एक्स्प्लोर

Ind vs NZ Final T20 World Cup 2026: फायनलच्या एकदिवसाआधी टीम इंडियाच्या खेळाडूच्या बहिणीचा मृत्यू; कार अपघातामध्ये गमावला जीव, अर्धशतक ठोकताच...

Ind vs NZ Final T20 World Cup 2026: आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने तब्बल 96 धावांनी विजय मिळवला.

Ind vs NZ Final T20 World Cup 2026: आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या (T20 World Cup 2026) अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड (Ind vs NZ Final) यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने तब्बल 96 धावांनी विजय मिळवला. भारताने सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. आयसीसी टी-20 विश्वचषक लागोपाठ दुसऱ्यांदा आणि आजवर तिसऱ्यांदा जिंकणारा टीम इंडिया हा पहिला संघ ठरला. दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्याआधी भारताचा फलंदाज इशान किशनच्या (Ishan Kishan) चुलत बहीणीचं आणि तिच्या पतीचं कार अपघातामध्ये निधन झालं. याबाबत सामना संपल्यानंतर स्वत: इशान किशनने माहिती दिली. मात्र हे सर्व विसरुन इशान किशन मैदानात उतरला आणि आक्रमक अर्धशतक ठोकलं. अर्धशतक झळकावल्यानंतर इशान किशनने आकाशात बघत बहिणीला श्रद्धांजली वाहिली. वैष्णवी सिंह आणि ऋत्विक ठाकूर असं मृत व्यक्तींची नावं आहेत. (Ishan Kishan Sister Death In Car Accident)

विश्वचषक जिंकल्यानंतर इशान किशन काय म्हणाला? (Ishan Kishan On Sister Death)

इशान किशन म्हणाला, फायनलच्या अगदी आधी मी माझ्या चुलत बहिणीला कार अपघातात गमावले. मी तिच्यासाठी खेळलो, मी हार्दिक पांड्यासोबत बोललो आणि त्याने संघाला प्राधान्य देण्यास सांगितले. मी हा विजय तिला समर्पित करतो आणि आज महिला दिन आहे, त्यामुळे तो अधिक खास बनतो, असंही इशान किशन म्हणाला. दरम्यान, इशान किशनने 25 चेंडूत 54 धावा केल्या. यामध्ये 4 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे.

भारताचा डाव कसा राहिला? (Ind vs NZ Final T20 World Cup 2026)

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच्या या सामन्यात भारतानं 20 षटकांत पाच बाद 255 धावांची मजल मारली. सलामीच्या संजू सॅमसननं सलग तिसऱ्या सामन्यात झळकावलेलं वेगवान अर्धशतक भारताच्या या डावाचं प्रमुख वैशिष्ट्य ठरलं. त्यानं 46 चेंडूंत पाच चौकार आणि आठ षटकारांसह 89 धावांची खेळी उभारली. संजू सॅमसननं अभिषेक शर्माच्या साथीनं पहिल्या विकेटसाठी 98 धावांची आणि ईशान किशनच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी रचली. भारताच्या पहिल्या तिन्ही फलंदाजांनी स्फोटक फलंदाजी करून न्यूझीलंडच्या आक्रमणाच्या चिंधड्या उडवल्या. त्यामुळंच भारतीय डावाच्या आठव्या षटकात शतक आणि 15व्या षटकात द्विशतक धावफलकावर लागलं. पण जेम्स नीशामनं 16व्या षटकांत तीन फलंदाजांना माघारी धाडून भारताच्या डावाला ब्रेक लावला. त्याआधी, अभिषेक शर्मानं 21 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांसह 52 धावांची, तर ईशान किशननं 25 चेंडूंत चार चौकार आणि चार षटकारांसह 54 धावांची खेळी केली. त्यानंतर हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांनी मोठे फटके खेळून भारताला पाच बाद 255 धावांचा पल्ला गाठून दिला.

न्यूझीलंडचा डाव कसा राहिला? (Ind vs NZ Final T20 World Cup 2026)

256 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांवर सुरुवातीपासूनच दबाव दिसून आला. टिम सीफर्ट आणि फिन अ‍ॅलन यांनी पहिल्या विकेटसाठी 31 धावांची भागीदारी केली, पण त्यानंतर कीवी संघाची घसरण सुरू झाली. न्यूझीलंडकडून टिम सीफर्टने सर्वाधिक 52 धावा केल्या. त्याने 26 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकार मारले. मात्र संघातील सात फलंदाज एक अंकी धावसंख्येत बाद झाले. केवळ 72 धावांवर न्यूझीलंडचे पाच फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. डॅरिल मिचेलने 11 चेंडूत 17 धावा केल्या, तर कर्णधार मिचेल सॅन्टनरने 35 चेंडूत 43 धावांची झुंज दिली, पण ती संघाला विजय मिळवून देण्यासाठी अपुरी ठरली. भारताकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तर अक्षर पटेलने 3 विकेट्स घेत न्यूझीलंडच्या फलंदाजीचा कणा मोडला.

संबंधित बातम्या:

Gautam Gambhir Ind vs NZ Final T20 World Cup 2026: 2 भारतीय दिग्गजांना मी हा विश्वचषक समर्पित करतो...; गौतम गंभीरचा मास्टरस्ट्रोक, नेमकं काय म्हणाला?

Hardik Pandya-Mahika Sharma T20 World Cup 2026: मिठी मारली, मैदानात हार्दिक पांड्यासोबत नाचली...; पुढे महिकाने जे केलं संपूर्ण ग्राऊंड स्टाफ बघत बसलं, पाहा PHOTO

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

GT vs KKR IPL 2026 : ग्रीनची झुंज फिकी, गिलचा कहर! विजयासाठी आसुसलेल्या कोलकाताच्या नशिबी पुन्हा पराभव, गुजरातची टॉप-4 मध्ये दिमाखात एन्ट्री
ग्रीनची झुंज फिकी, गिलचा कहर! विजयासाठी आसुसलेल्या कोलकाताच्या नशिबी पुन्हा पराभव, गुजरातची टॉप-4 मध्ये दिमाखात एन्ट्री
GT vs KKR Live Update : अहमदाबादमध्ये गिलचं 'चक्रीवादळ'; केकेआरचा पालापाचोळा, गुजरातचा धमाका
GT vs KKR Score IPL 2026 : अहमदाबादमध्ये गिलचं 'चक्रीवादळ'; केकेआरचा पालापाचोळा, गुजरातचा धमाका
Mumbai Indians IPL 2026 : रोहित शर्मावर अन्याय, हार्दिक पांड्याला पहिल्यांदा कर्णधारपदावरून काढून टाका...; भारतीय दिग्गजाचा मुंबई इंडियन्सला थेट इशारा, काय काय म्हणाला?
रोहित शर्मावर अन्याय, हार्दिक पांड्याला पहिल्यांदा कर्णधारपदावरून काढून टाका...; भारतीय दिग्गजाचा मुंबई इंडियन्सला थेट इशारा, काय काय म्हणाला?
Romi Bhinder Fined IPL 2026 : डगआऊटमध्ये मोबाईल वापरला, BCCIने अखेर निकाल लावला; राजस्थान रॉयल्सच्या मॅनेजरवर कडक कारवाई, जाणून घ्या प्रकरण
डगआऊटमध्ये मोबाईल वापरला, BCCIने अखेर निकाल लावला; राजस्थान रॉयल्सच्या मॅनेजरवर कडक कारवाई, जाणून घ्या प्रकरण
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान
Womens Reservation Bill Update : महिला आरक्षण विधेयक नामंजूरवर शिक्का, सरकारला मोठा धक्का
Vidhan Parishad Election : विधान परिषदेत ठाकरेंवरुन आघाडी नाहीतर बिघाडी? Special Report
Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?
Navneet Rana Vs Pyare Khan Special Report : अमरावती परतवाडा प्रकरण, राणा विरुद्ध खान वाद पेटला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हेअरपिन वळणावर भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरवरील नियंत्रण सुटल्याने घसरून दरीत कोसळला; 9 जणांचा जीव गेला, 4 गंभीर जखमी
हेअरपिन वळणावर भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरवरील नियंत्रण सुटल्याने घसरून दरीत कोसळला; 9 जणांचा जीव गेला, 4 गंभीर जखमी
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: आपल्या सर्वांनाच महिलांनी खूप काही शिकवलंय, अगदी पत्नीत्नेही, पण पंतप्रधान आणि मी... राहुल गांधींच्या वक्तव्याने संसदेत हशा पिकला
आपल्या सर्वांनाच महिलांनी खूप काही शिकवलंय, अगदी पत्नीत्नेही, पण पंतप्रधान आणि मी... राहुल गांधींच्या वक्तव्याने संसदेत हशा पिकला
Gold Silver Price: अक्षय्य तृतीया अन् लग्नाची खरेदी करायचा विचार करताय? मग आधी सोन्या-चांदीचे ताजे भाव तपासा; जाणून घ्या आजचे दर!
अक्षय्य तृतीया अन् लग्नाची खरेदी करायचा विचार करताय? मग आधी सोन्या-चांदीचे ताजे भाव तपासा; जाणून घ्या आजचे दर!
LizLaz on Virat Kohli: किंग कोहलीनं फोटो लाईक करताच जर्मनीपासून भारतापर्यंत सोशल मीडियात एकच धुमाकूळ; अखेर त्या मादक माॅडेलनं मौन सोडलं! सूचक वक्तव्य करत म्हणाली..
किंग कोहलीनं फोटो लाईक करताच जर्मनीपासून भारतापर्यंत सोशल मीडियात एकच धुमाकूळ; अखेर त्या मादक माॅडेलनं मौन सोडलं! सूचक वक्तव्य करत म्हणाली..
मुंबईची चर्चा सुरु असतानाच आता दैना झालेल्या केकेआरमध्येही वादळं उठलं, पहिली कुऱ्हाड टीमच्या गुरुजींवर कोसळणार? आयपीएलच्या मध्यावरच दिग्गजाचा दावा, म्हणाला, 'जे बोलतोय ते बुकमार्क करून ठेवा!'
मुंबईची चर्चा सुरु असतानाच आता दैना झालेल्या केकेआरमध्येही वादळं उठलं, पहिली कुऱ्हाड टीमच्या गुरुजींवर कोसळणार? आयपीएलच्या मध्यावरच दिग्गजाचा दावा, म्हणाला, 'जे बोलतोय ते बुकमार्क करून ठेवा!'
Iran War Live Update: ट्रम्प एका तासात सात वेळा खोटं बोलले; इराणचा गंभीर आरोप, ट्रम्पचा प्रत्येक खोडून काढला! युद्धबंदीची आशा वाढली असतानाच पुन्हा नवं संकट
ट्रम्प एका तासात सात वेळा खोटं बोलले; इराणचा गंभीर आरोप, ट्रम्पचा प्रत्येक खोडून काढला! युद्धबंदीची आशा वाढली असतानाच पुन्हा नवं संकट
Scholarship Exam : राज्याच्या शिक्षण विभागाचा अजब अन् असंवेदनशील प्रकार, ऐन उन्हाळ्यात चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा; विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप
राज्याच्या शिक्षण विभागाचा अजब अन् असंवेदनशील प्रकार, ऐन उन्हाळ्यात चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षण परीक्षा परिषदेच्या गोंधळाचा विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप
Women's reservation Bill Shivsena Priyanka Chaturvedi: प्रियांका चतुर्वेदींनी ठाकरे गटाविरोधात पहिलं पाऊल टाकलं, महिला आरक्षण विधेयकाबाबत पक्षविरोधी भूमिका, स्पष्टच म्हणाल्या...
प्रियांका चतुर्वेदींनी ठाकरे गटाविरोधात पहिलं पाऊल टाकलं, महिला आरक्षण विधेयकाबाबत पक्षविरोधी भूमिका, स्पष्टच म्हणाल्या...
Embed widget