एक्स्प्लोर

Aurangabad: 'लव्ह जिहाद' विरोधात मोर्चा काढणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

Aurangabad: पोलिसांची परवानगी न घेताच मोर्चाचे आयोजन केल्याप्रकरणी भाजयुमोचे उपाध्यक्षासह तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Aurangabad News: राज्यात लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याच्या मागणीसाठी सोमवारी सकल हिंदू समाजाकडून वैजापूर तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान पोलिसांची परवानगी न घेताच मोर्चाचे आयोजन करण्यात आला होते. त्यामुळे पोलिसांची परवानगी न घेताच मोर्चाचे आयोजन केल्याप्रकरणी भाजयुमोचे उपाध्यक्षासह तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद ग्रामीणच्या वैजापूर पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताबला फाशीची शिक्षा द्यावी, तसेच राज्यात लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याच्या मागणीसाठी सोमवारी वैजापूर शहरात मूक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हा मोर्चा शहरातील महाराणा महाराणा प्रताप पुतळ्यापासून निघून, तहसील कार्यालयावर धडकला होता. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, की देशातील अन्य राज्याप्रमाणेच लव्ह जिहादविरोधात महाराष्ट्र शासनाने कठोर कायदा अंमलात आणावा. लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून छळ होण्याच्या घटनेत वाढ होत आहे. श्रद्धा वालकर हिने धर्मांतर करण्यास विरोध केल्यान नराधम आफताबने तिचे 35  तुकडे केले, असल्याचे निवेदनात म्हटले आहे. 

पोलिसात गुन्हा दाखल... 

लव्ह जिहादच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी रविवारी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने वैजापूर पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. शिवाय या तिघांनाही नोटीस देत जमावबंदी आदेशाचे उल्लंघन न करण्याबाबत समज दिली होती. मात्र त्यानंतरही मोर्चा काढण्यात आल्याने गोपनीय शाखेचे विजय भोटकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात भाजपा युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष गौरव दौडे (टिळक रोड, वैजापूर) यांच्यासह सौरव धामणे (स्वामी समर्थ नगर वैजापूर), स्वप्नील राजपूत (परदेशी गल्ली, वैजापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'या' आहेत प्रमुख मागण्या...

  • श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताबला फाशीची शिक्षा द्यावी.
  • लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून छळ होण्याच्या घटनेत वाढ होत आहे.
  • राज्यात लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्यात यावा.
  • झोपलेल्या सरकारमुळे धर्म रक्षणासाठी मूक मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. 

यामुळे गुन्हा दाखल... 

यावेळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील आरोपींनी विनापरवाना बेकायदेशिररित्या पाच पेक्षा जास्त लोकांना जमवुन वैजापूरच्या तहसिल कार्यालयावर मूक मोर्चा काढला होता. सद्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जमावबंदी आदेश लागू असतांना या आदेशाचे उलंघन करण्यात आले आहे. त्यामुळे याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

मोठी बातमी! सक्तीच्या वीजबिल वसुली विरोधात 'ठाकरेंची सेना' उतरणार रस्त्यावर; चक्काजाम करणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Embed widget