एक्स्प्लोर

Ind vs NZ Final T20 World Cup 2026 : फायनलच्या एकदिवसाआधी सचिनचा फोन, विश्वचषक जिंकल्यानंतर संजू सॅमसनने सांगितलं गुपित, सगळं बोलताना भावूकही झाला, काय म्हणाला?

Ind vs NZ Final T20 World Cup 2026 : टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये टीम इंडिया विजेती ठरली असून या ऐतिहासिक विजयात दोन भारतीय खेळाडूंनी मोठी भूमिका बजावली.

Sanju Samson credits Sachin Tendulkar : टी-20 वर्ल्ड कप 2026  (T20 World Cup 2026) मध्ये टीम इंडिया विजेती ठरली असून या ऐतिहासिक विजयात दोन भारतीय खेळाडूंनी मोठी भूमिका बजावली. त्यामुळेच स्पर्धेतील दोन सर्वात मोठे पुरस्कारही त्यांच्या नावावर गेले. संजू सॅमसनला ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ (Sanju Samson 'Player of the Tournament') तर अंतिम सामन्यात चार विकेट्स घेणाऱ्या जसप्रीत बुमराहला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ (Jasprit Bumrah 'Player of the Match') हा पुरस्कार देण्यात आला. भारताला तिसऱ्यांदा विश्वविजेते बनवण्यात या दोघांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले.

संजू सॅमसनने या स्पर्धेत 5 सामन्यांच्या 5 डावांत तब्बल 321 धावा केल्या. त्यामुळे तो या स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. दुसरीकडे जसप्रीत बुमराहने संपूर्ण स्पर्धेत 14 विकेट्स घेतल्या. या दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीमुळेच टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप 2026 वर आपले नाव कोरले.  सुरुवातीच्या अंतिम संघात नसलेला सलामीवीर संजू सॅमसनचे पुरस्कार स्वीकारताना त्याचे डोळे पाणावले होते.  

संजू सॅमसन काय म्हणाला? (Sanju Samson T20 World Cup 2026)

पुरस्कार स्वीकारताना संजू सॅमसन म्हणाला की, “हे खरंच स्वप्नासारखं वाटतंय. खूप, खूप आनंद झाला आहे आणि मी खूप आभारी आहे. शब्दच सुचत नाहीत, भावना व्यक्त करता येत नाहीत. अजूनही हे सगळं घडतंय असंच वाटतंय, त्यामुळे सगळं थोडं अविश्वसनीय वाटत आहे.

सलग तीन सामन्यांतील विजयी खेळीबद्दल काय म्हणाला संजू?

संजू सॅमसन म्हणाला की, खरं सांगायचं तर, ही गोष्ट एक-दोन वर्षांपूर्वीच सुरू झाली होती. 2024 चा विश्वचषक जिंकणाऱ्या संघासोबत मी वेस्ट इंडिजमध्ये होतो, पण मला एकही सामना खेळायला मिळाला नाही. त्या काळात मी सतत कल्पना करत होतो, स्वप्न पाहत होतो आणि स्वतःवर काम करत होतो. त्या वेळी मी मनाशी ठरवलं होतं की मला इतकी मेहनत करायची आहे, की एक दिवस मी असंच काहीतरी करून दाखवेन. देवाच्या कृपेने आज सगळं तसं घडलं.

पुढे तो म्हणाला की, न्यूझीलंड मालिकेनंतर मात्र मी खूप खचून गेलो होतो. मला वाटलं होतं की माझं स्वप्नं संपलं. आता पुढे काय करायचं? पण देवाने कदाचित वेगळंच काही ठरवलं होतं. अचानक मला महत्त्वाच्या सामन्यांमध्ये पुन्हा संधी मिळाली आणि देशासाठी जे शक्य होतं ते मी केलं. त्यामुळे आज मला स्वतःचा अभिमान वाटतो आणि आनंदही होतो की मी त्या स्वप्नांवर विश्वास ठेवण्याचं धैर्य दाखवलं. आणि आज सगळं इतकं सुंदररीत्या घडलं आहे.

सचिन तेंडुलकरचं नाव घेत आजच्या फलंदाजीबद्दल काय म्हणाला संजू? (Sanju Samson credits Sachin Tendulkar) 

 संजू सॅमसन म्हणाला की, खरं सांगायचं तर, भारतीय संघातील अनेक माजी वरिष्ठ खेळाडूंनी मला खूप मार्गदर्शन केलं. गेल्या काही महिन्यांपासून मी सतत सचिन तेंडुलकर सरांच्या संपर्कात होतो. ऑस्ट्रेलियात मी संघाबाहेर बसलो होतो, तेव्हा मला वाटलं की आता योग्य मानसिकता काय असावी? म्हणून मी त्यांच्याशी संपर्क साधला. आमच्यात अनेक गोष्टीवर चर्चा झाल्या. कालही त्यांनी मला फोन करून माझी विचारपूस केली. त्यांच्यासारख्या महान खेळाडूकडून मार्गदर्शन मिळणं, याहून मोठं आणखी काय असू शकतं? त्यांच्या बोलण्यामुळे मला खेळाबद्दलची समज वाढली. ज्यांनी मला साथ दिली, त्या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे.
 
हे ही वाचा -

Ind vs NZ Final T20 World Cup 2026 : विश्वचषक जिंकला अन् संजू, बुमराहबद्दल कर्णधार सूर्याने मनातलं सगळं बोलून टाकलं, कुणाला दिले विजयाचे श्रेय? थेट बोलला

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 Points Table: मुंबई इंडियन्सचा एका विजयाने सगळं चित्र बदललं; आयपीएलच्या Points Table मध्ये उलथापालथ
मुंबई इंडियन्सचा एका विजयाने सगळं चित्र बदललं; आयपीएलच्या Points Table मध्ये उलथापालथ
GT Vs MI IPL 2026 : शेवटी मुंबईचा स्वाभिमान जागा झाला! विजयासाठी आसुसलेल्या 'पलटण'ला तिलक वर्माने दिले बळ; बालेकिल्ल्यात गुजरातचा धुव्वा
शेवटी मुंबईचा स्वाभिमान जागा झाला! विजयासाठी आसुसलेल्या 'पलटण'ला तिलक वर्माने दिले बळ; बालेकिल्ल्यात गुजरातचा धुव्वा
GT vs MI Score IPL 2026 : सलग 4 पराभवानंतर मुंबईचा धमाका; गुजरात टायटन्सचा 99 धावांनी धुव्वा!
सलग 4 पराभवानंतर मुंबईचा धमाका; गुजरात टायटन्सचा 99 धावांनी धुव्वा!
Dasun Shanaka Banned PSL : पाकिस्तानची दादागिरी की जळफळाट? श्रीलंकेच्या कॅप्टनवर घातली बंदी; क्रिकेटविश्वात खळबळ, नेमकं काय घडलं?
पाकिस्तानची दादागिरी की जळफळाट? श्रीलंकेच्या कॅप्टनवर घातली बंदी; क्रिकेटविश्वात खळबळ, नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime news: माणगावच्या लॉजवर सफाई कर्मचाऱ्याने दरवाजा उघडताच दिसलं भयानक दृश्य, तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
माणगावच्या लॉजवर सफाई कर्मचाऱ्याने दरवाजा उघडताच दिसलं भयानक दृश्य, तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Maharashtra Live blog updates: भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलिसांची कारवाई
Maharashtra Live blog updates: भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलिसांची कारवाई
Arvind Kejriwal : दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
SIP : एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
SIP Tips: एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
IPS Transfer : राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
Mahesh Shinde : एकनाथ शिंदेंच्या सभेत आमदार महेश शिंदेंना मोठा धक्का, कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे भाजपमधून शिवसेनेत दाखल
कोरेगावच्या माजी नगराध्यक्षांनी आमदार महेश शिंदेंची साथ सोडली, राजाभाऊ बर्गेंच्या हाती कमळाऐवजी धनुष्यबाण
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
Godfather Fame Actor Al Pacino Life Story: 85 वर्षांचा सुपरस्टार, 32 वर्षांची गर्लफ्रेंड अन् दोन वर्षांचा मुलगा; सिनेसृष्टीच्या 'गॉडफादर'चे अफेअर्सही सतराशे साठ, ओळखलं का कोण?
85 वर्षांचा सुपरस्टार, 32 वर्षांची गर्लफ्रेंड अन् दोन वर्षांचा मुलगा; सिनेसृष्टीच्या 'गॉडफादर'चे अफेअर्सही सतराशे साठ, ओळखलं का कोण?
Embed widget