Milind Gawali:'आई कुठे काय करते' मालिकेतील मिलिंद गवळींनी लेकीसाठी शेअर केली खास पोस्ट; म्हणाले, 'लेकीबरोबर पुण्यात जाऊन गप्पा...'
नुकतीच मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी त्यांची लेकीसाठी म्हणजेच मिथिला गवळीसाठी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.
Milind Gawali: अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) हे आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेमध्ये अनिरुद्ध ही भूमिका साकरतात. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. मिलिंद हे वेगवेगळ्या विषयांवर आधारित पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकतीच मिलिंद गवळी यांनी त्यांची लेकीसाठी म्हणजेच मिथिला गवळीसाठी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.
मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते मिथिलासोबत वर्क आऊट करताना दिसत आहेत. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, 'व्यवसाय असा शोधा की आयुष्यभर आपल्याला काम करावंच लागणार नाही. राजश्री प्रॉडक्शन आणि दर्शना तांबोळी यांचे खूप खूप आभार माझ्या लेकी बरोबर पुण्यात जाऊन गप्पा मारायची आणि तिच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करायची मला संधी मिळाली, आपण आपल्या मुलांना त्यांच्या लहानपणापासून खूप काही शिकवत असतो, पण आपल्याला कळतच नाही की आपली मुलं कधी मोठी होतात आणि आपल्यालाच त्यांच्याकडून शिकायला लागतं.'
View this post on Instagram
पुढे मिलिंद गवळी यांनी पोस्टमध्ये लिहिलं, 'मुलाखतीमध्ये मिथिला म्हणाली की,मी हे प्रोफेशन यासाठी choose केलं की दिवसभराच्या कामानंतर मला stress नको होता ,तर शांत झोप हवी होती”, ही गोष्ट मी तिला शिकवायची राहून गेली होती, कारण माझ्या उमेदीच्या काळात ही इतकी महत्त्वाची गोष्ट मलाच ठाऊक नव्हती, इतक्या गोष्टी मी आयुष्यात केल्या, पण हा विचार करायचा राहूनच गेला, सुदैवाने ज्या गोष्टीवर माझे इतकं प्रेम आहे, ज्या गोष्टीची मला लहानपणापासून आवड आहे, आणि ते म्हणजे ॲक्टिंग, आणि नकळतपणे त्यालाच प्रोफेशन म्हणून घेतल्यामुळे मला आयुष्यभर छान झोप लागली, असं म्हणतात की दिवसभरात इतकं माणसाने काम करावं की रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या मेल्यासारखी झोप लागायला हवी, आपण पैसे मिळवण्यासाठी एखाद काम निवडतो, आणि पैसे पण भरपूर मिळतात पण खूप स्ट्रेस येऊन माणसाची झोपच उडते, मिथिला शी गप्पा मारून मी खूपच शिकलो, आणि भारावून पण गेलो, हे एवढेस पिल्लू जिला मी तिच्या जन्मा वर अवघ्या 35 मिनिटांत लगेच कुशीत घेतलं होतं, नाजूक कापसाचा गोळा जसा, तिच आता इतकी strong झाली आहे, फक्त फिजिकली physically नाही तर मेंटली mentally सुद्धा. आता जाणीव व्हायला लागली की आता या मुलीला शिकवायची नाही तर तिच्याकडून शिकायची आपल्यालाच गरज आहे. आपलं शरीर सुदृढ असणं, निरोगी असणं किती गरजेचा आहे आणि आपलं शरीरच हा आयुष्याचा प्रवास आपल्याला घडवणार आहे, आणि तो आपल्या आयुष्याचा प्रवास फुल ऑफ एनर्जी full of energy आणि आनंदाने घडत असेल, तर तो सुखकारक नक्कीच होणार, त्यामुळे आपल्या शरीरात नको असलेले एक्स्ट्रा बॅगेज extra baggages काढून टाकणेगरजेचे आहे, आणि ते जर आपल्या ला जमत नसेल , तर मिथिला सारखा एखादा कोचला शोधा, आणि आपल्या आयुष्याच्या नवीन प्रवासाला सुरुवात करा. मी नशीबवान आहे की मला माझा हा कोच coach, माझ्याच घरी सापडला आहे.'
इतर महत्वाच्या बातम्या: