एक्स्प्लोर

Badlapur School Akshay Shinde: बदलापूरमध्ये अक्षय शिंदेच्या घरी तोडफोड, गावकऱ्यांनी कुटुंबीयांना हुसकावून लावले, घरात सापडली खेळणी

Crime news: बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे हा बदलापूर पूर्वच्या खरवई गावातला रहिवासी आहे. त्याच्या घराची गावकऱ्यांकडून तोडफोड करण्यात आली आहे. अक्षयचे नातेवाईकही याच चाळीत राहतात.

बदलापूर: शाळेतील 4 वर्षांच्या चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे याच्याविरोधात सध्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. अक्षय शिंदे याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. सध्या पोलिसांकडून अक्षय शिंदे याची कसून चौकशी सुरु झाली आहे. अशातच बुधवारी बदलापूरमध्ये अक्षय शिंदे राहत असलेल्या खरवई गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले. अक्षय शिंदे खरवईपासून काही अंतरावर असलेल्या एका चाळीत राहतो. ग्रामस्थांनी बुधवारी त्याच्या घरात शिरत कुटुंबीयांना बाहेर काढले आणि घरातील सामानाची तोडफोड केली. यानंतर गावकऱ्यांनी अक्षय शिंदे याच्या कुटुंबीयांना घरातून हुसकावून लावत गाव सोडण्यास भाग पाडले.

अक्षय शिंदे याचे कुटुंब मूळचे कर्नाटकातील गुलबर्गा या गावातील आहे. अक्षयचा जन्म खरवई गावात झाला होता. तो याठिकाणी असणाऱ्या एका चाळीत आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता. त्याच्या कुटुंबात आई-वडील आणि एक भाऊ असे तिघेजण आहेत. अक्षयच्या कृत्यामुळे राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तो दहावीपर्यंत शिकला होता. यापूर्वी तो एका इमारतीचा सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. त्यानंतर 1 ऑगस्टपासून तो बदलापूरच्या शाळेत सफाई कर्मचारी म्हणून कामाला लागला होता. त्याने दोन चिमुरड्या मुलींना स्वच्छतागृहात नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.

अक्षय शिंदेच्या घरात सापडली खेळणी

खरवईच्या ग्रामस्थांनी अक्षय शिंदे याच्या घरावर हल्ला चढवला तेव्हा त्याच्या घरात लहान मुलांची खेळणी सापडली. ही खेळणी नेमकी कुठून आली, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. याबाबत एसआयटी पथकाकडून तपास केला जाण्याची शक्यता आहे. बदलापूरमध्ये मंगळवारी नागरिकांकडून उग्र आंदोलन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी बदलापूर शहरातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. 

अक्षय शिंदेचे वकीलपत्र स्वीकारायला वकिलांचा नकार

२६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळालेल्या आरोपी अक्षय शिंदेंचं वकीलपत्र स्वीकारायला कल्याणमधील वकिलांच्या संघटनेन नकार दिला आहे. अक्षय शिंदे याच्यासारखे नराधम कधीच तुरुंगाबाहेर येऊ नये म्हणून हा निर्णय घेत असल्याचे वकिलांच्या संघटनेने सांगितले. डीआयजी आरती सिंह यांच्या नेतृत्त्वाखालील एसआयटीने पथकाने मंगळवारी बदलापूर पोलिसांकडून याप्रकरणाच्या तपसाची सूत्रे हाती घेतली होती.

आणखी वाचा

मोठी बातमी! बदलापुरातील हिंसक आंदोलनाबाबत पोलिसांचा धक्कादायक खुलासा; फोन कॉल्स , व्हॉइस रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती

शॉकिंग! बदलापूरच्या नराधमाचे 24 व्या वर्षापर्यंतच झाले 3 लग्न; तिन्ही बायका सोडूनही गेल्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
Dombivli Crime: अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
Anil parab मी मार खाऊन ती शाखा बांधली, ताब्यात घेणारच; शिंदे गटात प्रवेश होताच अनिल परबांचा इशारा
मी मार खाऊन ती शाखा बांधली, ताब्यात घेणारच; शिंदे गटात प्रवेश होताच अनिल परबांचा इशारा
Video: अंजली दमानियांची भेट, राजीनाम्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंनी उत्तर टाळलं; माध्यमांनाही लक्ष्य केल
Video: अंजली दमानियांची भेट, राजीनाम्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंनी उत्तर टाळलं; माध्यमांनाही लक्ष्य केल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines at 2PM 28 January 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्सDhananjay Munde On Resign News : राजीनाम्याच्या मागणीविषयी मी उत्तर देणार नाही- धनंजय मुंडेSandip Kshirsagar PC : तपासानंतर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागणार, क्षीरसागर संतापलेSandeep Kshirsagar Mumbai : अजितदादांसोबत काय चर्चा झाली? कराड-धनंजय मुंडेंबाबत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
Dombivli Crime: अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
Anil parab मी मार खाऊन ती शाखा बांधली, ताब्यात घेणारच; शिंदे गटात प्रवेश होताच अनिल परबांचा इशारा
मी मार खाऊन ती शाखा बांधली, ताब्यात घेणारच; शिंदे गटात प्रवेश होताच अनिल परबांचा इशारा
Video: अंजली दमानियांची भेट, राजीनाम्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंनी उत्तर टाळलं; माध्यमांनाही लक्ष्य केल
Video: अंजली दमानियांची भेट, राजीनाम्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंनी उत्तर टाळलं; माध्यमांनाही लक्ष्य केल
कृष्णा आंधळे जिवंत नसावा, घातपात झाला असावा; संदीप क्षीरसागरांचा खळबळजनक दावा
कृष्णा आंधळे जिवंत नसावा, घातपात झाला असावा; संदीप क्षीरसागरांचा खळबळजनक दावा
Dhananjay Munde emotional : धनंजय मुंडे भावनिक, म्हणाले, मुलांना मित्र काय म्हणत असतील विचार करा!
Dhananjay Munde emotional : धनंजय मुंडे भावनिक, म्हणाले, मुलांना मित्र काय म्हणत असतील विचार करा!
Esther Anuhya case : इंजिनिअर तरुणीची बलात्कारानंतर हत्या, हायकोर्टाने फाशी सुनावलेला चंद्रभान सानप सुप्रीम कोर्टात निर्दोष!
इंजिनिअर तरुणीची बलात्कारानंतर हत्या, हायकोर्टाने फाशी सुनावलेला चंद्रभान सानप सुप्रीम कोर्टात निर्दोष!
Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणाऱ्या मारेकऱ्याचा कबुलीनामा, पोलिसांची  लांबलचक चार्जशीट, वाचा शब्द जसाच्या तसा
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणाऱ्या मारेकऱ्याचा कबुलीनामा, पोलिसांची लांबलचक चार्जशीट, वाचा शब्द जसाच्या तसा
Embed widget