Tech Layoffs: टेक इंडस्ट्रीवर ले ऑफची टांगती तलवार, वर्षाच्या पहिल्याच महिन्यात अनेकांवर बेरोजगारीचं संकट?
Tech Layoffs: वर्षाचा पहिलाच महिना हा टेक इंडस्ट्रीसाठी अत्यंत अडचणींचा ठरला असल्याचं चित्र होतं. असं असलं तरीही सध्या एआय क्षेत्रात मात्र अनेक नोकरीच्या संधी सध्या उपलब्ध होत आहे.
![Tech Layoffs: टेक इंडस्ट्रीवर ले ऑफची टांगती तलवार, वर्षाच्या पहिल्याच महिन्यात अनेकांवर बेरोजगारीचं संकट? Tech industry facing layoffs 32 thousand people laid off in a month of January 2024 detail marathi news Tech Layoffs: टेक इंडस्ट्रीवर ले ऑफची टांगती तलवार, वर्षाच्या पहिल्याच महिन्यात अनेकांवर बेरोजगारीचं संकट?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/06/ca730b3ebf416ad649a6ce4ff3eb19ea1707217579661720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : सध्या तंत्रज्ञान क्षेत्रात (Technology Sector) टाळेबंदीची टांगती तलवार आहे. नवं वर्ष सुरु होऊन अवघा एक महिनाच झाला आहे, पण या क्षेत्रातील सुमारे 32 हजार लोकांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या आहेत. दरम्यान ले ऑफची (Lay off) ही चिन्ह काही कमी होताना दिसत नाहीयेत. त्यामुळे टेक इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी यंदाचं वर्ष हे फार कठिण जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
जानेवारीतही नोकरकपातीचं सत्र सुरु
Layoffs.fyi च्या अहवालानुसार, कोरोना महामारीपासून अनेक क्षेत्रातील लोकांवर नोकरकपातीची टांगती तलवार आहे. सोमवार 6 फेब्रुवारी रोजी स्नॅप इंकने त्यांच्या 10 टक्के कर्मचाऱ्यांच्या कामावरून कमी करण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे 540 कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार आहे. यापूर्वी, Okta Inc. कॉस्ट कटिंग करण्यासाठी त्यांच्या सुमारे 400 कर्मचाऱ्यांना म्हणजेच 7 टक्के लोकांना कामावरुन काढून टाकण्याची घोषणा केली आहे. दरम्यान ॲमेझॉन, सेल्सफोर्स आणि मेटा प्लॅटफॉर्म सारख्या मोठ्या टेक कंपन्या देखील या ले ऑफच्या शर्यतीत सामील आहेत.
कोरोना महामारीच्या काळात नोकर कपात
Layoffs.FYI चे संस्थापक रॉजर ली यांनी एका ईमेलमध्ये लिहिले की , यंदाच्या वर्षात देखील नोकरीच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होण्याची चिन्ह दिसत नाहीत. कोरोना महामारीच्या काळात कंपन्यांनी नोकरभरतीत कपात केली होती. दरम्यान सध्या तंत्रज्ञान क्षेत्रात आर्थिक मंदी आहे. सध्या तरी यामध्ये काही होत नसल्याची चिन्ह दिसत आहे. परंतु यंदाच्या वर्षात नोकरकपातीचे प्रमाण कमी असले तरीही ती सुरुच राहणार आहे. पण 2023 या वर्षात मोठ्या प्रमाणात अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये ले ऑफ करण्यात आले होते.
एआय क्षेत्रात वाढती मागणी
नोकर कपातीमागे आर्थिक कारण असल्याचं सांगण्यात आलं आहे. सध्या अनेक कंपन्यांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सची (एआय) शर्यत सुरू आहे. त्यामुळे या कंपन्यांचे सध्या लक्ष हे लोकांना एआयशी जोडणं हे आहे. सध्या याचा तरुणवर्गाला फटका बसत नसला, तरीही जुन्या लोकांना मात्र याचा फटका बसतोय. CompTIA च्या विश्लेषणानुसार, डिसेंबर ते जानेवारी दरम्यान AI कौशल्यांच्या नोकऱ्यांसाठी नोकरीच्या पोस्टिंगमध्ये 2,000 ने वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यांत 17,479 एआय नोकऱ्यांची संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे नोकरकपातीचे प्रमाण जरी वाढत असले तरीही एआय क्षेत्रात मात्र अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)