Bigg Boss Marathi Season 5 : 'चापटी मारली की सणसणीत लगावली', नेमका कसा काढला निक्कीच्या कानाखाली जाळ? आर्या म्हणाली...
Bigg Boss Marathi Season 5 : आर्याने निक्कीच्या कानाखाली नेमकी कशी ठेवून दिली याविषयी तिने खुलासा केला आहे.
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात (Bigg Boss Marathi Season 5) काही दिवसांपूर्वी एक राडा आणि त्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झाली. आर्या जाधवने (Arya Jadhao) एका टास्कदरम्यान निक्कीच्या थोबाडीत लगावून दिली. त्यानंतर शिक्षा करत बिग बॉसने तिची हकालपट्टी केली. दरम्यान आर्याने केलेल्या कृत्यावर सोशल मीडियावर तिला बराच पाठिंबा मिळाला आणि बिग बॉसवर नाराजीही व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं.
सोशल मीडियावर आर्याला पाठिंबा देणाऱ्यांनी तर निक्कीला तू अजून दोन-तीन ठेवून द्यायला हव्या होत्या, असा सल्लाही दिला. तसेच निक्कीला थोबाडीत मारली तो व्हिडीओ दाखवण्याची विनंतीही केली. पण बिग बॉसकडून नियमांचं पालन करत हिंसेचा व्हिडीओ दाखवण्यात आला नाही. मात्र निक्कीला आर्याने थोबाडीत लगावली तरी कशी असा प्रश्न अनेकांना पडलाय. त्यावर आता आर्यानेच उत्तर दिलं आहे.
'मी तिला खूप जोरात ठेवून दिली...'
आर्याने नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. त्यामध्ये तू निक्कीला नेमकं कसं मारलंस? म्हणजे चापटी मारली, ते काही सेकंदात घडलं की सणसणीत ठेवून दिलीस. यावर उत्तर देताना आर्याने निक्कीला सणसणीत ठेवून दिल्याची कबुली दिली. आर्याने म्हटलं की, मी तिला खूप जोरात ठेवून दिली. पण आता मला या गोष्टीची लाज वाटतेय. कारण कुणावरही हात उगारणं चुकीचंच आहे. अर्थात ते काही क्षणात सगळं घडलं. मी तेव्हाही म्हटलं की, मी निक्की नाहीये तर ते माझ्याकडून व्हायला नव्हतं पाहिजे. पण जरी हिंसा चुकीची असली तरीही निक्की ते सगळं डिसर्व्ह करते.
नेमकं काय घडलं?
बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सीचा टास्क रंगला होता. त्यामध्ये घरातल्यांना मोती ताब्यात घेऊन एका सदस्याला कॅप्टन्सीच्या शर्यातीमधून बाद करायचं होतं. त्यावेळी बाथरुमध्ये निक्की आणि आर्याचा वाद सुरु असताना निक्कीने आर्याला धक्का दिला. त्यावर राग अनावर होऊन आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :