एक्स्प्लोर

Ankita Walawalkar Reacted On Anurag Dobhal Video: 'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...

Ankita Walawalkar Reacted On Anurag Dobhal Video: 'कोकण हार्टेड गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर हिनं सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

Ankita Walawalkar Reacted On Anurag Dobhal Video: प्रसिद्ध युट्यूबर (Famous YouTuber) आणि 'बिग बॉस 17'मध्ये (Bigg Boss 17) झळकलेला अनुराग डोभाल (Anurag Dobhal) सध्या त्याच्या घरगुती वादामुळे भलताच चर्चेत आहे. अनुराग डोभालनं (Anurag Dobhal Accident) सोशल मीडियावर एकापाठोपाठ एक व्हिडीओ शेअर करुन स्वतःच्याच कुटुंबीयांबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यामुळे सारेच हादरुन गेले आहेत. आपल्या व्हिडीओमधून कुटुंबीयांच्या मर्जीविरुद्ध लग्न केल्यामुळे आपला आई-वडील, भावाकडून छळ केला जातोय, असा आरोप अनुरागनं केलाय. एवढंच काय तर, आपल्या पत्नीनंही साथ सोडल्याचं अनुरागनं व्हिडीओत (YouTuber Anurag Dobhal Viral Video) म्हटलंय. यामुळे आपण डिप्रेशनमध्ये आहोत, माझ्या जीवाला काही झालं तर कुटुंब जबाबदार असेल, असंही त्यानं व्हिडीओतून सांगितलंय. अशातच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकरनं प्रसिद्ध युट्यूबर अनुराग डोभालनं शेअर केलेल्या व्हिडीओवर भाष्य केलं आहे. 

'कोकण हार्टेड गर्ल' (Konkan Hearted Girl) म्हणून प्रसिद्ध असलेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Social Media Influencer) अंकिता वालावलकर (Ankita Prabhu Walawalkar) हिनं सोशल मीडियावर एक पोस्ट केलेली. युट्यूबर अनुराग डोभालचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यावर चाहते दुःख व्यक्त करत आहेत. अंकिता वालावलकरनं इन्स्टाग्रामवर अनुराग डोभालचा व्हिडीओ शेअर करत फॉलोअर्सना आवाहन केलंय. 

अंकिता वालावलकर काय म्हणाली? 

अंकिता वालावलकरनं लिहिलंय की, "मी नेहमी एक गोष्ट सांगते...सोशल मीडियावर कोणालाही खूप आनंदी, परफेक्ट आयुष्य जगताना पाहून तुम्ही तुमचं आयुष्य त्यात गुंतवू नका. आम्ही सगळेच आपली एडिट केलेली लाईफ दाखवतो. छान क्षण, हसरे फोटो, ट्रॅव्हल, सेलिब्रेशन हे सगळं तुम्हाला दिसतं. पण त्या मागचं रडणं, ताण, संघर्ष, मतभेद हे सहसा स्क्रीनवर येत नाही..." पुढे बोलताना अंकिता वालावलकर म्हणाली की, "आम्हालाही समस्या असतात. कधी आर्थिक ताण, कधी वैयक्तिक प्रश्न, कधी मानसिक थकवा. फरक इतकाच आम्ही ते सगळं कॅमेऱ्यावर दाखवत नाही. इन्फ्लुएंसरला फॉलो करा, प्रेरणा घ्या, पण आंधळेपणाने नाही. स्वतःची विचारशक्ती जपा. स्वतःच्या आयुष्याला, नात्यांना आणि ध्येयांना प्राधान्य द्या. इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा, स्वतःचं आयुष्य घडवण्यात वेळ गुंतवा. कारण, शेवटी तुमचं वास्तवच तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे..."


Ankita Walawalkar Reacted On Anurag Dobhal Video: 'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...

युट्यूबर अनुराग डोभालचा भीषण अपघात

युट्यूबर आणि 'बिग बॉस'चा माजी स्पर्धक अनुराग डोभालच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. शनिवारी अनुरागनं 150 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगानं गाडी चालवली आणि गाडी चालवतानाच लाईव्ह स्ट्रीम केलं. यावेळी, तो ढसाढसा रडत होता.  त्यानंतर त्यानं जाणूनबुजून 150 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगानं भरधाव धावणारी फॉर्च्युनर हायवेच्या डिव्हायडरवर आदळली. या भीषण अपघातात त्याला गंभीर दुखापत झालीय. सध्या त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Sandeepa Virk Share Tihad Jail Experience: 'दररोज मृत्यूसाठी देवाला साकडं घालायचे...'; तिहार जेलमध्ये शिक्षा भोगून आलेली अभिनेत्री ढसाढसा रडली, आतल्या गोष्टी सांगताना म्हणाली...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss Marathi: महाट्रॉफी, 15 लाख अन्... रितेश भाऊंकडून तन्वी कोलतेला मिळाली खास भेटवस्तू, झाली भावुक
महाट्रॉफी, 15 लाख अन्... रितेश भाऊंकडून तन्वी कोलतेला मिळाली खास भेटवस्तू, झाली भावुक
Sachin Pilgaonkar Madhurani Gokhle: ‘नवरा माझा नवसाचा’नंतर 22 वर्षांनी मोठा धमाका; सचिन पिळगांवकर - मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, नव्या ‘हिरो’ची एंट्री चर्चेत!
‘नवरा माझा नवसाचा’नंतर 22 वर्षांनी मोठा धमाका; सचिन पिळगांवकर - मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, नव्या ‘हिरो’ची एंट्री चर्चेत!
Bigg Boss Marathi 6 Deepali Sayed Post: पाच लाखांची पैशांची बॅग खाली ठेवली; बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली..
पाच लाखांची पैशांची बॅग खाली ठेवली; बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली..
Nandita Patkar Uttarakhand Marriage: मुंबईत कोर्ट मॅरेज केल्यानंतर 44 वर्षीय मराठी अभिनेत्रीचं उत्तराखंडमध्ये विधिवत लग्न; फोटो पोस्ट करत म्हणाली..
मुंबईत कोर्ट मॅरेज केल्यानंतर 44 वर्षीय मराठी अभिनेत्रीचं उत्तराखंडमध्ये विधिवत लग्न; फोटो पोस्ट करत म्हणाली..
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2026: सचिन, सेहवाग, द्रविडसोबत टीम इंडियाकडून टी-20 खेळला, तरीही आयपीएलमधून बाहेर! 'या' क्रिकेटरसोबत असं का घडलं?
सचिन, सेहवाग, द्रविडसोबत टीम इंडियाकडून टी-20 खेळला, तरीही आयपीएलमधून बाहेर! 'या' क्रिकेटरसोबत असं का घडलं?
Rashid Khan: 'आयपीएलच्या 2023 च्या मोसमात मला अफगाणिस्तान सोडून...' राशिद खानचा सनसनाटी खुलासा! नेमकं काय म्हणाला फिरकी स्टार?
'आयपीएलच्या 2023 च्या मोसमात मला अफगाणिस्तान सोडून...' राशिद खानचा सनसनाटी खुलासा! नेमकं काय म्हणाला फिरकी स्टार?
Kolhapur Crime: ऑनलाईन गेमिंगमध्ये लावलेले सगळे पैसे हरला, कोल्हापुरात तरुणाने नैराश्याच्या भरात आयुष्य संपवलं; अवघ्या वर्षभरापूर्वीच वडिलांचे निधन
ऑनलाईन गेमिंगमध्ये लावलेले सगळे पैसे हरला, कोल्हापुरात तरुणाने नैराश्याच्या भरात आयुष्य संपवलं; अवघ्या वर्षभरापूर्वीच वडिलांचे निधन
Hingoli Crime : अनैसर्गिक संबंधांसाठी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाचा तगादा, सततच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं, कळमनुरी हादरलं!
अनैसर्गिक संबंधांसाठी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाचा तगादा, सततच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं, कळमनुरी हादरलं!
Sudhir Mungantiwar vs Kishor Jorgewar: 'हा वाद माझ्या आटोक्याबाहेर'; चंद्रपुरातील मुनगंटीवार-जोरगेवार वादासमोर भाजप प्रदेशाध्यक्षांनी टेकले हात, आता थेट दिल्लीतून होणार फैसला, नेमकं काय घडलं?
'हा वाद माझ्या आटोक्याबाहेर'; चंद्रपुरातील मुनगंटीवार-जोरगेवार वादासमोर भाजप प्रदेशाध्यक्षांनी टेकले हात, आता थेट दिल्लीतून होणार फैसला, नेमकं काय घडलं?
Sanjeev Jaiswal Motilal nagar: 'घरं कशी मिळतात बघतो, तू घुसखोर आहेस का?, इथूनच उचलतो', म्हाडाच्या संजीव जयस्वालांची रहिवाशांच्या बैठकीत मुजोरी
'घरं कशी मिळतात बघतो, तू घुसखोर आहेस का?, इथूनच उचलतो', म्हाडाच्या संजीव जयस्वालांची रहिवाशांच्या बैठकीत मुजोरी
Bigg Boss Marathi 6 Deepali Sayed Post: पाच लाखांची पैशांची बॅग खाली ठेवली; बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली..
पाच लाखांची पैशांची बॅग खाली ठेवली; बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली..
Local Train Accident Dombivli: मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Embed widget