(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Consumption Of Alcohol : सावधान ! दारूचे अतिसेवन ठरू शकते तुमच्या मेंदूला घातक; जाणून घ्या
दारू पिल्याने शरीरावर अनेक वाईट परिणाम होतात. दारूच्या अतिसेवनामुळे मेंदूवरही त्याचा परिणाम होतो. आरोग्य तज्ञांच्या मते, जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने मेंदूचा आकार कमी होऊ शकतो.
Alcohol Side Effects : आजकाल बरेचजण मोठ्या प्रमाणात दारू (Alcohol) पितात. सध्याच्या काळात दारू पिणे ही अत्यंत सामान्य बाब मानली जाते. मात्र या दारूच्या नशेचा थेट परिणाम मेंदूवर होतो. दीर्घकाळापर्यंत दारूचे (Alcohol side effect) सेवन केल्याने मेंदूचे (Brain) नुकसान होऊ शकते.
मेंदूवर दारूचा काय परिणाम होतो
आपल्या शरीराची चयापचय क्षमता निश्चित असते. म्हणूनच जास्त मद्यपान केल्याने चयापचय प्रक्रिया योग्य प्रकारे होत नाही. शरीरावर दारूचा परिणाम फार लवकर होतो. दारू पाच मिनिटांत मेंदूपर्यंत पोहोचते आणि त्याचा परिणाम अवघ्या 10 मिनिटांत दिसून येतो.
शरीरात दारू किती काळ राहते
जेव्हा तुम्ही दारू पिता तेव्हा ते तुमच्या रक्तप्रवाहात प्रवेश करते, त्यानंतर हळूहळू संपूर्ण शरीरात पोहोचते. तुम्ही प्यायलेल्या दारूचे चयापचन व्हायला दोन तास लागतात. सुमारे 20 टक्के दारू थेट रक्तात जाते, जिथून ते तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचते. उर्वरित 80 टक्के आतड्यांमध्ये राहते. जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने त्याचा परिणाम तुमच्या लिव्हरवर (Liver) होऊ शकतो. शरीरातून हानिकारक आणि विषारी पदार्थ काढण्याचे काम लिव्हर करते. मात्र जास्त प्रमाणात दारूचे सेवन केल्यास त्याचा परिणाम तुमच्या लिव्हरवर होतो आणि त्यामुळे लिव्हरला सूज येणे, जळजळ होणे अशा विविध समस्या उद्भवतात.
मेंदूवर दारूचा प्रभाव
सतत दारू पिल्याने स्मृतीभ्रंश होण्याची शक्यता असते. तसेच शरीराच्या आत गेल्यावर त्याचा परिणाम लगेच मेंदूवर जातो आणि मेंदूच्या रसायनशास्त्रात बदल होतो. काही लोक खूप दारू प्यायल्यानंतर बेशुद्धदेखील होतात. मेंदूचे रसायनशास्त्र बदलल्याने लोकांच्या मनःस्थितीत झपाट्याने बदल होतो. कधी ते उत्तेजित होतात तर कधी उदास होतात. कधी कधी आक्रमकही होतात.
मेंदूच्या कार्यासाठी धोकादायक
दारूच्या सेवनाने मेंदूच्या फ्रंटल लोबवर पूर्णपणे परिणाम होतो. त्याचा हिप्पोकॅम्पसवरही परिणाम होतो. जर एखाद्याने दीर्घकाळ दारूचे सेवन केले तर मेंदूचे मोठे नुकसान होऊ शकते.
दारूच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी काय करावे
दारूचे व्यसन सोडायचे असेल तर त्याचे तोटे आणि दुष्परिणाम वेळीच समजून घेतले पाहिजेत. हे देखील समजून घेणे आवश्यक आहे की दारू सोडल्याने मानसिक आरोग्य (Mental Health) सुधारते. दारू सोडल्याने ताणतणाव कमी होतो आणि मूड सुधारतो.
इतर महत्वाच्या बातम्या
Reason Of Belly Fat : पोटाची चरबी वाढतेय? असू शकतात 'ही' कारणं, वाचा सविस्तर
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )