एक्स्प्लोर
बँकांबाहेर चार स्वतंत्र रांगा, तर मेडिकलमध्ये जुन्या नोटा चालणार

मुंबई: नोटांचा तुटवडा आणि 500, हजारांच्या नोटा बदलून घेण्यासाठी त्रस्त झालेल्या नागरिकांना सरकारने आणखी एक दिलासा दिला आहे.
खासगी मेडिकल दुकानं आणि खासगी वीज कंपन्यांच्या बिलांसाठी 24 नोव्हेंबरपर्यंत जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा वापरता येणार आहेत. केंद्रीय अर्थसचिव शशिकांत दास यांनी ही माहिती दिली. राजधानी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
बँकांबाहेर चार रांगा
बँकांबाहेर होणारी गर्दी पाहता यापुढे बँकाबाहेर 4 रांगा लावण्यात येणार आहेत. पैसे काढण्यासाठी, पैसे भरण्यासाठी, दिव्यांगांसाठी आणि वयोवृद्ध व्यक्तींसाठी असं या रांगांचं स्वरुप असणार आहे.
कॅशचा तुटवडा, 'पेटीएम', 'पेझॅप'सारखे ई-वॉलेट कसे वापराल?
कोणत्या एटीएममधून अडीच हजार निघणार?
आता एटीएममध्ये 2500 रुपये काढता येऊ शकतात. मात्र प्रत्येक एटीएममध्ये ही सुविधा अद्याप उपलब्ध नाही. तर बदल झालेल्या ATM मधूनच 2500 रु. काढता येणार आहेत.
एटीएममध्ये बदल करण्याचं काम युद्धपातळीवर सुरु असून 2 लाख बँक कर्मचारी त्यासाठी काम आहेत.
दरम्यान, गरज नसताना बँकांमध्ये गर्दी करु नये, असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.
राज्यभरात टोलनाक्यांवर 14 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत टोलवसुली केली जाणार नाही. मात्र ही मुदत वाढवण्याबाबतचा निर्णय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाकडून घेण्यात येईल.
सरकारने पैसे काढण्याची आणि नोटा बदलण्याची मर्यादा वाढवली!
नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँक खात्यातून रक्कम काढण्यावर लावण्यात आलेले निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे दिवसाला 4 हजारांऐवजी साडेचार हजार रुपयांची रक्कम बदलता येणार आहे.
एटीएममधून दोन हजारांऐवजी अडीच हजारांची रक्कम काढता येणार आहे. याशिवाय इतर बँक व्यवहारांवर लादण्यात आलेली मर्यादा देखील शिथील करण्यात आली आहे. यासंदर्भात अर्थ मंत्रालयाने सर्व बँकांना आदेश दिले असून, आजपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.
तातडीच्या उपचारावेळी रुग्णाकडून चेक स्वीकारा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
चलन पुरवठा सुरळीत होईपर्यंत राज्यातील सर्व रुग्णालयांना रुग्णांकडून चेक स्वीकारण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. याबाबत काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून लक्ष ठेवलं जाणार आहे.
अर्थमंत्रालयाचे बँकांना नवे आदेश :
- एटीएममधून आता 2 हजार ऐवजी 2,500 रुपये काढण्याची मुभा
- बँक खात्यातून दिवसाला 4 हजाराऐवजी 4,500 रुपयांच्या नोटा बदलता येणार
- एटीएममधून दिवसाला 2 हजाराऐवजी 2,500 रुपये काढता येणार
- दिवसाला बँक खात्यातून 10 हजार रुपये काढण्याचे निर्बंध हटवले
- एका आठवड्यात बँक खात्यातून 20 हजाराऐवजी 24 हजार रुपये काढता येणार
- पेन्शनर्ससाठीची वार्षिक प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत 15 जानेवारीपर्यंत वाढवली
सरकारी रुग्णालयं, पेट्रोल पंप, टोलला जुन्या नोटा स्वीकारण्यास मुदतवाढ
सरकारने पैसे काढण्याची आणि नोटा बदलण्याची मर्यादा वाढवली! तातडीच्या उपचारावेळी रुग्णाकडून चेक स्वीकारा, मुख्यमंत्र्यांचे आदेश यूपीआय काय आहे, आणि ते कसं काम करतं? कॅशचा तुटवडा, 'पेटीएम', 'पेझॅप'सारखे ई-वॉलेट कसे वापराल?अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
व्यापार-उद्योग
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
