Health Tips : तुमच्या दैनंदिन जीवनात करा 'हे' 5 बदल; तणाव कायमचा होईल दूर
Health Tips : व्यस्त जीवन आणि जबाबदाऱ्यांच्या ओझ्यामुळे तणाव सामान्य झाला आहे. ही पातळी इतकी वाढत आहे की त्यामुळे चिंता निर्माण होऊ लागते.

Health Tips : आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण आपापलं काम आणि जबाबदाऱ्या पार पाडण्यात व्यस्त असतो. अनेकांना काही क्षण शांततेत घालवायलाही वेळ मिळत नाही. अशा वेळी आपसूकच आरोग्याकडे दुर्लक्ष होत जातं. दिवसभर कामात व्यस्त राहिल्यामुळे अनेक गोष्टींचा विसर पडत जातो. म्हणूनच चिंता, नैराश्य आणि इतर अनेक आजार आजकाल सामान्य झाले आहेत. पण, प्रत्येकाने आपल्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ काढून स्वतःकडे लक्ष दिले तर चिंता, नैराश्य यांसारख्या समस्या कमी होऊ शकतात. यासाठी आपल्याला आपल्या व्यस्त वेळापत्रकात काही बदल करावे लागतील. हे बदल नेमके कोणते ते जाणून घ्या.
'या' सवयी तुमचे मन शांत ठेवण्यास मदत करतील
निरोगी आहार
दिवसभर आपल्याला ऊर्जावान राहता येईल यासाठी आपण अन्नाचं सेवन करतो. म्हणूनच, आपण नेहमी असे पदार्थ खावेत जे आपल्या शरीरासाठी चांगले असतात आणि त्यामुळे वजन नियंत्रणात राहते. फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, प्रथिने यांसारख्या गोष्टी आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगल्या असतात.
योग आणि ध्यान
जर आपण योग आणि ध्यानाला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवले तर ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. कारण योगाचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत. तर ध्यानामुळे मनाला शांती आणि जीवनात स्थिरता मिळते. ध्यान केल्याने आपले मन शांत राहते. तेव्हा आपण आपल्या जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतो.
लेखन करा
आपले विचार आणि दिवसभरात घडलेल्या गोष्टी लिहून आपण बऱ्याच अंशी मनाला आराम मिळवून देऊ शकतो. चिंता आणि नैराश्याने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी लेखनाचा सल्ला दिला जातो. त्यामुळे रोज लिहिण्याची सवय लावा.
वेळेवर झोपणे आणि पुरेशी झोप घेणे
योग्य झोप घेणे आपल्या मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. त्यामुळे रात्री नेहमी वेळेवर झोपा आणि 7 ते 8 तासांची झोप घ्या. जे लोक कमी झोपतात त्यांना फक्त तणावच नाही तर डोळ्यांखाली काळी वर्तुळे देखील येतात.
सकाळी लवकर उठा
घरातील वडीलधारी मंडळी आपल्याला नेहमी लवकर उठण्याचा सल्ला देतात. सकाळी लवकर उठण्याचे अनेक फायदे आहेत. जेव्हा आपण लवकर उठतो, तेव्हा आपण योग आणि ध्यानासाठी वेळ काढू शकतो. तसेच, लवकर उठून आपण आपला वेळ चांगल्या प्रकारे घालवू शकतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
