Sandeepa Virk Share Tihad Jail Experience: 'दररोज मृत्यूसाठी देवाला साकडं घालायचे...'; तिहार जेलमध्ये शिक्षा भोगून आलेली अभिनेत्री ढसाढसा रडली, आतल्या गोष्टी सांगताना म्हणाली...
Sandeepa Virk Share Tihad Jail Experience: तुरुंगात शिक्षा भोगत असताना अत्ंयत कठीण काळ घालवल्यानंतर अभिनेत्री संदीपा विर्क मुंबईत परतली. अभिनेत्री संदीपा विर्क मनी लाँड्रिंग प्रकरणात तिहार तुरुंगात शिक्षा भोगत होती.

Sandeepa Virk Share Tihad Jail Experience: तुरुंगात शिक्षा भोगल्यानंतर अभिनेत्री संदीपा विर्क (Sandeepa Virk) मुंबईत परतलीय. अशातच तिनं तिहार तुरुंगात (Tihar Jail) तिला भोगाव्या लागलेल्या त्रासाबद्दल सांगितलं. तिनं सांगितलं की, ती तिथे राहण्यास पात्र नव्हती. मुलाखत देताना रडत रडतच अभिनेत्री संदीपा म्हणाली की, ती तिथे दररोज तिला मरण यावं यासाठी देवाकडे प्रार्थना करायची.
तुरुंगात शिक्षा भोगत असताना अत्ंयत कठीण काळ घालवल्यानंतर अभिनेत्री संदीपा विर्क मुंबईत (Mumbai News) परतली. अभिनेत्री संदीपा विर्क मनी लाँड्रिंग प्रकरणात तिहार तुरुंगात शिक्षा भोगत होती. चार महिने तुरुंगवास भोगल्यानंतर तिला जामिनावर सोडण्यात आलं आणि आता ती मुंबईत परतलीय. एका मुलाखतीत संदीपानं तिचा तुरुंगातील अनुभव किती वेदनादायी आणि मानसिकदृष्ट्या त्रासदायक होता, याचं वर्णन केलंय. तुरुंगातील परिस्थिती, वातावरण आणि तिच्या कुटुंबाबद्दल तिनं प्रामाणिकपणे तिचे अनुभव सांगितले आहेत.
भीती आणि तणावात घालवलेले दिवस
अभिनेत्री संदीपा म्हणाली की, तिहार तुरुंग ही अशी जागा आहे, जिथे ती तिच्या शत्रूलाही पाठवू इच्छित नाही. तुरुंगातल्या तिच्या पहिल्या दिवशी तिला विश्वास बसत नव्हता की, तिच्यासोबत असं घडू शकतं. तिनं तुरुंगातील वातावरण विचित्र असल्याचं वर्णन केलं. घाणेरडे टॉयलेट्स, जमिनीवर झोपणं आणि डाळ, भाजी, चार रोट्या आणि भात असं एकाच प्रकारचं जेवण आणि दररोज तीच आणि तशीच दिनचर्या होती.
View this post on Instagram
संदीपा विर्क म्हणाली की, 500 लोकांसोबत राहणं हे अत्यंत तणावपूर्ण आणि किचन पॉलिटिक्सपेक्षा कमी नव्हतं. तुरुंगात तिचा ताण एवढा वाढला की, तिची तब्येत बिघडली. त्यावेळी तिला वाटलेलं की, आता मृत्यू आला तर खूप बरं होईल. अभिनेत्रीनं पुढे बोलताना सांगितलं की, तिचे आई-वडील ज्यावेळी तिला भेटायला यायचे, त्यावेळी तिला सर्वाधिक दुःख व्हायचं. ती स्वतःला दोषी ठरवून त्यांची सारखी माफी मागायची. दरम्यान, तिच्या कुटुंबानं तिला या सर्व परिस्थितीत साथ दिली, असंही तिनं सांगितलं.
अभिनेत्री, इन्फ्लुएंसर आणि कॉस्मेटिक एक्सपोर्ट संदीपा विर्क हिला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ईडीकडून अटक करण्यात आलेली. संदीपा विर्कचे 10 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. संदीपा विर्कला तब्बल 6 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. या प्रकरणात संदीपानं तिहार तुरुंगात चार महिन्यांहून अधिक काळ घालवला. त्यानंतर 2025 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयानं तिला जामीन मंजूर केला. सिमरन जोत मक्कर यांच्या मुलाखतीत संदीपानं दावा केला की, तिनं तुरुंगात असताना मृत्यूसाठी देवाकडे साकडं घातलेलं.
जामीन मिळवल्यानंतर एक नवी सुरुवात
संदीपावर सुमारे 6 कोटींच्या कथित फसवणुकीचा खटला चालवण्यात आला होता. एका गुंतवणूक घोटाळ्यातील पैसे तिच्या खात्यांमधून गेल्याचा आरोप आहे. दरम्यान, उच्च न्यायालयानं मान्य केलं की, ती चार महिन्यांहून अधिक काळ कोठडीत होती आणि मुख्य आरोपी फरार होता. म्हणून, तिला जामीन मंजूर करण्यात आला. तुरुंगातून सुटल्यानंतर, संदीपानं तिला आत भेटलेल्या दोन महिलांना मदत केली. एका महिलेवर 3 हजार रुपयांच्या चोरीचा आरोप होता आणि तिचं घर खूपच वाईट परिस्थितीत होते. तिला दिलेला शब्द पूर्ण करत, संदीपानं तिला जामीन मिळवून देण्यास मदत केली आणि दुसऱ्या महिलेसाठी अंतरिम जामीनही मिळवून दिला. सिनेसृष्टीतील लोकांच्या वृत्तीबद्दल बोलताना तिनं सांगितलं की, अनेक लोकांनी तिला अनफॉलो केलंय, पण तिला त्याचा काही फरक पडत नाही.
संदीपाला कोणत्या प्रकरणात अटक झालेली?
पीटीआयच्या वृत्तानुसार, तक्रारदाराला एका सिनेमात मुख्य भूमिकेचं आश्वासन देण्यात आलं होतं आणि सुमारे 6 कोटी गुंतवण्यास सांगण्यात आले होते. ईडीनं असंही म्हटलंय की, निधी त्याच्या खात्यातून हस्तांतरित करण्यात आला होता. हा निधी संपत्ति अधिग्रहण आणि एका ई-कॉमर्स प्लेटफॉर्मशी संबंधित होती. संपूर्ण प्रकरणात 2008 ते 2013 दरम्यान झालेल्या व्यवहारांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :





















