एक्स्प्लोर

Womens Day 2026 : लेडी धुरंधर - प्रीतशील सिंग डिसुझा

BLOG : दिग्दर्शक आदित्य धरच्या धुरंधर सिनेमाच्या दुसऱ्या भागाची जोरदार चर्चा पुन्हा होऊ लागलेय. या मल्टीस्टारर एक्शन पॅक सिनेमातली पात्रं प्रचंड गाजली. मग तो अक्षय कुमार असो, किंवा राकेश बेदी, रणवीर सिंह असो की मग अर्जुन रामपाल. ही सर्व कॅरेक्टर्स डिझाईन करायचं श्रेय आहे द मेकअप लॅबच्या प्रीतशील सिंग-डिसुझा यांचं. 15 वर्षांहून अधिक त्या कॅरेक्टर डिझाईन करतायत. त्यासाठी त्यांना दोनदा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार ही मिळाला आहे. पहिल्यांदा पंजाबी सिनेमा नानक शाह फाकिर (2014) साठी आणि दुसऱ्यांदा संजय लिला भन्साली यांच्या गंगुबाई काठियावाडी (2022)साठी. शिवाय त्यांच्या नावावर पुष्पा 2, जवान सारखे बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड मोडणारे सिनेमे आहेत. हैदर (2014) सिनेमासाठी त्यांना इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवार्ड्सही मिळालाय. 

प्रीतशील यांनी पंजाब क़लेज ऑफ इंजिनियरींग एन्ड टेक्नॉलॉजी, चंदिगड इथून इलेक््रिकल इंजिनियरची पदवी मिळवली. पाच एक वर्ष इंजिनियर म्हणून काम ही केलं. पण क्रिएटिव्ह कामात जास्त रस होता. त्यामुळं क्रिएटिव्ह स्वप्नांच्या मागे त्या अमेरिकेत पोचल्या. तिथं लॉस एन्जलिस इथल्या सिनेमा मेकअप स्कूलमधून प्रोस्थेटिक मेकअपचं प्रशिक्षण घेतलं आणि आपला क्रिएटिव्ह प्रवास सुरु केला. 

भारतीय सिनेमातल्या इतर क्षेत्रांप्रमाणे मेकअप ही पुरुषप्रधान होतं आणि आज ही आहे. प्रीतशील यांचा भारतीय फिल्म इंडस्ट्रीतला प्रवास हा तसा खडतर आहे. पण त्या इथं आल्या, त्यांनी पाहिलं आणि हे क्षेत्र काबीज ही केलं. स्वताला मेकअप आर्टिस्टपेक्षा कॅरेक्टर डिझाईनर म्हणून त्यांनी सिध्द केलं. 

प्रीतशील सांगतात, सिनेमा क्षेत्रात उभं राहण्यासाठी सर्वात महत्त्वाचा भाग असतो समोरच्या व्यक्तीचा विश्वास. हे फार बेभरवश्याचं क्षेत्रं आहे. पण ज्याने विश्वास संपादन केला तो टिकतो. मग तुम्हाला सतत चांगलंच काम करावं लागतं. एकदा का या इंडस्ट्रीतला तुमच्यावरचा विश्वास बसला की तुम्हाला काम मिळणं सोपं होतं. जसजसं लोक स्वताहून तुमच्याकडे काम घेऊन येतात. तुम्ही नवीन असता तेव्हा मेहनत लागते, सतत काम केल्यानं या मेहनतीचं फळ मिळतंच. 

नानक शाह फाकिर (2014) साठी मिळालेल्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कारानं प्रीतशील सिंग यांचं नाव झालं. त्यानंतर एकापाठोपाठे एक अशी मोठी कामं मिळायला लागली. त्यांनी द मेकअप लॅब या कॅरेक्टर डिझाईन करणाऱ्या कंपनीची स्थापना केलीय. आज बॉलीवुडचे अनेक बिग बजेट त्याच्याकडे आहेत. 

कॅरेक्टर डिझाईन म्हणजे नक्की काय ? तर एखादा सिनेमा बनत असताना त्यातली पात्र नक्की कशी दिसतील, ती पत्रं तयार करण्याचं काम म्हणजे कॅरेक्टर डिझाईन. दिग्दर्शक आणि क्रिएटिव्ह टीमकडून पात्रांसंदर्भातले सर्व डिटेल्स कॅरेक्टर डिझाईन टिमला मिळतात. त्याच्या जोरावर एक-एक पात्रं तयार केलं जाते. ते कसं दिसेल, त्याच्या पेहराव काय असेल, त्याचा मेकअप कसा असेल हे सर्व ठरवण्याचं काम म्हणजे कॅरेक्टर डिझाइन. हे कॅरेक्टर डिझाइन फार महत्त्वाचं असतं. याचा थेट संबंध प्रेक्षकांशी असतो. प्रेक्षकांना एखादं पात्रं आवडण्यामागे, त्याच्याशी कनेक्ट होण्यामागे कॅरेक्टर डिझायनर्सचा हात मोठा असतो. 

अलिकडे गाजलेली सर्वात महत्त्वाची पात्रं घडवण्याचं क्रेडिट प्रीतशील सिंग यांच्याकडे जातं. मग तो जवान मधला पट्ट्यामधला शाहरुख असो किंवा अल्लू अर्जूननं साकारलेला पुष्पा 2 मधला अर्ध नारेश्वर. हे सर्व काम प्रीतशीलचं. अलिकडे त्यांना सर्वात जास्त कौतुक हे धुरंधर (2025) या सिनेमासाठी झालं. त्यातली पात्रं लोकांना फारच आवडली. आता धुंरधर 2 (2026) मध्ये काही नवीन पात्रं प्रीतशील यांनी तयार केलीय. 

अंधेरी वर्सोवाला द मेकअपलॅबच्या ऑफिसमध्ये अनेक आर्टिस्ट बॉलीवुडचे नवनवीन कॅरेक्टर्स तयार करण्यात मग्न असतात. प्रीतशील स्वत: त्यावर लक्ष ठेवून असतात. छावा (2025), ममुटीचा भ्रमयुगम (2023) कल्की 2028 एडी (2024) , जेलर (2023), ओ माय गॉड 2 (2023), घुमर (2023) बंटी और बबली (2021) सारखे सिनेमे आणि  हिरामंडी (2025) राना नायडू (2025) सारख्या वेबसीरीज असे अनेक सिनेमे आज प्रीतशील सिंग यांच्या नावावर आहेत. 

पुरुषांच्या मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात खंबीरपणे टिकून राहणारी आणि उत्तमोत्तम कारम करणारी प्रीतशील सिंग डिसुजा या लेडी धुरंधरच आहेत.

 

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget