India A vs Pakistan A: टीम इंडिया आणि पाकिस्तानचा आज महामुकाबला; कधी अन् कुठे पाहाल सामना?
India A vs Pakistan A: आशिया चषक आणि आयसीसी एकदिवसीय विश्वचषकापूर्वी भारतीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान यांच्यात स्पर्धा होणार आहे. हा मेगा इव्हेंट एमर्जिंग एशिया कप 2023 अंतर्गत होणार आहे
![India A vs Pakistan A: टीम इंडिया आणि पाकिस्तानचा आज महामुकाबला; कधी अन् कुठे पाहाल सामना? ind vs pak where and how to watch india a vs pakistan a match in emerging asia cup 2023 India A vs Pakistan A: टीम इंडिया आणि पाकिस्तानचा आज महामुकाबला; कधी अन् कुठे पाहाल सामना?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/19/a0844f90bd441b8cb6f2ab2997e145b4168972888689388_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
India A vs Pakistan A Emerging Teams Asia Cup 2023: टीम इंडिया (Team India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील शानदार सामना क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. हा सामना टीम इंडिया आणि पाकिस्तानच्या 'अ' संघामध्ये होणार आहे. हा सामना ACC मेन्स एमर्जिंग टीम्स आशिया कप 2023 स्पर्धेअंतर्गत खेळवला जाईल.
यश ढुल या स्पर्धेत भारताच्या 'अ' संघाचं नेतृत्व करत आहे. तर उपकर्णधार अभिषेक शर्मा आहे. या भारतीय क्रिकेट संघात IPL 2023 फायनलमध्ये गुजरात टायटन्ससाठी धडाकेबाज खेळी करणारा स्टार फलंदाज साई सुदर्शनचाही समावेश आहे.
कर्णधार यशनं पहिल्या सामन्यात झळकावलं शतक
हा मेन्स एमर्जिंग आशिया चषक 13 ते 23 जुलै दरम्यान श्रीलंकेत खेळवला जात आहे. आठ आशियाई देशांदरम्यान खेळवली जाणारी ही स्पर्धा एकदिवसीय स्वरूपात खेळवली जात आहे. टीम इंडियाच्या 'अ' संघाला नेपाळ, यूएई 'अ' आणि पाकिस्तान 'अ' संघासोबत 'ब' गटात ठेवण्यात आलं आहे.
भारतीय क्रिकेट संघानं ग्रुप स्टेजमधील पहिला सामना UAE विरुद्ध खेळला होता, ज्यात 8 विकेट्सनी विजय मिळवला होता. या सामन्यात कर्णधार यश ढुलनं नाबाद 108 धावांची खेळी केली. तर साई सुदर्शननं 41 धावा केल्या. हर्षित राणाने गोलंदाजीत 4 बळी घेतले.
टीम इंडियानं दुसऱ्या सामन्यात नेपाळचा 9 विकेट्सनी पराभव केला. या स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्ध टीम इंडियाचा हा तिसरा सामना असेल. अशा परिस्थितीत हा सामना कुठे होणार, असा प्रश्न चाहत्यांना पडला असेलच. तसेच चाहत्यांना हा सामना कुठे पाहता येईल? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया...
2️⃣ wins in a row for India 'A' 🙌
— BCCI (@BCCI) July 17, 2023
A clinical chase ensures a nine-wicket win against Nepal 👏
Scorecard - https://t.co/XoxpSdeexC…#ACCMensEmergingTeamsAsiaCup | #ACC pic.twitter.com/wehE5JRIVH
भारत 'अ' विरुद्ध पाकिस्तान 'अ' सामना कधी आणि कुठे खेळला जाईल?
एमर्जिंग आशिया चषक स्पर्धेतील भारत 'अ' विरुद्ध पाकिस्तान 'अ' सामना आज (19 जुलै) कोलंबोमधील आर प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल.
हा भारत 'अ' विरुद्ध पाकिस्तान 'अ' चा सामना तुम्ही कधी पाहू शकाल?
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील स्पर्धेतील हा बारावा सामना भारतीय वेळेनुसार, दुपारी 2 वाजता सुरू होईल. नाणेफेक अर्धा तास आधी होईल.
टीव्हीवर भारत 'अ' विरुद्ध पाकिस्तान 'अ' सामना कोणत्या चॅनलवर पाहता येईल?
स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर भारत 'अ' आणि पाकिस्तान 'अ' यांच्यातील आशिया चषक स्पर्धेतील या 12व्या सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही पाहु शकाल.
मोबाईलवर भारत 'अ' विरुद्ध पाकिस्तान 'अ' सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे होईल?
फॅनकोड अॅपवर चाहत्यांना त्यांच्या मोबाईलवर भारत 'अ' विरुद्ध पाकिस्तान 'अ' सामना थेट पाहता येईल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)