एक्स्प्लोर

राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं

Bhau Kadam Exclusive Interview : राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत तसेच शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यावं, अशी इच्छा भाऊ कदमनं व्यक्त केली आहे.

Bhau Kadam on Ajit Pawar and Sharad Pawar : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. छोटे-मोठे सर्वच नेते प्रचार आणि रॅलीमध्ये व्यस्त असल्याचं दिसत आहे. राजकीय नेत्यांसोबत सेलिब्रिटीदेखील प्रचारात उतरले आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळल्यानंतर आता आणखी प्रसिद्ध कॉमेडीयन भाऊ कदम हा देखील अजित पवारांच्या प्रचारात उतरला आहे. 

भाऊ कदम करणार अजित पवारांचा प्रचार

अभिनेता आणि कॉमेडीयन भाऊ कदम अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करताना दिसणार आहे. याबाबत एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत भाऊ कदमने अजित पवारांचं कौतुक केलं. अजित पवार मुख्यमनंत्री व्हावे, अशी इच्छादेखील भाऊ कदमने बोलून दाखवली. राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीबद्दल प्रतिक्रिया देताना भाऊ म्हणाला की, शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र  यायला हवेत, अशी इच्छाही त्याने व्यक्त केली. 

राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा

भाऊ कदम यावेळी म्हणाला की, "अजित पवारांनी लाडकी बहीण योजना आणली. प्रचंड मेहनत करणारा नेता आहे, म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. आज मी अजित पवारांना भेटलो ते मला विचारात होते, हवा येऊ द्या का बंद झालं. त्यांना तो कार्यक्रम खूप आवडायचा. स्ट्रेसमधे असलो की, मी कार्यक्रम पाहायचो असं सांगत होते. मी राष्ट्रवादीत प्रवेश केलेला नाही, मी केवळ स्टार प्रचारक म्हणून काम करेल. मी राजकारण करत बसलो. तर सगळी कामं बाजूला राहतील", असंही यावेळी भाऊ कदमने सांगितलं आहे.

'शरद पवार-अजित पवार एकत्र यायला हवेत'

भाऊ पुढे म्हणाला की, पवार कुटुंबात काय झालं माहिती नाही, मात्र मला वाटतं शरद पवार अजित पवार एकत्र यायला हवेत. अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला हवेत, असं वाटतं. एकच वादा अजित दादा. गद्दारीबाबत बोलणार नाही. त्यातील नेमकी माहिती मला नाही. शरद पवारांची माझी बारामतीत एका नाटकाच्या प्रयोगा दरम्यान भेट झाली. त्यावेळी शरद पवारांनी एका नाटकात काम केलं होतं, तो फोटो मला त्यांनी दाखवला, अशी आठवण भाऊ कदमने सांगितली.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

मराठी अभिनेत्रींना हिंदी चित्रपटात कामवाल्या बाईची भूमिका का मिळते? अभिनेत्रीने सांगितलं पडद्यामागचं सत्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohini Khadse : आम्हाला खून करण्याची परवानगी द्या; रोहिणी खडसेंचं थेट राष्ट्रपतींना पत्र; नेमकं कारण काय?
आम्हाला खून करण्याची परवानगी द्या; रोहिणी खडसेंचं थेट राष्ट्रपतींना पत्र; नेमकं कारण काय?
Congress Massajog to Beed Sadnabhavana Rally : काँग्रेसची मस्साजोग ते बीड 51 किमी सद्नभावना रॅली, संतोष देशमुख कुटुंबीय सुद्धा सहभागी होणार
काँग्रेसची मस्साजोग ते बीड 51 किमी सद्नभावना रॅली, संतोष देशमुख कुटुंबीय सुद्धा सहभागी होणार
Telangana Tunnel Accident : तेलंगणामधील बोगद्यात अडकलेल्या आठ जीवांचा गेल्या 15 दिवसांपासून शोध सुरुच; अजूनही थांगपत्ता नाही
तेलंगणामधील बोगद्यात अडकलेल्या आठ जीवांचा गेल्या 15 दिवसांपासून शोध सुरुच; अजूनही थांगपत्ता नाही
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nira Canal : नीरा उजवा कालव्यात मृत कोंबड्या आढळल्यानं खळबळ,सावधगिरी बाळगण्याचं रामराजेंचं आवाहनABP Majha Headlines : 8 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 08 March 2025 : Maharashtra News : ABP MajhaSantosh Deshmukh Case : देशमुख हत्या प्रकरणात 5 गोपनीय साक्षीदारांचे जबाब ठरले महत्त्वाचेABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : Maharashtra News : 08 March 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohini Khadse : आम्हाला खून करण्याची परवानगी द्या; रोहिणी खडसेंचं थेट राष्ट्रपतींना पत्र; नेमकं कारण काय?
आम्हाला खून करण्याची परवानगी द्या; रोहिणी खडसेंचं थेट राष्ट्रपतींना पत्र; नेमकं कारण काय?
Congress Massajog to Beed Sadnabhavana Rally : काँग्रेसची मस्साजोग ते बीड 51 किमी सद्नभावना रॅली, संतोष देशमुख कुटुंबीय सुद्धा सहभागी होणार
काँग्रेसची मस्साजोग ते बीड 51 किमी सद्नभावना रॅली, संतोष देशमुख कुटुंबीय सुद्धा सहभागी होणार
Telangana Tunnel Accident : तेलंगणामधील बोगद्यात अडकलेल्या आठ जीवांचा गेल्या 15 दिवसांपासून शोध सुरुच; अजूनही थांगपत्ता नाही
तेलंगणामधील बोगद्यात अडकलेल्या आठ जीवांचा गेल्या 15 दिवसांपासून शोध सुरुच; अजूनही थांगपत्ता नाही
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
आजचा महिला दिन खास, 5 राशींचं नशीब उजळणार!
आजचा महिला दिन खास, 5 राशींचं नशीब उजळणार!
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
Embed widget