Kanyadan : 'कन्यादान' मालिकेत होणार निर्मिती सावंतची एन्ट्री; आत्याबाईंच्या भूमिकेत दिसणार
Nirmiti Sawant : 'कन्यादान' या मालिकेत अभिनेत्री निर्मिती सावंतची एन्ट्री होणार आहे.
![Kanyadan : 'कन्यादान' मालिकेत होणार निर्मिती सावंतची एन्ट्री; आत्याबाईंच्या भूमिकेत दिसणार Kanyadan marathi serial Nirmiti Sawant Entry know Kanyadan serial latest update Kanyadan : 'कन्यादान' मालिकेत होणार निर्मिती सावंतची एन्ट्री; आत्याबाईंच्या भूमिकेत दिसणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/10/60a322591abc1dd6b73795d2533959b61678437573421254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kanyadan Serial Nirmiti Sawant Entry : 'कन्यादान' (Kanyadan) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता या मालिकेत रंजक वळण आलं असून मालिकेत आता निर्मिती सावंतची (Nirmiti Sawant) एन्ट्री होणार आहे. 'कन्यादान' या मालिकेत निर्मिती आत्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
'कन्यादान' ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अविनाश नारकर, उमा सरदेशमुख, संग्राम साळवी, अनिशा सबनीस, अमृता बने, प्रज्ञा चवंडे हे कलाकार या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहेत. आता या मालिकेतील महाले कुटुंबात वंदू आत्याची एंट्री होणार आहे.
निर्मिती सावंत दिसणार वंदू आत्याच्या भूमिकेत
विनोदाची महाराणी अशी ओळख असणारी अभिनेत्री निर्मिती सावंत ‘वंदू आत्या’ची महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. महाले कुटुंबातील अत्यंत हुशार व्यक्तिमत्व असणारी आत्या ‘चांगल्या सोबत चांगली, आणि वाईट असणाऱ्या सोबत तेवढीचं वाईट’ अशा स्वभावाची आहे. हे. मात्र, आशालता आणि तिच्या तीनही मुलांसाठी आत्या ही नावडती व्यक्ती आहे. महाले कुटुंबातील सर्व रहस्य आणि आशालाताच्या कारस्थानी युक्त्यांविषयी वंदू आत्याला सगळं माहित आहे. त्यामुळे, आशालतावरही आत्याचा कायम दबाव राहिला असून, आशालाताने आपल्या तीनही मुलांना नेहमीच आत्याविषयी वाईट सांगून त्यांना तिच्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
View this post on Instagram
आता अनेक वर्षानंतर आत्या महालेंच्या घरी येणार आहे. त्यावेळी तिच्या स्वभावातील विविध पैलू महाले कुटुंबियांना अनुभवयाला मिळणार आहेत. शिवाय, आजवर ज्या आशालतामुळे या तीनही मुलांना आत्याविषयी राग आहे त्यांनाही आत्याच्या स्वभावातील प्रेमळपणाची जाणीव होणार आहे. अनेक वर्षांनंतर महालेंच्या घरी येणारी वंदू आत्या, आता तिच्या स्वभावातील सकारात्मकता आणि प्रेम त्यांच्यापर्यत कसं पोहोचवणार हे पाहायला प्रेक्षकांना मजा येणार आहे.
मनोरंजनाचा परिपूर्ण खजिना घेऊन येणार वंदू आत्या
महालेंच्या घरातील गुपितं फोडण्यासाठी येणारी वंदू आत्या भरपूर मजा-मस्ती, आनंद आणि प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा परिपूर्ण खजिना घेऊन येणार आहे. सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता प्रेक्षक 'कन्यादान' ही मालिका पाहू शकतात.
संबंधित बातम्या
Entertainment News Live Updates 10 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)