Ramadan 2024 : डायबेटिसच्या रुग्णांनी रमझानचा कठोर उपवास कसा करावा? 'या' सोप्या टिप्स फॉलो करा
Ramadan 2024 : रमझान दरम्यान मधुमेह असलेल्या व्यक्तींनी उपवास कसा करावा असा प्रश्न पडतो. कारण, धर्माचं पालन करतानाच आरोग्याची काळजी घेणं देखील गरजेचं आहे.
Ramadan 2024 : मुस्लिम बांधवांचा पवित्र रमझान (Ramadan 2024) महिना सुरु झाला आहे. या दरम्यान जगभरातील लोक महिनाभर रोझाचे (Roza) पालन करतात. अशा वेळी मधुमेह (Diabetes) असलेल्या व्यक्तींनी उपवास कसा करावा असा प्रश्न पडतो. कारण, धर्माचं पालन करतानाच आरोग्याची (Health) काळजी घेणं देखील गरजेचं आहे. पण, असं असलं तरी तुम्ही धर्माचं पालन करताना रोजाचे उपवास देखील करू शकता आणि आरोग्याची काळजी देखील घेऊ शकता.
'असा' करतात उपवास
रमझानदरम्यान पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत उपवास केला जातो. पण, मधुमेह नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींसाठी अन्न-पाण्याचे सेवन न करता असा उपवास केल्याने रक्तातील शर्करेच्या पातळ्यांमध्ये चढ-उतार होऊ शकतो. आपल्या शरीरातील ऊर्जा पातळी कायम राखण्यासाठी तसेच निरोगी शरीरासाठी पहाटेपूर्वी भोजन आणि सूर्यास्तानंतर सायंकाळच्या वेळी मेजवानीचा आस्वाद घेतात. पण, मधुमेह असलेल्या व्यक्तींनी रक्तातील शर्करेच्या प्रमाणात होणाऱ्या अचानक चढ-उताराला प्रतिबंध करण्यासाठी या उपवास केला जातो.
भारतातील 101 दशलक्ष व्यक्तींना मधुमेह
या संदर्भात मुंबईतील हिंदुजा आणि लीलावती हॉस्पिटलचे कन्सल्टण्ट फिजिशयन डॉ. अनिल बलानी म्हणतात की, ''नुकतंच करण्यात आलेल्या आयसीएमआर संशोधनानुसार, भारतातील 101 दशलक्ष व्यक्तींना मधुमेह आहे, ज्यामधून प्रभावी सर्वांगीण व्यवस्थापनाचे महत्त्व दिसून येते. रमझानच्या पवित्र उपवासादरम्यान कन्टिन्युअल ग्लुकोज मॉनिटरिंग (सीजीएम) मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी वरदान आहे. रक्तातील साखरेच्या पातळ्यांवर रिअल-टाईम देखरेख ठेवत सीजीएम व्यक्तींना उपवासापूर्वी आणि उपवासानंतरच्या आहारामुळे रक्तातील साखरेच्या पातळ्यांमध्ये होणाऱ्या कोणत्याही चढ-उतारांना ओळखण्यास आणि त्यांचे व्यवस्थान करण्यास मदत करते. सीजीएमद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे व्यक्ती आहाराबाबत योग्य निर्णय घेऊ शकतात. यामुळे त्यांना आहाराचे प्रमाण आणि वेळ निर्धारित करण्यास, तसेच त्यांच्या गरजांची पूर्तता करू शकतील अशा मधुमेह संबंधित पोषण निवडी करण्यास मदत होऊ शकते."
रमझान दरम्यान मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी सोप्या टिप्स :
1. रक्तातील साखरेची नियमित तपासणी करा : तुम्हाला जर निरोगी राहायचं असेल तर वेळोवेळी रक्तातील साखर वेळोवेळी तपासणं गरजेचं आहे. सीजीएम डिवाईसेस रक्तातील शर्करेच्या पातळ्यांना कॅप्चर करण्याऐवजी रिअल-टाईम ग्लुकोज मॉनिटरिंगमध्ये साह्य करतात. हा डेटा सहजपणे स्मार्टफोनवर देखील उपलब्ध होतो.
2. शरीराला उत्तम पोषण द्या : उपवासा दरम्यान संतुलित आहाराचं सेवन करा. भरपूर पाणी प्या. तसेच, कॉफी, चहा आणि शीतपेये टाळा. आहारात कर्बोदकांचा, प्रथिने आणि फॅट्सचं संतुलित प्रमाण ठेवा.
3. शारीरिक व्यायाम करा : योग्य आहाराबरोबरच शरीराला योग्य व्यायामाचीही गरज आहे. यामुळे तुमचं आरोग्य उत्तम राहील. तसेच, अतिप्रमाणात व्यायाम करणे टाळा. दिवसातून किमान अर्धा तास स्वत:साठी काढा.
4. पुरेशी झोप घ्या : आपण जेव्हा उपवास करतो तेव्हा अर्थातच कमी प्रमाणात अन्नाचं सेवन केल्याने शरीराला पुरेशी ऊर्जजा मिळत नाही. अशा वेळी पुरेशी झोप घेतल्याने शरीरातील ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते.
महत्त्वाच्या बातम्या :