बिग बॉसच्या घरातून आविष्कार दारव्हेकर बाहेर! नीथा शेट्टीची वाइल्ड कार्ड एन्ट्री
अविष्कारची घरातून एक्झिट होताच नव्या स्पर्धकाची घरात एन्ट्री झाली आहे.

Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठी या शोची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. शोचे सुत्रसंचालक महेश मांजरेकर दर आठवड्याला शोमध्ये येऊन घरातील स्पर्धकांची शाळा घेतात. दर आठवड्याला एक स्पर्धक घराबाहेर जातो. या आठवड्यात अभिनेता आविष्कार दारव्हेकर हा घराबाहेर गेला. अविष्कारची घरातून एक्झिट होताच नव्या स्पर्धकाची घरात एन्ट्री झाली आहे.
महेश मांजरेकर यांनी या आठवड्यात चावडीवर विशाल निकमला सुनावले तर टास्क दरम्यान मिनलचे वागणे भिषण दिसले, असे मांजरेकर म्हणाले. शिवलीला, अक्षय, सुरेखा, आदिश नंतर कोण घराबाहेर जाणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. जय, विकास, मीनल, विशाल हे सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेपासून सेफ झाले होते. आविष्कार घरातून बाहेर गेल्याने घरातील अनेक स्पर्धक भावूक झाले. पुढील आठवड्यात कसा असणार नवा सदस्यासोबतचा नवा आठवडा ? कोणते सदस्य होणार नॉमिनेट ? कोणकोणते नवे टास्क घरामध्ये रंगणार ? हे बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या आठवड्यात दादूस आणि तृप्ती यांनी VOOT वरील प्रेक्षकांच्या अतरंगी डिमांड पूर्ण केल्या.
Salman Khan Ajay Devgn Movie: रोहित शेट्टीच्या आगामी सिनेमात एकत्र दिसणार सलमान खान आणि अजय देवगन
बिग बॉस मराठीच्या घरात होणार 'या' अभिनेत्रीची एन्ट्री
नीथा शेट्टी–साळवी हिने नुकतीच घारामध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली आहे. आता नीथाच्या येण्याने घरातील समीकरण किती बदलणार ? कोणत्या गृपमध्ये जाणार ? की ती स्वतंत्र तिचा खेळ खेळणार ? असे प्रश्न प्रेक्षकांना पडत आहेत. प्रोमोमध्ये बिग बॉसच्या मंचावर नीथाच्या नृत्याची जलक दिसली होती. तसेच मी बिग बॉसच्या घरात धुमाकुळ घालायला येत आहे, असं देखील नीथा म्हणाली. त्यामुळेच नीथा घरात काय धुमाकुळ घालणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.























