Travel : अयोध्या..काशी..प्रयागराज.. जुलैमध्ये भारतीय रेल्वेकडून पुण्य कमावण्याची संधी! सर्वात स्वस्त टूर पॅकेज, जाणून घ्या
Travel : तुम्हालाही धार्मिक प्रवासाची आवड आहे. तर IRCTC ने नुकतेच टूर पॅकेज लाँच केले आहे. विविध ठिकाणी अगदी कमी बजेटमध्ये प्रवासाचा आनंद घेऊ शकता.
Travel : हिंदू धर्मात चारधाम यात्रा तसेच पुण्य क्षेत्र यात्रेला अत्यंत महत्त्व आहे. असं म्हणतात ना, आयुष्यात एकदा तरी अयोध्या, काशी, गयाला जाऊन यावं. धार्मिक मान्यतेनुसार, या पुण्यक्षेत्रांच्या दर्शनाने पाप नष्ट होतात. तसेच पुण्य लाभते. तुम्हालाही धार्मिक प्रवासाची आवड असेल तर भारतीय रेल्वे तुम्हाला पुण्य कमावण्याची संधी देत आहे. अयोध्या.. वाराणसी..काशी..प्रयागराज अशा विविध ठिकाणी अगदी कमी बजेटमध्ये दर्शनाचा लाभ घेण्याची संधी देत आहे. जुलैमध्ये IRCTC सोबत टूर पॅकेज प्लॅन करा, या संदर्भातील माहिती भारतीय रेल्वेने सोशल मीडियावर पोस्ट केलीय. सविस्तर जाणून घ्या..
जुलैमध्ये पुण्यक्षेत्रांना भेट देण्याची संधी
IRCTC ने नुकतीच आपल्या सोशल मीडियावर टूर पॅकेजची माहिती शेअर केली आहे. ज्यामध्ये तुम्ही जुलैमध्ये अयोध्या ते वाराणसी सारनाथ प्रयागराज गया असा प्रवास करू शकता. IRCTC चे हे पॅकेज पूर्ण 9 दिवसांसाठी आहे. या टूर पॅकेजमध्ये निवास, भोजन अशा अनेक सुविधांचा समावेश आहे. अगदी कमी बजेटमध्ये तुम्ही या ठिकाणांना भेट देऊ शकता. IRCTC ने धार्मिक प्रवासाची आवड असलेल्या लोकांसाठी नुकतेच हे टूर पॅकेज लाँच केले आहे. 9 दिवसांच्या या टूर पॅकेजमध्ये तुम्ही अयोध्येपासून प्रयागराज आणि वाराणसीपर्यंत अनेक ठिकाणांना भेट देऊ शकता. जुलैमध्ये तुम्ही या पॅकेजचा लाभ घेऊ शकता. या सर्व ठिकाणी तुम्ही अगदी कमी बजेटमध्ये प्रवासाचा आनंद घेऊ शकता.
Go on a 9-day spiritual journey via the #Ayodhya - #Kashi: Punya Kshetra Yatra by #BharatGaurav Tourist Train!
— IRCTC Bharat Gaurav Tourist Train (@IR_BharatGaurav) June 23, 2024
Departure: #Secunderabad
Duration: 8N/9D
Departure Date: July 09, 2024
Package Price: Starting at ₹15,150/- per person*
Book Now : https://t.co/UfEYJnJwJg pic.twitter.com/YMKlY0rAV5
IRCTC ने ट्विट करून माहिती दिली
IRCTC ने या टूर पॅकेजची माहिती देणारे ट्विट शेअर केले आहे. ज्यामध्ये तुम्हाला अयोध्या, गया, प्रयागराज, सारनाथ आणि वाराणसी या धार्मिक स्थळांना भेट द्यायची असेल, तर तुम्ही IRCTCच्या या शानदार टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता.
पॅकेजचे नाव- अयोध्या-काशी- पुण्य क्षेत्र यात्रा
पॅकेज कालावधी- 8 रात्री आणि 9 दिवस
प्रवास - ट्रेन
कव्हर केलेले डेस्टीनेशन्स- अयोध्या, गया, प्रयागराज, सारनाथ आणि वाराणसी
या सुविधा उपलब्ध होणार
राहण्यासाठी हॉटेलची सोय असेल.
टूर पॅकेजमध्ये नाश्तापासून ते दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणापर्यंत सुविधा उपलब्ध असतील.
या पॅकेजमध्ये प्रवाशांना प्रवास विम्याची सुविधाही मिळणार आहे.
या प्रवासासाठी इतके शुल्क आकारले जाईल
या ट्रिपमध्ये तुम्ही स्लीपर क्लास पॅकेज घेतल्यास, तुम्हाला 15,150 रुपये द्यावे लागतील.
3AC साठी तुम्हाला 24,300 रुपये द्यावे लागतील.
तुम्ही 2AC पॅकेज घेतल्यास, तुम्हाला त्यासाठी 31,500 रुपये द्यावे लागतील.
तुम्हाला मुलांसाठी वेगळी फी भरावी लागेल.
तुम्ही अशी बुकिंग करू शकता
तुम्ही या टूर पॅकेजसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता. याशिवाय, आयआरसीटीसी पर्यटक सुविधा केंद्र आणि क्षेत्रीय कार्यालयांमधूनही बुकिंग करता येते. पॅकेजशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही IRCTC अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
टीप : अधिक माहितीसाठी तुम्ही भारतीय रेल्वेच्या www.irctctourism.com या वेबसाईटवर जाऊ शकता.
हेही वाचा>>>
Travel : तिरुपती..उज्जैन..लडाख..भारतीय रेल्वेकडून जुलै-ऑगस्टमध्ये फिरण्याची संधी! किती खर्च येईल? जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )