एक्स्प्लोर

Weather Update : उत्तर भारतात मुसळधार पाऊस, अनेक भागात जनजीवन विस्कळीत; हिमाचलमध्ये 122 जणांचा मृत्यू 

सध्या उत्तर भारतात (North India) मुसळधार पाऊस (Rain) कोसळत आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे.

Weather Update News : सध्या उत्तर भारतात (North India) मुसळधार पाऊस (Rain) कोसळत आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाल्यांना पूर आल्यानं काही भागातील नागरिकांचं स्थलांतर देखील करण्यात आलं आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार 22 जुलैपर्यंत उत्तर भारतात पावसाचा जोर कायम राहणार आहे.  

उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशला मोठा फटका

उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन झालं आहे. यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्यानं नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. नदी, नाले, तलाव पाण्याने भरले आहेत. काही भागात पुराचे पाणी घरांमध्ये शिरलं आहे. हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाने कहर केला आहे. हिमाचल प्रदेशातील नद्यांनी पूर आला आहे. या पावसामुळं हजारो कोटी रुपयांयं नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे हिमाचल प्रदेशचे 4635.58 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये आतापर्यंत 122 जणांचा मृत्यू 

अतिवृष्टीमुळं हिमाचल प्रदेशमध्ये आतापर्यंत 122 जणांना मृत्यू झाला आहे. राज्यभरात पावसामुळे 490 घरांचे पूर्णत: नुकसान झाले आहे तर 4 हजार 146 घरांचे अंशत: नुकसान झाले. पावसामुळे 133 दुकाने उद्ध्वस्त झाली आहेत. तर 943 जनावरांनाही जीव गमवावा लागला आहे. 24 जूनपासून हिमाचल प्रदेशात 56 भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत, 43 ठिकाणी पूर आला आहे. 

दिल्लीत मुसळधार पाऊस

दिल्लीत सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. दिल्लीतील पुराचा सर्वाधिक फटका पूर्व दिल्ली आणि ईशान्य दिल्लीला बसला आहे. पूर आणि पावसामुळे डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढला आहे. सध्या त्याचा प्रभाव दिसत नसला तरी दिल्ली सरकारने या आजारांना तोंड देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. यमुना नदीची पाणीपातळी 206 मीटरवर पोहोचली. जुना रेल्वे पूल (ORB) येथे यमुना नदीची जलपातळी 12 वाजता 205.75 मीटर नोंदवण्यात आली आहे. जी धोक्याच्या चिन्हाच्या वर आहे. दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी ट्विट केले की, "काल हरियाणातील काही भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे आज यमुनेच्या पाण्याची पातळी थोडीशी वाढत आहे. जोपर्यंत पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हापेक्षा खाली येत नाही तोपर्यंत मदत शिबिरांमध्ये राहणाऱ्या लोकांना घरी न परतण्याचे आवाहन केले. दिल्लीला लागून असलेल्या हरियाणातील फरिदाबादमध्ये गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या घटनांमध्ये बुडून चार जणांचा मृत्यू झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Rain : आज राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, रायगडसह पालघर, पुणे आणि सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट

महत्त्वाच्या बातम्या

बंदी घातलेल्या संघटनेशी संबंध, काश्मीरमध्ये 4 महिलांसह 6 जणांना अटक; हॉटेलमध्ये गुप्त बैठका, 7-8 लाख रुपयांच्या व्यवहारांचा संशय
बंदी घातलेल्या संघटनेशी संबंध, काश्मीरमध्ये 4 महिलांसह 6 जणांना अटक; हॉटेलमध्ये गुप्त बैठका, 7-8 लाख रुपयांच्या व्यवहारांचा संशय
Pune News: भव्य क्रीडा महोत्सवासाठी पुणे सज्ज; 27 ऑक्टोंबरपासून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाचा थरार, SNBPच्या 2 कॅम्पसमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा
भव्य क्रीडा महोत्सवासाठी पुणे सज्ज; 27 ऑक्टोंबरपासून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाचा थरार, SNBPच्या 2 कॅम्पसमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा
Prithviraj Chavan: डोनाल्ड ट्रम्प यांचा दोन्ही सभागृहात दारुण पराभव, एपस्टीन फाईल्सचा भारताच्या राजकारणावरही परिणाम, तर देशात परिवर्तन अटळ; पृथ्वीराज चव्हाण यांचा खळबळजंक दावा
डोनाल्ड ट्रम्प यांचा दोन्ही सभागृहात दारुण पराभव, एपस्टीन फाईल्सचा भारताच्या राजकारणावरही परिणाम, तर देशात परिवर्तन अटळ; पृथ्वीराज चव्हाण यांचा खळबळजंक दावा
पदभार स्वीकारताच अवघ्या काही तासात केरळच्या राज्यपालांनी लोक भवनात मांसाहारी जेवणावर थेट बंदी घातली; 99 टक्के केरळची जनता मांसाहारी, काँग्रेसचाही जोरदार हल्लाबोल
पदभार स्वीकारताच अवघ्या काही तासात केरळच्या राज्यपालांनी लोक भवनात मांसाहारी जेवणावर थेट बंदी घातली; 99 टक्के केरळची जनता मांसाहारी, काँग्रेसचाही जोरदार हल्लाबोल

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : या नाटकात फडणवीस, शिंदे अन् जरांगे मुख्य पात्रे; बाकी सगळे एक्स्ट्रा- संजय राऊत
Manoj Jarange PC : मला का संपवायचंय? आता त्यांना सोडत नाही : मनोज जरांगे
Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : स्पाय-पेन आणि गमछा, झोलझालची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Call Recording  : चर्चेत फोन, पहचान कौन? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंदी घातलेल्या संघटनेशी संबंध, काश्मीरमध्ये 4 महिलांसह 6 जणांना अटक; हॉटेलमध्ये गुप्त बैठका, 7-8 लाख रुपयांच्या व्यवहारांचा संशय
बंदी घातलेल्या संघटनेशी संबंध, काश्मीरमध्ये 4 महिलांसह 6 जणांना अटक; हॉटेलमध्ये गुप्त बैठका, 7-8 लाख रुपयांच्या व्यवहारांचा संशय
FDA: आम्हाला कारवाईपासून रोखलं जातंय, अधिकार हिरावले जातायत! तुकाराम मुंढेंच्या एफडीएची आरोग्य मंत्रालयाविरोधात कोर्टात धाव
आम्हाला कारवाईपासून रोखलं जातंय, अधिकार हिरावले जातायत! तुकाराम मुंढेंच्या एफडीएची आरोग्य मंत्रालयाविरोधात कोर्टात धाव
Devendra Fadnavis: Gen-Z, Gen-Alpha माहिती अन् तंत्रज्ञानाच्या स्फोटाच्या काळात जन्मलेले, पण..; विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीसांच मोठं वक्तव्य
Gen-Z, Gen-Alpha माहिती अन् तंत्रज्ञानाच्या स्फोटाच्या काळात जन्मलेले, पण..; विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीसांच मोठं वक्तव्य
बस थांबवली नाही तर हातात कोयता घेऊन रस्त्यावर उभे राहणार; मुंबईच्या कोळी महिलांचा संताप, बेस्टला इशारा
बस थांबवली नाही तर हातात कोयता घेऊन रस्त्यावर उभे राहणार; मुंबईच्या कोळी महिलांचा संताप, बेस्टला इशारा
New Zealand vs India, 2nd T20I: 41 धावांवर 3 गडी बाद, तरी न्यूझीलंडने भारतासमोर 181धावांचे लक्ष्य ठेवले; फिलिप्स आणि जेकब्स चमकले
41 धावांवर 3 गडी बाद, तरी न्यूझीलंडने भारतासमोर 181धावांचे लक्ष्य ठेवले; फिलिप्स आणि जेकब्स चमकले
Shrikant Shinde and Manoj Jarange patil: मनोज जरांगे पाटलांना 500 कोटी रुपये पोहोचवल्याचा आरोप, ऑडिओ क्लीपमधील दाव्याबाबत श्रीकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
मनोज जरांगेंना 500 कोटी रुपये पोहोचवल्याचा आरोप, ऑडिओ क्लीपमधील दाव्याबाबत श्रीकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
Onkar elephant Sindhudurg: ओंकार हत्ती गावात फिरतफिरत चक्क रिसॉर्टमध्ये पोहोचला, अजस्त्र आकाराचा प्राणी पाहताच कुत्रे घाबरले अन्...
ओंकार हत्ती गावात फिरतफिरत चक्क रिसॉर्टमध्ये पोहोचला, अजस्त्र आकाराचा प्राणी पाहताच कुत्रे घाबरले अन्...
Sushma Andhare : शिंदे-फडणवीस एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्मा रिर्टन्स! नेमकं कोण कोणाचा गेम करतंय? मनोज जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपवरती सुषमा अंधारे थेट बोलल्या
शिंदे-फडणवीस एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्मा रिर्टन्स! नेमकं कोण कोणाचा गेम करतंय? मनोज जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपवरती सुषमा अंधारे थेट बोलल्या
Embed widget