एक्स्प्लोर

Best Bus Accident: मोठी बातमी! मुंबईच्या CSMT रेल्वे स्थानकाजवळ बेस्ट बसनं आणखी एकाला चिरडलं

Mumbai Best Bus Accident : मुंबईच्या कुर्ला परिसरात झालेल्या बेस्ट बसच्या अपघताला दोन दिवस उलटत नाही तोच असाच एक मोठा अपघात मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ झाल्याचे समोर आले आहे. 

Best Bus Accident  मुंबई : मुंबईच्या कुर्ला परिसरात सोमवारी रात्री क्षणार्धात होत्याचे नव्हतं झालं. कुर्ला डेपोतून आलेल्या इलेक्ट्रिक बस चालकाचा ब्रेक ऐवजी एक्सीलेटरवरती पाय पडला. गाडीने एकदम 70 चा स्पीड घेतला आणि समोर येईल त्यांला उडवलं. या घटनेमध्ये 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. अरुंद रस्ता आणि त्यातच दुतर्फा वाहतूक सुरू असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.(Kurla Bus Accident) या घटनेला अवघे दोन दिवस उलटत नाही तोच असाच एक मोठा अपघात झाल्याचे समोर आले आहे. 

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ बेस्टच्या एका बसने एका व्यक्तीला चिरडल्याची माहिती पुढे आली आहे. या अपघातात या इसमाचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मुंबई पोलीस झोन एकचे ऑफिसजवळच हा अपघात घडला आहे. दरम्यान या अपघामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

बस चालकाला अटक,दुचाकीस्वाराचा शोध सुरू

प्राथमिक माहितीनुसार ही घटना दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील मुंबई पोलीस झोन एक कार्यालयाजवळ एक अंदाजे 60 वर्षांचे वयोवृद्ध व्यक्तीला आधी एका दुचाकीस्वाराने धडक दिली. परिणामी ते रस्त्यावर पडले आणि मागून येणाऱ्या बेस्ट बसच्या चाकाखाली ते आले. याप्रकरणी मुंबईतील एमआरए पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही बस कुलाबा बस डेपोकडे जात होती. बस चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर दुचाकी चालकाचा शोध सध्या सुरू आहे. मृताची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. त्या  दिशेनेही पोलीस आता तपास करत आहे. 

कुर्ला बस अपघातात नेमकं काय घडलं?

कुर्ला परिसरात सोमवारी रात्री 10.45 च्या सुमारास भीषण अपघात झाला. बेस्टच्या 332 क्रमांकाच्या बसने नियंत्रण सुटून रस्त्यावरील अनेक वाहने आणि अनेक लोकांना चिरडले. या घटनेत बेस्ट बसने अनेक वाहनांचेही नुकसान केले आहे. पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी बस चालकाने ब्रेकऐवजी ॲक्सिलेटर दाबल्यामुळे हा अपघात घडल्याचे म्हटलं आहे.(Kurla Bus Accident)

सोमवारी रात्री भरधाव बेस्ट बसने अनेकांना धडक दिली आहे. या अपघातामध्ये जवळपास 50 जण जखमी झाले. 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बसवरील नियंत्रण सुटलेल्या बसने अनेक रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांनाही धडक दिली. या भीषण अपघाताबाबत प्रतिक्रिया देताना शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. तर अपघातास कारणीभूत ठरलेला बेस्टचा कंत्राटी चालक संजय मोरे याला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला २१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अपघाताच्या चौकशीसाठी बेस्ट उपक्रमाने मुख्य व्यवस्थापकांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे.

चालक संजय मोरे हा कंत्राटी कामगार आहे. मोठी इलेक्ट्रिक बस चालवण्याचे केवळ तीन दिवसांचे प्रशिक्षण घेतल्यानंतर 1 डिसेंबरपासून त्याला ही बस चालवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. अनुभव नसल्यामुळेच त्याचा पाय ब्रेकऐवजी एक्सलेटरवर पडला आणि अनर्थ घडला. तसेच मोरे नशेत नव्हता, असे प्राथमिक तपासातून समोर आले आहे

संबंधित बातमी:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Meet Ajit Pawar : धनंजय मुंडे-अजितददा भेटीत फक्त नववर्षाच्या शुभेच्छा? भेटीत दडलंय काय?Chhagan Bhujbal Vs Manikrao Kokate | कोकाटे-भुजबळांमधली तू तू, मैं मैं कधी थांबवणार Special ReportThane Traffic | ट्रॅफिकचा त्रास ठाणेकरांनी आणखी किती वर्ष सोसायचं Special ReportSpecial Report PM Modi Mahal : पंतप्रधानांचा महल, सामनातून टीका, राजकारण तापलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Embed widget