एक्स्प्लोर

Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव

Maharashtra Assembly Election 2024: उद्धव ठाकरे यांची कोल्हापूरमध्ये सभा झाली. यावेळी त्यांंनी महायुतीवर जोरदार टीका केली.

कोल्हापूर: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी कोल्हापूरमध्ये घेतलेल्या प्रचारसभेत जनतेवर आश्वासनांची लयलूट केली. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप आणि महायुतीवर जोरदार टीका करताना राज्यातील जनतेला अनेक आश्वासने दिली. महायुतीच्या उमेदवारांना लाडकी बहीण योजनेचा फायदा होत असताना उद्धव ठाकरे यांनी दिलेली 5 आश्वासनं गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे. 

उद्धव ठाकरे यांनी कोणती 5 महत्त्वाची आश्वासनं दिली?

1. राज्यातील विद्यार्थिनींना सरकारकडून मोफत शिक्षण दिले जाते. परंतु, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर राज्यातील मुलांनाही मोफत शिक्षण दिले जाईल. मुलगा आणि मुलगी दोघेही कुटुंबाचे आधारस्तंभ असतात. त्यामुळे मुलांनाही मोफत शिक्षण मिळणे गरजेचे असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

2. पोलीस ठाण्यात गेल्यावर महिलांना कुठे तक्रार करायची, हे अनेकदा लक्षात येत नाही. या पार्श्वभूमीवर राज्यात मविआची सत्ता आल्यास महिला पोलिसांची भरती केली जाईल. पोलीस ते वरिष्ठ पदांवर महिला अधिकारी असलेले पोलीस ठाणे सुरु करण्यात येईल.

3. मुंबईतील अदानी प्रकल्प रद्द करुन त्याठिकाणी धारावीकरांना उद्योगधंद्यासकट घरे देऊ. ग्रामीण भागातील जनतेने मुंबईत यावे. मुंबई तुमची आहे, मराठी माणसाची आहे, असे उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरकरांना सांगितले. मराठी माणसाने रक्त सांडून मुंबई मिळवली आहे. त्यामुळे मुंबईवर तुमचा हक्क आहे. आगामी काळात मविआची सत्ता आल्यास आम्ही धारावी आणि मुंबई परिसरात महाराष्ट्रातील भूमिपूत्रांना परवडणाऱ्या दरात घरं उपलब्ध करुन घेऊ, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.

4. राज्यातील शेतकऱ्यांना मविआची सत्ता आल्यास हमीभाव दिला जाईल. आमचं सरकार पडलं नसतं तर यंदाच्या वर्षी शेतकरी कर्जमुक्त झाला असता. पण आमची सत्ता पुन्हा आल्यावर शेतीमालाला हमीभाव देऊ, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.

5. आमचे सरकार असताना पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर होते. आता पुन्हा आमची सत्ता आली की महाराष्ट्रात पुढील पाच वर्षे जीवनावश्यक वस्तूंच्या दरात कोणतेही बदल होणार नाही. डाळ, तांदूळ, साखर, तेल अशा जीवनावश्यक वस्तूंचे भाव आमचे सरकार स्थिर ठेवेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मोदी-शाहांनी 15 दिवस महाराष्ट्रात ठाण मांडून बसावे, उद्धव ठाकरेंचा टोला

जे अडीच वर्षे भोगत आलो ते आज मांडायला आलो आहे. या सरकारने जिथं मिळेल तिथे खायला यांनी सुरुवात केली आहे. प्रकल्पाच्या नावाखाली कंत्राटदारांचे खिसे भरायचं काम हे सरकार करत आहे. निवडणूक जवळ आल्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण दिसते. 1500 रुपये देऊन कुणाचं घर चालतं हे सांगावं, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. 

अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना मी काय चूक केली हे मला सांगा. सगळी कामं करून देखील आमचं सरकार पाडलं. मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राचं वाकडं करू देत नव्हतो म्ह्णून त्यांनी सरकार पाडलं. महाराष्ट्र लुटून त्यांना गुजरातला न्यायचं होतं म्हणून त्यांनी सरकार पाडले, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले. माझी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना विनंती आहे की, पुढील 15 दिवस त्यांनी देशभरातली नेत्यांना घेऊन महाराष्ट्रात राहावे. पराभव झाल्यानंतर त्यांनी पुन्हा निघून जावे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

आणखी वाचा

सूरतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार, कोल्हापुरात उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा 

महत्त्वाच्या बातम्या

Amravati Teacher Constituency : अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
Pune Teachers Constituency Election : दोन ओएसडीच्या स्पर्धेत सचिन सानपांनी बाजी मारली आता शिंदेंनी सुद्धा पाठिंबा दिला, पुणे शिक्षकच्या लढाईतील कोण आहेत सचिन सानप?
दोन ओएसडीच्या स्पर्धेत सचिन सानपांनी बाजी मारली आता शिंदेंनी सुद्धा पाठिंबा दिला, पुणे शिक्षकच्या लढाईतील कोण आहेत सचिन सानप?
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mira Bhayandar Municipal Corporation BJP Corporator: रुपाली मोदींनी चप्पल फेकून मारली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारल्याचा आरोप; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR दाखल
रुपाली मोदींनी चप्पल फेकली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारला; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Ekta Kapoor On Hinduphobia: 'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
Embed widget