Kabirdas Maharaj : बंजारा समाजाने जरांगे पॅटर्न स्वीकारावा - कबीरदास महाराज
Kabirdas Maharaj : बंजारा समाजाने जरांगे पॅटर्न स्वीकारावा - कबीरदास महाराज
सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. महिला काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. तर मिरज विधानसभा मतदारसंघात ठाकरे गट भाजपच्या विरोधात उमेदवार मैदानात उतरवणार आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरुन आहे.
सांगली (Sangali Vidhan Sabha Election 2024) आणि मिरज (Miraj Vidhan Sabha Election 2024) विधानसभा मतदारसंघात (Assembly Constituency) निवडणुकीचे (Elections) पडघम वाजायला सुरुवात झाली असून महाविकास आघाडीकडून इच्छुक उमेदवारांनी आपल्याला उमेदवारी मिळेल असे दावे करायला सुरुवात केली आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून आतापासूनच रस्सीखेच सुरू झाली आहे. तर दुसरीकडे मिरज विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीच्या जोरावर भाजपच्या विरोधात देखील उमेदवार मैदानात उतरवणार आहे.