एक्स्प्लोर

OTT Release This Week : 'कल्की एडी 2898' ते 'रायन', या आठवड्यात ओटीटीवर एंटरटेन्मेंटची मेजवानी; पाहा यादी...

OTT Release This Week : ओटीटीवर ऑगस्टच्या या आठवड्यातही (19 ते 25 ऑगस्ट) वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट, वेब सीरिज रिलीज होणार (OTT Release This Week) आहेत.

OTT Release This Week : सध्याच्या काळात मनोरंजनासाठी प्रेक्षकांसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. थिएटर आणि छोट्या पडद्यासह ओटीटीचा पर्याय प्रेक्षकांना उपलब्ध होणार आहे. ओटीटीवर ऑगस्टच्या या आठवड्यातही (19 ते 25 ऑगस्ट)   वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट, वेब सीरिज रिलीज होणार (OTT Release This Week) आहे. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेल्या 'कल्की ए़डी 2898' ते रायन असे चित्रपट रिलीज होणार आहेत. 

अँग्री यंग मॅन: द सलीम जावेद स्टोरी

बॉलिवूडमधील महान पटकथाकारांची जोडगोळी सलीम-जावेद यांच्यावर बेतलेली ही डॉक्युमेंटरी सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. प्राईम व्हिडीओवर ही डॉक्युमेंटरी रिलीज झाली आहे. सलीम खान आणि जावेद अख्तर या जोडगोळीने 1970 ते 1980 च्या दशकात हिंदी सिनेसृष्टीवर आपले अधिराज्य गाजवले. 

'जंजीर', 'शोले', 'दिवार', 'मिस्टर इंडिया' सारखे चित्रपट दिले नाहीत तर सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि सिनेमा लेखकांनाही ओळख दिली. सलीम-जावेद हे पहिले पटकथा लेखक होते ज्यांची नावे चित्रपटांच्या पोस्टरवर लिहिली गेली. हा तो काळ होता जेव्हा सलीम-जावेद चित्रपटाची पटकथा लिहिण्यासाठी मुख्य अभिनेत्यापेक्षा जास्त पैसे घेत असत. पण नंतर एके दिवशी ही हिट जोडी वेगळी झाली. हे का घडले यावर कधीच उघड चर्चा झाली नाही. या डॉक्युमेंटरी सीरिजच्या माध्यमातून सलीम-जावेद यांच्यासह त्यांचे कुटुंबीय आणि बॉलीवूडच्या दिग्गजांच्या मुलाखती यामध्ये आहेत. प्राईम व्हिडीओवर 20 ऑगस्ट रोजी ही डॉक्युमेंटरी रिलीज झाली आहे. 

टेरर ट्यूजडे: एक्‍सट्रीम  Terror Tuesday: Extreme

ही थाई-भयपट अँथॉलॉजी सीरिज आहे. 'टेरर ट्यूजडे: एक्स्ट्रीम' ची कथा लोकप्रिय रेडिओ शो 'अंगखान खलाम्पॉन्ग' (टेरर ट्यूजडे) पासून प्रेरित आहे आणि त्यात आठ भाग आहेत. हे सगळे भाग वेगवेगळे आहेत. प्रत्येक एपिसोडचे दिग्दर्शन वेगवेगळ्या दिग्गजांनी केले आहे. मानवी मनाच्या काळ्याकुट्ट कोपऱ्यांनाही हादरवून टाकण्याची या सीरिजमध्ये असल्याची चर्चा आहे. ही वेब सीरिज 20 ऑगस्टपासून OTT प्लॅटफॉर्म Netflix वर स्ट्रीम होत आहे. 

Grrr...

Grrr.. हा जून महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला मल्याळम चित्रपट आहे. हा एक सर्व्हायव्हल-कॉमेडी चित्रपट आहे ज्यात एक मद्यधुंद, हृदयभंग झालेला प्रियकर प्राणीसंग्रहालयात पोहोचतो आणि सिंहाच्या ठिकाणी उडी मारतो. प्राणिसंग्रहालयाचा एक रक्षक त्याला वाचवण्यासाठी धाडसाने उडी मारतो, पण तोही त्यात अडकतो. आता दोघेही धोक्यात आल्याने सिंहापासून वाचण्यासाठी दोघेही खटपट सुरू करतात. या चित्रपटात कुंचाको बोबन आणि सूरज वेंजारामूडू मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 20 ऑगस्ट रोजी OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. हिंदीतही हा चित्रपट पाहता येईल. 

कल्की एडी 2898  Kalki 2898 AD

जवळपास दोन महिने बॉक्स ऑफिसवर धमाल केल्यानंतर, 'कल्की 2898 एडी' आता OTT वर रिलीज होत आहे. नाग अश्विनच्या या ऑल-टाइम ब्लॉकबस्टर चित्रपटाने देशात 646.05 कोटी रुपयांचे निव्वळ कलेक्शन केले आहे. तर जगभरात 1041.92 कोटी रुपयांची कमाई केली आहे. भारतीय पौराणिक कथा आणि भविष्यातील संभाव्य घडामोडी यांच्या आधारे हा साय-फाय चित्रपट तयार केला आहे. 

या चित्रपटात प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि कमल हासन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 22 ऑगस्टपासून OTT प्लॅटफॉर्म Netflix वर स्ट्रीम होणार आहे. 

फॉलो कर  लो यार...  Follow Kar Lo Yaar

उर्फी जावेद कायम चर्चेत असते.  बिग बॉस ओटीटीपासून नेहमी अतरंगी लूकमुळे चर्चेत असते. उर्फीकडे दुर्लक्ष करता येऊ शकत नाही. पण उर्फी अशी का आहे, तिला काय साध्य करायचे आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला अनस्क्रिप्टेड रिएलिटी सीरिज 'फॉलो कर लो यार'मध्ये मिळणार आहे. यामध्ये उर्फीच्या आयुष्याशी काही निगडीत गोष्टी प्रेक्षकांसमोर येतात. या सीरिजमध्ये उर्फीचे रोजचे आयुष्य, तिचे अतरंगी ड्रेस,पापराजी, इन्फ्लूएंर्सचे जग हेदेखील यात पाहता येईल. 'फॉलो  कर लो यार' हे तुम्हाला ओटीटीवर 23 ऑगस्टपासून प्राईम व्हिडीओवर पाहता येईल. 

रायन Raayan 

गेल्या महिन्यात 26 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला सुपरस्टार धनुषचा 'रायन' चित्रपट खूप चर्चेत होता. धनुषने या तमिळ चित्रपटाचे दिग्दर्शनही केले असून त्यात तो मुख्य भूमिकेत आहे. या दमदार ॲक्शन-ड्रामाने देशातील बॉक्स ऑफिसवर 94.45 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. धनुषचा हा 50 वा चित्रपट आहे. एक सामान्य माणूस हा गुन्हेगारीच्या जगतात कसा अडकतो, याभोवती चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात एसजे सूर्या आणि प्रकाश राज यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 23 ऑगस्ट रोजी OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे.

द फ्रॉग The Frog 

कोरियनपटाच्या चाहत्यांसाठी यावेळी ओटीटीवर एक सस्पेंस थ्रिलर रिलीज होत आहे.  'द फ्रॉग' तुम्हाला जियोन यंग-हाच्या गडद आणि रहस्यमय जगात घेऊन जातो, जो जंगलात एक वेगळे मोटेल चालवतो. जसजसे पाहुणे येऊ लागले, तसतशी मालिकेतील अस्वस्थता वाढू लागते. यामध्ये गू सांग-जून आणि रहस्यमय यू सेओंग-हा यांचा समावेश आहे. मोटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं एक गुपित असतं. वाढत्या तणावामुळे विचित्र घटना घडू लागल्याने पोलीसही त्यांचा तपासात व्यस्त आहेत. ही वेब सिरीज 23 ऑगस्ट रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर स्ट्रीम होईल.

इनकमिंग Incoming 

इनकमिंग ही एक आर-रेटेड टीन कॉमेडीपट आहे. इनकमिंगची कथा ही हायस्कूलमधील चार विद्यार्थ्यांच्या अवती भवती फिरते. हे चौघेजण पहिल्यांदाच आपल्या हायस्कूलच्या पार्टीत सहभागी होणार असतात. त्यामुळे ते प्रचंड उत्साही आहेत. या चौघांच्या आयुष्यात काय घडतं? नेमकी कोणती उलथापालथ होते हे इनकमिंगमध्ये पाहता येईल. ही सीरिज तुम्हाला 'अमेरिकन पाय', 'प्रोजेक्ट एक्स', 'सुपरबॅड' सारख्या चित्रपटांची आठवण करून देऊ शकतो. इनकमिंग हा 23 ऑगस्टरपासून ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होईल. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

खेळण्याच्या वयात चहाच्या दुकानात भांडी घासली, मित्रानं हात धरल्यामुळे इंडस्ट्रीची वाट गवसली, दिग्गज अभिनेत्याला ओळखलं का?
खेळण्याच्या वयात चहाच्या दुकानात भांडी घासली, मित्रानं हात धरल्यामुळे इंडस्ट्रीची वाट गवसली, दिग्गज अभिनेत्याला ओळखलं का?
इम्तियाज जलील यांच्यावर 4 जणांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमधील 10 थरारक फोटो
इम्तियाज जलील यांच्यावर 4 जणांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमधील 10 थरारक फोटो
BMC Election 2026 Rahul Narvekar: 'उमेदवारी मागे घे, मी कुठल्या पदावर माहितीये ना, मुख्यमंत्र्यालाही मी बोलवल्यावर यावं लागतं'; राहुल नार्वेकरांवर धमकावल्याचा आरोप
'उमेदवारी मागे घे, मी कुठल्या पदावर माहितीये ना, मुख्यमंत्र्यालाही मी बोलवल्यावर यावं लागतं'; राहुल नार्वेकरांवर धमकावल्याचा आरोप
Devendra Fadnavis & Vilasrao Deshmukh Latur: मोठी बातमी : रवींद्र चव्हाणांची चूक लातूरमध्ये जाऊन सुधारली, फडणवीस म्हणाले, आमची लढाई काँग्रेसशी, पण विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर
मोठी बातमी : रवींद्र चव्हाणांची चूक लातूरमध्ये जाऊन सुधारली, फडणवीस म्हणाले, आमची लढाई काँग्रेसशी, पण विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर

व्हिडीओ

Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार
Akhil Chitre On Nitesh Rane : नितेश राणे ढोंगी आणि लोचट व्यक्ती, त्यांनी आमच्याबद्दल बोलू नये..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खेळण्याच्या वयात चहाच्या दुकानात भांडी घासली, मित्रानं हात धरल्यामुळे इंडस्ट्रीची वाट गवसली, दिग्गज अभिनेत्याला ओळखलं का?
खेळण्याच्या वयात चहाच्या दुकानात भांडी घासली, मित्रानं हात धरल्यामुळे इंडस्ट्रीची वाट गवसली, दिग्गज अभिनेत्याला ओळखलं का?
इम्तियाज जलील यांच्यावर 4 जणांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमधील 10 थरारक फोटो
इम्तियाज जलील यांच्यावर 4 जणांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमधील 10 थरारक फोटो
BMC Election 2026 Rahul Narvekar: 'उमेदवारी मागे घे, मी कुठल्या पदावर माहितीये ना, मुख्यमंत्र्यालाही मी बोलवल्यावर यावं लागतं'; राहुल नार्वेकरांवर धमकावल्याचा आरोप
'उमेदवारी मागे घे, मी कुठल्या पदावर माहितीये ना, मुख्यमंत्र्यालाही मी बोलवल्यावर यावं लागतं'; राहुल नार्वेकरांवर धमकावल्याचा आरोप
Devendra Fadnavis & Vilasrao Deshmukh Latur: मोठी बातमी : रवींद्र चव्हाणांची चूक लातूरमध्ये जाऊन सुधारली, फडणवीस म्हणाले, आमची लढाई काँग्रेसशी, पण विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर
मोठी बातमी : रवींद्र चव्हाणांची चूक लातूरमध्ये जाऊन सुधारली, फडणवीस म्हणाले, आमची लढाई काँग्रेसशी, पण विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर
भाजपची काँग्रेस-एमआयएमसोबत युती, फडणवीस म्हणाले कारवाई करणार; हर्षवर्धन सपकाळांनी करुन दाखवलं
भाजपची काँग्रेस-एमआयएमसोबत युती, फडणवीस म्हणाले कारवाई करणार; हर्षवर्धन सपकाळांनी करुन दाखवलं
Tata चा शेअर बनला रॉकेट, रेखा झुनझुनवालांची संपत्ती तब्बल 800 कोटींनी वाढली, बाजारात मोठी घडामोड  
Tata चा शेअर बनला रॉकेट, रेखा झुनझुनवालांची संपत्ती तब्बल 800 कोटींनी वाढली, बाजारात मोठी घडामोड  
Video: मोठी बातमी! इम्तियाज जलीलांच्या कारवर हल्ला, गाडीतून बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न
Video: मोठी बातमी! इम्तियाज जलीलांच्या कारवर हल्ला, गाडीतून बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न
Kolhapur Municipal Corporation Election: काँग्रेसचा जाहीरनामा हास्यास्पद; चंद्र आणि सूर्य सोडून सर्वच आश्वासन सतेज पाटलांनी कोल्हापूरकरांना दिली; खासदार धनंजय महाडिकांची टीका
काँग्रेसचा जाहीरनामा हास्यास्पद; चंद्र आणि सूर्य सोडून सर्वच आश्वासन सतेज पाटलांनी कोल्हापूरकरांना दिली; खासदार धनंजय महाडिकांची टीका
Embed widget