एक्स्प्लोर

144 वर्षापूर्वीच्या 'सिकंदराबाद क्लबला' भीषण आग, 20 कोटींहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज

सर्वात जुन्या असलेल्या हैदराबादमधील 'सिकंदराबाद क्लबला'  भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत कोट्यवधीचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Secunderabad Club Fire : हैदराबादमधील सर्वात जुन्या असलेल्या 'सिकंदराबाद क्लबला'  भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. 144  वर्षापूर्वी या सिकंदराबाद क्लबचे बांधकाम करण्यात आले होते. या आगीत कोट्यवधीचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश मिळाले आहे. दरम्यान, कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. सध्या घटनास्थळी अडकेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. 

विशेष म्हणजे ब्रिटिश राजवटीत 1878 मध्ये या 'सिकंदराबाद क्लबची निर्मिती झाली होती. हा क्लब 144 वर्षे जुना असून, सुमारे 20 एकर परिसरात पसरलेला आहे. सिकंदराबाद क्लब हा देशातील 5 सर्वात मोठ्या, प्रतिष्ठित आणि जुन्या क्लबपैकी एक आहे. या क्लबमध्ये शहरातील मोठे अधिकारी आणि श्रीमंत व्यापारीच येतात. सामान्य लोकांना येथे येण्यास मनाई आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे 3 वाजताच्या सुमारास या क्लबमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. आग इतकी भीषण होती की, ती संपूर्ण क्लबमध्ये पसरली आहे. आगीच्या ज्वाळा लांबून दिसत होत्या.

आग लागल्याची माहिती क्लबच्या व्यवस्थापन विभागाने अग्निशमन विभागाला दिल्यानंतर अग्निशमाक विभागाने घटनास्थळी पोहोचून आग विझवली. मिळालेल्या माहितीनुसार, आग विझवण्यासाठी सुमारे 10 फायर इंजिनांचा वापर करण्यात आला. आग विझवण्यासाठी 4 तासांहून अधिक वेळ लागला. घटनास्थळी प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. सुट्टीमुळे क्लबमध्ये कोणीही पाहुणे नव्हते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र क्लबमधील सुमारे 20 कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आगीत क्लबच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. काही लोकांच्या म्हणण्यानुसार आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगितले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : आपल्यालाही मतांचं धर्मयुद्ध लढावं लागेलMahayuti CM Special Report : शर्यतीतून फडणवीसांची माघार;महायुतीचा मुख्यमंत्री कोण ?ABP Majha Headlines :  7 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  16 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Embed widget