Corona Vaccination in India : देशात लसीकरणाची वर्षपूर्ती! वर्षभरात 157 कोटी डोस, आता बुस्टर डोसचं आव्हान
Corona Vaccination in India : भारतातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण झालं आहे. वर्षभरात 157 कोटी डोस देण्यात आले असून सर्वांसमोर आता बुस्टर डोसचं आव्हान आहे.
Corona Vaccination Drive 1 Year Completed : देशासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. 16 जानेवारी 2021 पासून देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. 138 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात वर्षभरात 157 कोटी डोस देण्यात आलेत. आता कोरोनाची तिसरी लाट आलेली असताना लसीकरण महत्त्वाची भूमिका पार पडत असल्याचं पाहायला मिळतं आहे. येत्या काळात बूस्टर डोसचं आव्हान प्रशासनापुढे आहे. लसीकरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त आज विशेष टपाल तिकीट जारी करण्यात येणार आहे.
देशात कोविड लसीकरण मोहिमेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या वर्षी 16 जानेवारी रोजी देशव्यापी मोहीम सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत देशात एकूण 156 कोटी 68 लाख 14 हजार 804 जणांना पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे.
देशातील आतापर्यंतच्या लसीकरणाची आकडेवारी
- आतापर्यंत झालेलं एकूण लसीकरण : 1,56,68,14,804
- आतापर्यंत देण्यात आलेले एकूण बूस्टर डोस : 41,83,391
- 15 ते 18 या वयोगटाचं आतापर्यंत झालेलं लसीकरण : 33609191
लसीकरणाची आकडेवारी
- 18+ वयोगटातील 95 कोटी लोकसंख्येला लसीचा डोस दिला जाणार होता
- आतापर्यंत 87 कोटींना पहिला डोस मिळाला आहे.
- म्हणजेच, सुमारे 92 टक्के लोकसंख्येला पहिला डोस मिळाला
- त्याच वेळी, सुमारे 65 कोटी लोकसंख्येला दोन्ही डोस मिळाले आहेत, म्हणजे सुमारे 69 टक्के
15 ते 18 वर्ष वयोगटातील जवळपास 8 कोटी मुलांना लस देणं आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वीच देशात या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. आतापर्यंत सव्वा तीन कोटी मुलांना लस देण्यात आली आहे. म्हणजेच, जवळपास 41 टक्के मुलांना लसीचा पहिला डोस देण्यात आली आहे. अद्याप या मुलांना लसीचा दुसरा डोस मिळणं बाकी आहे. गेल्या सोमवारपासून बूस्टर डोस सुरू करण्यात आला असून, सुमारे तीन लाख लोकांना बूस्टर डोस द्यायचा आहे. त्यापैकी 38 लाख बूस्टर डोस देण्यात आले आहेत. म्हणजेच, सुमारे 13 टक्के लोकांना लसीचा बूस्टर डोस देण्यात आला आहे.
राज्यवार आकडेवारी
दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाच्या लसीचे सध्या 2,83,73,602 डोस देण्यात आले आहेत. ज्यापैकी 5,07,374 डोस 15 ते 18 वयोगटातील लोकांना देण्यात आले आहेत. दरम्यान, संपूर्ण देशात 60 वर्षांहून अधिक वयाच्या को-मॉर्बिड असणाऱ्या वयोवृद्ध लोकांसाठी बुस्टर डोस देण्यात येत आहे.
उत्तर प्रदेश : देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये दोन्ही लसीचे 22,59,26,829 डोस देण्यात आले आहेत. यामध्ये 13,63,67,212 पहिल्या डोसचा समावेश आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- पुढील 3 आठवड्यात केरळमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता : आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज
- Delhi Corona News: एका महिन्याच्या बाळाची कोरोनावर मात, डिस्चार्ज देताना भावनिक झाला रुग्णालयातील स्टाफ
- ओमायक्रॉनच्या संकटात 1300 महिलांची सुरक्षित प्रसूती; BMC कडून विशेष दक्षता
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा