एक्स्प्लोर

Viral Video : हनिमूनवर प्रश्न विचारला, भर कार्यक्रमात गायिकेने कॉमेडियनच्या कानशिलात लगावली

Viral Video : एका कॉमेडी शोमध्ये हजेरी लावलेल्या गायिकेला हनीमूनबद्दल प्रश्न विचारला. या प्रश्नाने चिडलेल्या गायिकेने शोचा होस्ट असलेल्या कॉमेडियनच्या कानशिलात लगावली.

Viral Video :  प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी कॉमेडी शोमध्ये अनेकदा आलेल्या पाहुण्यांच्या कलाकृतीवर प्रहसन असणारे स्किट सादर केले जातात. अनेकदा कलाकारांना तिरकस प्रश्नही विचारले जातात. मात्र पाहुणे म्हणून शोमध्ये आलेले कलाकार हे प्रश्न एन्जॉय करतात. मात्र, एका कॉमेडी शोमध्ये (Comedy Show) हजेरी लावलेल्या गायिकेला हनीमूनबद्दल प्रश्न विचारला. या प्रश्नाने चिडलेल्या गायिकेने शोचा होस्ट असलेल्या कॉमेडियनच्या कानशिलात लगावली. याचा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

पाकिस्तानमध्ये ही अजब वाटणारी घटना घडली. प्रसिद्ध पाकिस्तानी गायिका शाजिया मंझूर हिने यांनी कार्यक्रमादरम्यान सह-होस्ट आणि कॉमेडियन शेरी नन्हा याला जोरदार कानशिलात लगावली. या व्हिडिओमध्ये, शाजिया मंझूर या चांगल्याच संतापलेल्या दिसत आहे. संतापाच्या भरात त्यांनी कॉमेडियनला मारहाण केली. दरम्यान, शोचा दुसरा होस्ट मोहसीन अब्बास हैदरने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये को-होस्ट शेरीने त्यांना हनीमूनच्या संबंधी  प्रश्न विचारला होता आणि यानंतर शाझिया यांनी म्हटले की, 'ठीक आहे, एक गोष्ट आहे की तू थर्ड क्लास व्यक्ती आहेस. मी मागच्या वेळीही बोलली होती. सर्वांना ते प्रँक असल्याचे वाटत होते. तू आता हनिमूनबद्दल बोलतोय, तुला लाज वाटत नाही का? कुणाला बोलावू का? प्रश्नांच्या अशा फैरी झाडत शाजिया यांनी कानशिलात लगावली. 

शाजियाच्या आक्रमक पवित्र्यानंतर या शोचा को-होस्ट अब्बास हैदरने मध्यस्थी केली. पण, शाजियाचा आक्रमक पवित्रा कायम राहिला. त्यावेळी  अब्बास हैदरने शेरी नन्हा याला स्क्रिप्ट सोडून इतर प्रश्न का विचारतोस असे रागावून विचारले. 

रागाने संतापलेली शाजिया स्टुडिओ बाहेर... 

कॉमेडी शोमध्ये झालेल्या या राड्यानंतर गायिका शाजिया चांगल्याच संतापलेल्या. त्यांनी रागाने शो सोडला. त्यांना बोलवण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. पण, त्यांनी शोमध्ये येण्यास नकार दिला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: 'राहुल गांधींनीच मला राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच मला राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
राज्य सरकारचं पत्र जारी, 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे मोठा निर्णय
राज्य सरकारचं पत्र जारी, 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदाMuddyache Bola Amaravati| बडनेराचा गड राणा दाम्पत्य राखणार की नवीन चेहऱ्याला संधी मिळणार?Pankaja Munde : महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे' घोषणांची गरज नाही : पंकजा मुंडे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 'राहुल गांधींनीच मला राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच मला राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
राज्य सरकारचं पत्र जारी, 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे मोठा निर्णय
राज्य सरकारचं पत्र जारी, 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Purva Walse Patil : शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटलं, पूर्वा वळसे पाटील पाण्याचा मुद्दा काढत म्हणाल्या.. होय...
शरद पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर आंबेगावत गद्दारीचा शिक्का मारला, पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या...
Sharad Pawar In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात उद्या शरद पवारांच्या सभांचा धडाका; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर असणार!
कोल्हापूर जिल्ह्यात उद्या शरद पवारांच्या सभांचा धडाका; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर असणार!
'ऑडी' इंडियाकडून नवीन लॅव्हिश ऑडी क्‍यू 7 चं बुकिंग सुूरू, लाँचिंगची तारीख ठरली; ताशी 250 चा हायस्पीड
'ऑडी' इंडियाकडून नवीन लॅव्हिश ऑडी क्‍यू 7 चं बुकिंग सुूरू, लाँचिंगची तारीख ठरली; ताशी 250 चा हायस्पीड
kolhapur dakshin Vidhan Sabha : कोल्हापूर दक्षिणमध्ये कोण मारणार बाजी? महाडिक पाटलांमध्ये पुन्हा एकदा निकराची लढाई
कोल्हापूर दक्षिणमध्ये कोण मारणार बाजी? महाडिक पाटलांमध्ये पुन्हा एकदा निकराची लढाई
Embed widget