकऱ्यांनी कुटुंबीयांना हुसकावून लावले, घरात सापडली खेळणी
बदलापूरमध्ये अक्षय शिंदेच्या घरी तोडफोड, गावकऱ्यांनी कुटुंबीयांना हुसकावून लावले, घरात सापडली खेळणी
OTT Release This Week : 'कल्की एडी 2898' ते 'रायन', या आठवड्यात ओटीटीवर एंटरटेन्मेंटची मेजवानी; पाहा यादी...
'कल्की एडी 2898' ते 'रायन', या आठवड्यात ओटीटीवर एंटरटेन्मेंटची मेजवानी; पाहा यादी...
चल तुला चॉकलेट देतो, चिमुकलीला आमिष दाखवून घरात नेलं, अन्...; शेजाऱ्याकडून मुलीवर अत्याचार
चल तुला चॉकलेट देतो, चिमुकलीला आमिष दाखवून घरात नेलं, अन्...; शेजाऱ्याकडून मुलीवर अत्याचार
मुंबईच्या गणेशोत्सवात वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांचा 'ग्रीन कॉरीडोर'; नेमकी संकल्पना काय?
मुंबईच्या गणेशोत्सवात वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांचा 'ग्रीन कॉरीडोर'; नेमकी संकल्पना काय?
एकनाथ खडसे नेमके कुठे? त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं कोणालाच माहित नाही, महाजनांचा टोला 
एकनाथ खडसे नेमके कुठे? त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं कोणालाच माहित नाही, महाजनांचा टोला 
Embed widget