Measles Disease: औरंगाबादमध्ये गोवरचा उद्रेक, गेल्या 19 दिवसांत तब्बल 237 संशयीत रुग्ण
Measles Disease Update: गोवरचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर लसीकरण मोहीम राबवली जात आहे.
![Measles Disease: औरंगाबादमध्ये गोवरचा उद्रेक, गेल्या 19 दिवसांत तब्बल 237 संशयीत रुग्ण maharashtra News Aurangabad News Measles outbreak in Aurangabad As many as 237 suspected patients in the last 19 days Measles Disease: औरंगाबादमध्ये गोवरचा उद्रेक, गेल्या 19 दिवसांत तब्बल 237 संशयीत रुग्ण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/09/01bd18a00bc41fb37b4cc278fcbf04c91668017012337296_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aurangabad Measles Disease Update: औरंगाबाद शहरात गोवरचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत असल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. कारण शहरातील गोवर संशयित बालकांची संख्या वाढत असून, 1 डिसेंबरपासून गेल्या 19 दिवसांत 237 संशयीत रुग्ण आढळून आले आहे. तर आतापर्यंत 23 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे औरंगाबाद महानगरपालिका अलर्ट झाली असून, गोवरचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर लसीकरण मोहीम राबवली जात आहे.
मुंबईत थैमान घालणाऱ्या गोवरचा उद्रेक आता औरंगाबादमध्ये देखील पाहायला मिळत आहे. कारण गेल्या काही दिवसांत गोवर रुग्णाची संख्या शहरात दिवसेंदिवस वाढतांना पाहायला मिळत आहे. त्यातच आता संशयित रुग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. 1 डिसेंबरपासून आजपर्यंत 237 संशयीत रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे आता आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.
'या' भागात गोवरचा फैलाव
चिकलठाणा, नेहरूनगर, बायजीपुरा, विजयनगर, गांधीनगर, नक्षत्रवाडी, नारेगाव मिसारवाडी, भीमनगर, सातारा, बन्सीलालनगर, भवानीनगर, जयभवानीनगर, जवाहर कॉलनी, विटखेडा, गांधीनगर, मसनतपूर, सिडको एन- 11, एन-8, हर्सल, शहाबाजार, हर्षनगर यासह शहरातील विविध भागांत आतापर्यंत गोवरचे संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सर्वच भागात गोवरचा फैलाव होत असल्याचे दिसून येत आहे.
पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 23 वर
1 डिसेंबरपासून आतापर्यंत गोवरचे शहरात 237 संशयित रुग्ण आढळून आले. या सर्व संशियत रुग्णांचे नमुने तपासणीसाठी मुंबईला हाफकीन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्यातील काही नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. तर प्राप्त अहवालांमध्ये कालपर्यंत 22 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. दरम्यान रविवारी देखील आणखी जिन्सी भागातील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहारतील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 23 झाली आहे.
गोवरचा फैलाव रोखण्यासाठी प्रयत्न
- महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरात युद्धपातळीवर लसीकरण मोहीम हाती घेतली आहे.
- 1 डिसेंबरपासून 18 डिसेंबरपर्यंत शहरात सुमारे 6 हजार बालकांना लसी देण्यात आल्या आहेत.
- यापूर्वी गोवरचा डोस घ्यायचा राहून गेलेल्या बालकांना देखील डोस दिले जात आहेत.
- ज्या बालकांनी दोन डोस घेतले आहेत, त्यांना अतिरिक्त एक बुस्टर डोसही दिला जात आहे.
- 2 हजार 291 बालकांना पहिला एमआर डोस देण्यात आला आहे.
- तर 2 हजार 204 बालकांना दुसरा एमआर डोस देण्यात आला आहे.
- यासोबतच 2 हजार 212 मुलांना अतिरिक्त डोस देण्यात आला आहे.
- तसेच गोवरच्या संशयित रुग्णांसाठी विलगीकरणाची सोय करण्यात आली आहे.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)