एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Banks Nationalisation: इंदिरा गांधींचा धडक निर्णय आणि 14 खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण; बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्राचा समावेश

Banks Nationalisation News: 9 जुलैचा दिवस भारतीय बँकिंग व्यवस्थेसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो, याच दिवशी देशातील 14 बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Banks Nationalisation: अनेक समस्या समोर घेऊन आपला देश स्वतंत्र झाला. देशात त्यावेळी गरीबी, अशिक्षितता, आर्थिक विषमता, आरोग्यविषयक समस्या अशा आणि इतर सामाजिक समस्या देशासमोर आ वासून उभ्या होत्या. अशा वेळी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यानंतर देशाची धुरा सांभाळणाऱ्या इंदिरा गांधींनीही समाजवादी धोरणांचा कित्ता गिरवत अनेक धडाडीचे निर्णय घेतले. इंदिरा गांधींनी जे काही धडाडीचे आणि महत्वपूर्ण निर्णय घेतले, ज्या निर्णयांचा देशातील मोठ्या लोकसंख्येवर परिणाम झाला त्यापैकी एक निर्णय म्हणजे खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण. 19 जुलै 1969 रोजी देशातल्या 14 खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय इंदिरा गांधींनी घेतला. 

देशाची अर्थव्यवस्था त्यावेळी खासकरून कृषीवर अवलंबून होती. अशावेळी कृषीवर सर्वाधिक परिणाम करणारा घटक म्हणजे बँकिंग व्यवस्था. देशातील बँकिंग व्यवस्था त्यावेळी खासगी उद्योगपतींच्या हाती होती. त्यामुळे सर्वसमान्य लोकांना कर्ज मिळत नव्हते. पीक कर्ज असो वा इतर प्रकारची कर्ज असो, शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना खासगी सावकारांकडे हात पसरण्याशिवाय कोणताही पर्याय नसायचा. खासगी सावकार सर्वसामान्यांचे शोषण करायचे. आधीच कर्जाच्या खाईत गेलेला सर्वसामान्य भारतीय आणखी खोलात जायचा. 

या सर्वसामान्यांचा विकासच झाला नाही तर देशाच्या विकासाची गती मंदावणार ही गोष्ट लक्षात घेऊन आणि आर्थिक धोरणाच्या गरजेनुसार बँकिंग प्रणालीचे अधिक चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी इंदिरा गांधींनी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय घेतला. 19 जुलैचा दिवस भारतीय बँकिंग व्यवस्थेसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. याच दिवशी देशातील बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 19 जुलै 1969 रोजी 14 खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले होते. त्यापूर्वी बहुतांश बँका या खासगी उद्योगपतींच्या हाती होत्या, आता त्यावर सरकारी नियंत्रण आलं. 

मोरारजी देसाई यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आला

देशातील 14 बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यासाठी हालचाली सुरू झाल्यानंतर त्यावेळचे अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी त्याला विरोध केला. कोणत्याही परिस्थितीत बँकांचे राष्ट्रीयीकरण करू नये असं त्यांचं मत होतं. त्यामुळे हा निर्णय अंमलात आणण्यासाठी इंदिरा गांधी यांनी मोरारजी देसाई यांच्याकडून अर्थमंत्रालय काढून घेतलं आणि नंतर बँकांच्या राष्ट्रीयीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. 

बँकिंग कंपनीज (अधिग्रहण आणि हस्तांतरण) कायदा 1970 (Banking Companies Acquisition and Transfer Act 1970) अंतर्गत बँकांचे राष्ट्रीयीकरण लागू करण्यात आले. 19 जुलै 1969 रोजी "राष्ट्रीय धोरणाच्या उद्दिष्टांशी सुसंगत अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी" हा अध्यादेश लागू झाला.

कोणत्या बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले?

1. सेंट्रल बँक ऑफ इंडिया
2. युनियन बँक ऑफ इंडिया
3. अलाहाबाद बँक
4. इंडियन बँक
5. बँक ऑफ महाराष्ट्र
6. इंडियन ओव्हरसीज बँक
7. बँक ऑफ इंडिया
8. पंजाब नॅशनल बँक
9. बँक ऑफ बडोदा
10. युनायटेड कमर्शियल बँक
11. कॅनरा बँक
12. युनायटेड बँक ऑफ इंडिया
13. देना बँक
14. सिंडिकेट बँक

राष्ट्रीयीकरणाची दुसरी फेरी 1980 मध्ये 

राष्ट्रीयीकरणाची दुसरी फेरी 1980 मध्ये आली, ज्या अंतर्गत आणखी सात बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. सरकारने राष्ट्रीयीकरण केल्यानंतर बँका सरकारच्या धोरणानुसार काम करू लागल्या.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
Ajit Pawar: अजित पवारांवर दिल्लीत तिष्ठत बसण्याची वेळ, अमित शाहांची भेट मिळालीच नाही, वेगळ्याच चर्चांना उधाण
अजित पवार करायला गेले एक अन् झालं भलतंच, अमित शाह नाराज? दिल्लीत जाऊन भेट मिळालीच नाही
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Markadwadi Protest : व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचं मत भाजपकडे वळत असल्याचा दावाTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज 3  डिसेंबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  3 डिसेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 3 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
Ajit Pawar: अजित पवारांवर दिल्लीत तिष्ठत बसण्याची वेळ, अमित शाहांची भेट मिळालीच नाही, वेगळ्याच चर्चांना उधाण
अजित पवार करायला गेले एक अन् झालं भलतंच, अमित शाह नाराज? दिल्लीत जाऊन भेट मिळालीच नाही
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Embed widget