Shoaib Malik And Sana Javed : सानियाला सोबत ठेवून चार लग्नं केली तर गैर काय? अभिनेत्रीचा शोएबला पाठिंबा
Sania Mirza Shoaib Malik And Sana Javed : शोएब-सनाच्या लग्नाला दोन महिने झाल्यानंतर पाकिस्तानी अभिनेत्री हिरा सुमरोने शोएब मलिकला पाठिंबा दिला आहे.
Sania Mirza Shoaib Malik And Sana Javed : पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकने (Shoaib Malik) सानिया मिर्झासोबत (Sania Mirza) काडीमोड घेत सना जावेद (Sana Javed) या पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत विवाहबद्ध झाला. त्यांच्या लग्नाला दोन महिने झाल्यानंतर अजूनही शोएब-सना चर्चेत आहेत. शोएब मलिक आणि सना जावेद यांच्या लग्नावर भारतातूनच नव्हे तर पाकिस्तानमधूनही नाराजीचा सूर उमटला होता. पाकिस्तानमधील सामान्य लोक, पाकिस्तानी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी नाराजी व्यक्त केली होती. सोशल मीडियावरही दोघांचे ट्रोलिंग करण्यात आले.
शोएबवर टीका कशाला?
शोएब-सनाच्या लग्नाला दोन महिने झाल्यानंतर पाकिस्तानी अभिनेत्री हिरा सुमरोने शोएब मलिकला पाठिंबा दिला आहे. एका पॉडकास्टमध्ये बोलताना हिरा सुमराने शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नावर भाष्य केले. एवढा गदारोळ करण्यासारखे शोएबने काय वाईट केलंय असा सवाल तिने केला.
View this post on Instagram
यावर पॉडकास्टच्या होस्टने म्हटले की, शोएबने भारतीय वहिनीला सोडले. त्यामुळे लोक नाराज आहेत. त्यावर हिराने शोएबला पाठिंबा दर्शवताना म्हटले की, लग्न करण्याबाबत त्याचा निर्णय आहे. तो सानिया मिर्झाला सोबत ठेवूनही चार लग्न करू शकत होता असे म्हटले. लोकांना दु:ख कोणत्या गोष्ट वाटते, वहिनीसोबत काडीमोड केला की नवीन वहिनी आणली याचं दु:ख वाटतंय असा उलट सवाल केला. यावर शोच्या होस्टने वहिनी घरी आणली असती तर वाईट वाटलं नसते असे म्हटले.
हिराने पुढे म्हटले की, सानियाने स्वत: खुला घेतला आहे. यावर होस्टने प्रतिप्रश्न करताना म्हटले की, एखादी स्त्री आपल्या मर्जीने खुला घेऊ शकते का? या प्रश्नानंतरही तिने शोएबला पाठिंबा देताना म्हटले की, एखाद्याच्या घरात काय झालंय, सुरू आहे हे आपण सांगू शकत नाही. सानियाने खुला स्वीकारला असेल तर तिला काय हवंय, कदाचित तिलाच शोएब समजला नसेल असेही तिने म्हटले.
युजर्सकडून टीका
हिरा सुमरोच्या या वक्तव्यावर पाकिस्तानमध्ये ती ट्रोल होत आहे. एका युजरने म्हटले की, हिला एका लग्नानंतरही 10-10 गर्लफ्रेंड्स ठेवणे सामान्य वाटते. तर, आणखी एका युजरने ही किती मुर्खासारखी बडबड करतेय असे म्हटले.