Satej Patil Radhanagari Speech : भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Satej Patil Radhanagari Speech : भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
ज्यांनी अडीच वर्षे उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केलं त्यांना सोडून जाऊन उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करता पालकमंत्री असताना कोणतंही काम घेऊन गेलो तर त्यांनी कधी नाही म्हटलं नाही मी पुन्हा बॅटिंग करायला येणार आता उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन एकूया
हे ही वाचा..
विधानसभा निवडणुकांसाठी दिग्गजांच्या प्रचारतोफा आजपासून धडाडायला सुरुवात झाली असून महाविकास आघाडीच्या मोठ्या सभेचं नियोजन आजच करण्यात आलंय. तर, दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी कोल्हापूरमधून रणशिंग फुकले आहे. तर, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही बारामती मतदारसंघातून प्रचाराला सुरुवात केली. त्यानंतर, आज पुण्यातील एका सभेत बोलताना शरद पवारांनी (sharad pawar) थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra modi) हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ गुजरातच्याच विकासाचाच विचार करतात, गुजरातशिवाय त्यांना इतर राज्य दिसत नाहीत. म्हणूनच, आपल्या महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेण्यात येत असल्याचं सूचवत शरद पवारांनी मोदींवर नाव न घेता हल्लाबोल केला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रातील सभांना 8 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे, पुढील काही दिवसांत राज्यातील राजकीय वातावरण तापणार असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी मोठ्या प्रमाणात झडल्या जाणार आहेत.