एक्स्प्लोर

विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन

Sangli Vidhansabha Election : लोकसभेत आणि विधानसभेत फसवणूक झाली. वसंतदादा कुटुंबांने काँग्रेस पक्षाच्या विरोधात नेमकी काय चूक केली हे कळत नाही असं खासदार विशाल पाटील म्हणाले. 

सांगली : मी निवडून आल्यानंतर काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला, आता जयश्री पाटील याच महाविकास आघाडीच्या उमेदवार असल्याचं जाहीर करतो असं सांगत खासदार विशाल पाटील यांनी विधानसभेतही सांगली पॅटर्न राबवणार असल्याचं स्पष्ट केलंय. वसंतदादा पाटील घराण्यावर काँग्रेस सातत्याने अन्याय का करतंय असा सवाल विशाल पाटलांनी विचारला. तसेच सांगलीतील भाजपच्या उमेदवाराचा पराभव काँग्रेसचा उमेदवार करू शकत नाही, त्यामुळे अपक्ष असलेल्या जयश्री पाटील यांनाच निवडून द्या असं विशाल पाटील म्हणाले. सांगली विधानसभेत अपक्ष उमेदवार जयश्रीताई पाटील यांच्या प्रचार शुभारंभ सभेत खासदार विशाल पाटील यांनी हे वक्तव्य केलं. 

सांगली विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या विरोधात काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली. त्यानंतर जयश्री पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्यांनी माघारही घेतली नसल्याने सांगलीमध्ये तिरंगी लढत होणार आहे. 

'जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार'

विशाल पाटील म्हणाले की, "जयश्री पाटील यांची उमेदवारी ही महाविकास आघाडीची उमेदवारी आहे असे मी जाहीर करतो. कारण मी खासदार म्हणून महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. जसं लोकसभेत 99 खासदार निवडून आले आणि शंभरावा  होतो तसं जयश्री पाटील शंभरावे आमदार असतील."

आता संघर्ष संपला पाहिजे ही आमची भूमिका होती. जयश्री पाटील यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळवून देण्यात आम्ही कमी पडलो असं सांगत विशाल पाटील म्हणाले की, "सांगली जिल्ह्यात एक पॅटर्न दिसून येतोय. 2014 नंतर वसंतदादा कुटुंबाला एकदाही उमेदवारी भेटली नाही. लोकसभेत आणि विधानसभेत फसवणूक झाली. वसंतदादा कुटुंबांने  काँग्रेस पक्षाच्या विरोधात नेमकी काय चूक केली हे कळत नाही. वसंतदादा कुटुंबाची निष्ठा कुठे कमी पडली का? आदर्श कुठे कमी पडले का? एवढं होऊनी मी खासदार झाल्यावर पहिल्यांदा काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला."

जयश्री पाटील भाजपचा पराभव करतील

विशाल पाटील म्हणाले की, "सातत्याने आमच्या कुटुंबावर अन्याय होत गेला? का न्याय मिळत नाही हे कळत नाही. जयश्री वहिनी लोकसभेला सर्वात पुढे होत्या. मग मी का त्यांच्या सभेला येऊ नये? ही महाविकास आघाडी फक्त तीन पक्षाची नाही. यामध्ये शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, विशाल पाटील अपक्ष म्हणून सुद्धा याच विकास आघाडीचा घटक आहे. काँग्रेसने दिलेला उमेदवार हा भाजपच्या उमेदवाराला पराभव करणास सक्षम नाही. म्हणून आम्ही उमेदवार दिला आहे आणि जयश्री पाटील या  माझ्या उमेदवार आहे हे मी जाहीर करतो."

येणाऱ्या निवडणुकीत जयश्री वहिनी यांचाच विजय होणार. सांगलीला पहिल्यांदाच महिला आमदार निवडणार आहे असं विशाल पाटील म्हणाले. मला तुम्ही खासदार म्हणून निवडून दिला आहे. तसेच माझ्या विचाराचा आमदार निवडून द्या. मदन पाटील सांगलीचा अस्सल हिरा होते. तर जयश्री पाटील सांगलीच्या हिरकणी आहेत. त्यांच्या नावातच श्री आणि जय आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जयश्रीताईंचाच विजय होणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  

माझा निर्णय योग्यच

अपक्ष उमेदवार जयश्री पाटील म्हणाल्या की, "माझा कालाचा निर्णय योग्यच झाला आहे असे वाटते. या घरावर लोक किती प्रेम करतात हे समजून आले. ज्यावेळी आमच्यावर अन्याय झाला, त्यावेळी जनतेने आम्हाला साथ दिली. मी भाऊंच्या बरोबरीने काम केले. भाऊंच्या पश्चात साडे नऊ वर्षात पक्षात काम केले. आम्ही गेली अनेक वर्षे काँग्रेसचे काम करतो. मदनभाऊ अपक्ष म्हणून निवडून आले आणि 11 आमदार घेऊन ते काँग्रेसमध्ये गेले. आठ महिनेच भाऊंना काम करण्याची संधी  मिळाली." 

आम्ही काँग्रेस पक्ष वाढवला म्हणणाऱ्यांना सांगू इच्छिते, मागील निवडणुकीत आम्हाला थांबवले. पृथ्वीराज पाटील दादांच्या समाधीवर जाऊन शपथ घेताय. तुम्ही काय काम केले हे सांगा? असा सवाल जयश्री पाटील यांनी विचारला. 

जयश्री पाटील म्हणाल्या की, "बंडाचा झेंडा स्वतः घ्यायचा आणि आता म्हणायचे काँग्रेसचेच लोक काँग्रेसच्या विरोधात काम करत आहेत. हे नेहमीच आमच्या घराबाबत घडत आले आहे. मी महिला म्हणून उमेदवारी मागितली होती. इतर क्षेत्रात महिलांना 33 टक्के आरक्षण आहे. पण गेली 44 वर्षे सांगलीत महिलांना उमेदवारी दिली नाही. विशालदादा आणि विश्वजीत कदम यांनी खूप प्रयत्न केले. आम्ही काँग्रेसच्या विचाराचे आहोत. माझे चिन्ह हिरा आहे. आता सोन्यावर पाणी पडते का तेवढे बघायचे आहे."

कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम 9 वर्षापासून मी करत आले. कार्यकर्ते, सांगलीच्या जनतेसोबत, तळागाळातील लोकांसमवेत आमची नाळ आहे. विशाल दादांना संसदेत पाठवले, ते आवाज उठवत आहेत. आता मला संधी दिली तर नक्कीच सोने करेन. विशालदादा, प्रतीकदादा आपल्या मागे आहेत. आपण सर्वांनी मदनभाऊंच्या प्रमाणे माझ्यावर प्रेम करा आणि मला निवडून द्या असं आवाहन जयश्री पाटील यांनी केलं. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report
Zero Hour Full मुंबईत ठाकरेंच्या घोषणेचा मुहूर्त ठरला,ठाकरे एकत्र आले तर महायुतीला किती मोठं आव्हान?
NCP Alliance : मुंबईत मविआला ब्रेक, काँग्रेसची स्वबळाची मेख; वंचितचा अनेक दगडांवर पाय Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget