एक्स्प्लोर

Horoscope Today 19 July 2023 : मेष, कन्यासह 'या' राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे खूप खास; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 19 July 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 19 July 2023 : आज बुधवार हा महत्त्वाचा दिवस आहे. सिंह राशीचे लोक त्यांच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ आपल्या जोडीदारासाठी काढतील, तर कुंभ राशीच्या लोकांना नवीन वाहनाचा आनंद मिळेल. मेष ते मीन राशीसाठी कसा असेल बुधवारचा दिवस? काय सांगतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. 

मेष 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला जाईल. तुम्ही कोणताही व्यवसाय केलात तर तुम्हाला व्यवसायात नफा मिळेल. आर्थिक लाभही मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. जर तुम्हाला प्रवासाला जायचे असेल तर आजचा तुमचा प्रवास शुभ राहील. जास्त लांबचा प्रवास न करण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही कार्यक्षेत्रात जोखीम घेणे टाळा. अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. राजकारणात करिअर करण्याची चांगली संधी आहे. मोठ-मोठ्या नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल. मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी फार मोलाचं ठरणार आहे. 

वृषभ 

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप आनंददायी असेल. तुमच्या घरात कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जाईल. तुमच्या मेहनतीने तुमची संपत्ती वाढू शकते. तुमचे मन खूप आनंदी असेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमची प्रकृती बिघडू शकते, त्यामुळे प्रकृतीची विशेष काळजी घ्या. आज कार्यक्षेत्रात दिलेली कामे वेळेत पूर्ण करा. जे अविवाहित आहेत त्यांना लवकरच शुभवार्ता ऐकायला मिळेल. व्यवसायात अडकलेला पैसा मिळेल. नोकरीत प्रगतीची संधी आहे.  

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप शुभ असणार आहे. बँक किंवा पैशांशी संबंधित काम पूर्ण होईल, ज्यामध्ये तुम्हाला नफाही मिळेल. तुमच्या कुटुंबाप्रती पूर्ण जबाबदारीने वागा. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी खूप शुभ आहे, व्यवसायातूनच तुमचे करिअर पुढे जाऊ शकते. नवीन प्रयत्नांतून तुम्हाला पैसे मिळू शकतात. तुम्ही तुमच्या आयुष्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकता. तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. बोलण्यात संतुलन ठेवा, तुमच्या बोलण्यामुळे एखादी मोठी गोष्ट बिघडू शकते. तुमच्या जोडीदाराशी प्रेमाने वागा.

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. बदलत्या हवामानामुळे मुलांच्या तब्येतीत चढ-उतार होऊ शकतात. घरात पूजा आणि पाठही आयोजित केले जातील, ज्यामध्ये सर्व लोकांची ये-जा सुरु राहील. आज व्यवसायात कामाकडे दुर्लक्ष करू नका. मित्रांकडून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळचा वेळ कुटुंबीयांबरोबर घालवा. मानसिक शांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. 

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. धार्मिक कार्यात तुमचा दिवस अधिक जाईल. तुमची रखडलेली कामे वेळेत पूर्ण होतील. तुम्हाला तुमच्या व्यवसायात नफाही मिळेल. तुमची आर्थिक सुख-समृद्धी वाढेल. कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नका, अन्यथा तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. आज तब्येतीची विशेष काळजी घ्या. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. आज दिलेली कामे वेळेवर पूर्ण करा. नातेवाईकांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. जे घरापासून दूर काम करतायत, त्यांना कुटुंबाची उणीव भासेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. मुलांकडून मान-सन्मान वाढेल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. जर गुंतवणूक आधी केली असेल तर तुम्हाला त्याचाही पूर्ण फायदा मिळेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. 

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. दूरच्या नातेवाईकांच्या मदतीने तुमचे रखडलेले पैसेही तुम्हाला परत मिळतील. नोकरदार लोक नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करतील. तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल. राजकारणात यश मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला त्याचाही फायदा मिळेल. जे युवक स्पर्धेची तयारी करत आहेत, त्यांनी अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर आज ते परत करा. तुम्ही कोणतेही नवीन काम करण्याचा विचार करत असाल तर त्यात तुम्हाला यश मिळेल. 

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ घालवा आणि पैसे कसे वाचवायचे ते शिका जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढेेल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ तुमच्या मुलांसाठी काढा, त्यांच्यासोबत मजा करा. तुम्हाला प्रसन्न वाटेल. नोकरदार लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायात नवीन योजना राबवतील, ज्यामुळे व्यवसायात यश मिळेल.

धनु 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्या इतर दिवसांपेक्षा चांगला आहे. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढताना दिसेल. आजूबाजूच्या परिसरात होणाऱ्या वादात अडकणे टाळा, अन्यथा तुम्ही काही अडचणीत अडकू शकता. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असेल पण तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. आज तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण करा. तुम्हाला वरिष्ठ आणि कनिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात नवीन करार होण्याची शक्यता आहे. नोकरीत तुमची प्रगती होईल. व्यवसायातील समस्या दूर होतील. नवीन योजना फलदायी ठरतील. नोकरीच्या ठिकाणी बदली होऊ शकते. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. ज्येष्ठ सदस्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्या. नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल. तुमचे आरोग्य चांगले राहील. 

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काही खास नाही. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बराच वेळ घालवाल, ज्यामुळे तुम्ही तुमची कामे वेळेवर पूर्ण करू शकणार नाही. नोकरदारांना दिलेली कामे वेळेत पूर्ण करावी लागतील. वरिष्ठांकडून चांगली बातमी मिळेल. जे घरापासून दूर काम करत आहेत, त्यांना त्यांच्या कुटुंबाची आठवण येईल. तुम्हाला अचानक प्रवासाला जावे लागू शकते. प्रवास तुमच्यासाठी ठीक राहील. अनोळखी व्यक्तीची भेटेल. कोणाच्याही सल्ल्याने पैसे गुंतवू नका, अन्यथा तुम्हाला नुकसान होऊ शकते. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढेल. तुम्ही केलेल्या कामाचे सर्वजण कौतुक करतील. तुमच्या गोड बोलण्यामुळे तुम्ही तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. 

कुंभ 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. तुमच्या तब्येतीत सुधारणा होईल. रोजच्या दिनचर्येत मॉर्निंग वॉक आणि योगा यांचा समावेश असेल. जे लोक परदेशातून आयात-निर्यातीचे काम करतात, त्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठांच्या चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्या, तुम्हाला आर्थिक लाभ होईल. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची संधी मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. पैसे कसे वाचवायचे ते तुम्ही तुमच्या वडिलांकडून शिकून घ्या, जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. घर, फ्लॅट घेण्याचे नियोजन होते, ते यशस्वी होईल. नवीन वाहनाचा आनंदही मिळू शकतो. वैवाहिक जीवनात सुख-शांती राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायाला पुढे नेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल.  

मीन 

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतील. कुटुंबात सुरू असलेल्या समस्यांवर उपाय शोधण्यात सक्षम व्हाल. जे लोक भागीदारीत व्यवसाय करत आहेत, त्यांना भरपूर नफा मिळेल. तुमच्या आरोग्यात सुधारणा दिसेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक सदस्यांसोबत तुम्ही काही धार्मिक स्थळांना भेट देण्याची योजना करा. समाजाच्या हितासाठी केलेल्या कार्याचा सन्मान मिळेल. घरामध्ये पूजा, पाठ आयोजित केले जातील, ज्यामध्ये सर्व लोकांची ये-जा सुरु असेल. कार्यक्षेत्रात कामाचा ताण जास्त असेल पण तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. तुम्ही तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. 

महत्त्वाच्या बातम्या

Gemini August Monthly Horoscope 2026 : मिथुन राशीसाठी ऑगस्टचा महिना सावधानतेचा, नोकरीत अडचणी, आर्थिक नुकसान? वाचा मासिक राशीभविष्य
मिथुन राशीसाठी ऑगस्टचा महिना सावधानतेचा, नोकरीत अडचणी, आर्थिक नुकसान? वाचा मासिक राशीभविष्य
Hindu Religion: देवघरातील देवांची मूर्ती 'या' दिवशी चुकूनही हलवू नये? देवांची स्वच्छता कोणत्या दिवशी करावी? मूर्ती कशा स्वच्छ कराव्यात? धार्मिक परंपरा...
देवघरातील देवांची मूर्ती 'या' दिवशी चुकूनही हलवू नये? देवांची स्वच्छता कोणत्या दिवशी करावी? मूर्ती कशा स्वच्छ कराव्यात? धार्मिक परंपरा...
Taurus August Monthly Horoscope 2026 : वृषभ राशीसाठी ऑगस्टचे पुढचे 15 दिवस सुखाचे, महिन्याच्या शेवटी बसणार आर्थिक फटका, मासिक राशीभविष्य
वृषभ राशीसाठी ऑगस्टचे पुढचे 15 दिवस सुखाचे, महिन्याच्या शेवटी बसणार आर्थिक फटका, मासिक राशीभविष्य
तुलसीदासांना अभिप्रेत असलेले 'श्रीराम'!
तुलसीदासांना अभिप्रेत असलेले 'श्रीराम'!

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
Shivsena :शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळातून फाईल गायब झाल्यानं शिवसेना आक्रमक
शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळाबाहेर घोषणाबाजी 
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
Gunratna Sadavarte : आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
Embed widget