(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bigg Boss 18 : चोर तो चोर, वर शिरजोर; सदावर्तेंमुळे शोमधील मोठा नियम मोडला अन् वर बिग बॉसलाच दिली धमकी
Bigg Boss Season 18 : बिग बॉस 18 मध्ये या आठवड्यात घराबाहेर पडण्यासाठी पाच सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यातच गुणरत्न सदावर्ते यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Bigg Boss Season 18 : बिग बॉस 18 ला धूमधडाक्यात सुरुवात झाली असून यंदाचा सीझन पहिल्याच दिवसापासून चर्चेत आहे. बिग बॉसच्या यंदाच्या सीझनमध्ये 18 सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. पहिल्या दिवसापासूनच शोला चांगला प्रतिसाद मिळत असून टीआरपीही चांगला आहे. बिग बॉसच्या अठराव्या पर्वातील पहिला नॉमिनेशन टास्क नुकताच पार पडला आहे. यामध्ये बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी एकमेकांना धारेवर धरत त्यांना घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट केलं.
सदावर्तेंमुळे शोमधील मोठा नियम मोडला
पहिल्या नॉमिनेशन टास्कमध्ये बिग बॉसच्या घरातील सदस्य एकमेकांवर निशाणा साधता दिसले. आता शोचा नवीन प्रोमो समोर आला आहे. यामध्ये बिग बॉसच्या घरातील महत्त्वाच्या नियमाचं उल्लंघन झाल्याचं दिसत आहे. बिग बॉसच्या घरात गुणरत्न सदावर्ते आणि 'व्हायरल भाभी' हेमा शर्मा यांनी मोठा नियम मोडला आहे. कलर्सने आजच्या एपिसोडचा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये नियम मोडल्यानंतर गुणरत्न सदावर्ते बिग बॉसला धमकी देत असल्याचं म्हटलं जात आहे. या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
गुणरत्न सदावर्तेंची बिग बॉसलाच धमकी
Kya hoga Bigg Boss ka decision to Gunratan’s forbidden action? 😑
— JioCinema (@JioCinema) October 9, 2024
Dekhiye #BiggBoss18 @colorstv aur #JioCinema par.#BB18 #BiggBoss18onJioCinema #BiggBoss @beingsalmankhan @adv_gunratan pic.twitter.com/J7oceEavrz
बिग बॉस शिक्षा देणार का?
बिग बॉस 18 च्या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की, गुणरत्न सदावर्ते काही नंबर सांगत आहेत आणि तुरुंगात असलेली हेमा शर्मा नेल पेंटच्या मदतीने ते नंबर टिकलीच्या पॅकेटवर मागच्या बाजूला लिहित आहे. यानंतर बिग बॉसचा आवाज येतो, 'सगळ्यांना माहित आहे की, या घरात काहीही लिहिण्यास मनाई आहे, मग असं करणं घरातील नियमांचं उल्लंघन होईल का?' हेमाला तिची चूक कळते, पण गुणरत्न सदावर्ते बिग बॉसलाच उत्तर देतात.
गुणरत्न सदावर्तेंची धमकी
यावर गुणरत्न सदावर्ते म्हणतात, 'आम्हाला त्याची चिंता नाही, मी दरोडेखोरांच्या कुटुंबातून आलो आहोत आणि आमच्यामुळे जो कोणी अडचणीत येईल, त्याची साफसफाई कशी करायची, तेही कायद्याच्या मार्गाने ते आम्हाला माहीत आहे.'
महत्त्वाच्या इतर बातम्या :