एक्स्प्लोर

Sania Mirza Sana Javed : PSL मध्ये सना जावेदला पाहून सानिया मिर्झाच्या घोषणा; अभिनेत्रीने दिलेल्या 'लूक'चा व्हिडीओ व्हायरल

Sana Javed Teased by Audience : भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झासोबत काडीमोड घेत शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत विवाह केला. पाकिस्तानमधील चाहत्यांनाही ही बाब आवडलेली दिसत नाही.

Sana Javed Teased by Audience : पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने (Shoaib Malik) गेल्या महिन्यात पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत (Sana Javed) लग्न केले. त्यांचे लग्न चर्चेचा विषय राहिला. शोएबने आधीची पत्नी आणि भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झासोबत (Sania Mirza) काडीमोड घेतला. सना ही शोएबची तिसरी पत्नी आहे. सानिया मिर्झाला घटस्फोट दिल्यानंतर भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. पाकिस्तानमधील चाहत्यांनाही ही बाब आवडलेली दिसत नाही. क्रिकेट स्टेडिअममध्ये सना जावेदला पाहून एका चाहत्याने सानिया मिर्झाच्या घोषणा दिल्या. त्यावर सनाने रागाने या चाहत्याकडे पाहिले. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

सध्या पाकिस्तान सुपर लीग (PSL 2024) सुरू आहे. या क्रिकेट लीगमध्ये शोएबही खेळत आहे. सना अनेकदा त्याचे सामने पाहण्यासाठी स्टेडियममध्ये दाखल होते. यादरम्यान, एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सनाला पाहून एक चाहता सानिया मिर्झा असे ओरडतो. 

सानिया मिर्झा...सानिया मिर्झा बोलून डिवचले 

इस्टंट बॉलिवूडने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये शोएब मलिकची पत्नी सना जावेद एका छोट्या स्टेजवरून उतरत होती. त्याच वेळी प्रेक्षकांमधून सानिया मिर्झा...सानिया मिर्झा असा आवाज येऊ लागला. 

सना जावेदने दिला रागातला लूक... 

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.  स्टेडिअममध्ये सानिया मिर्झाच्या नावाच्या घोषणा सुरू झाल्यानंतर सना जावेदच्या चेहऱ्याचे हावभाव बदलले. यावर चाहते खळखळून हसत असल्याचा आवाज आला. या व्हिडीओवर युजर्सच्या कमेंट्सा आल्या आहेत. एका युजरने चला, भारत-पाकिस्तान एका मुद्यावर एकाच बाजूला आलेत असे म्हटले. तर एकाने म्हटले की, काम असं करा की भारत-पाकिस्तान मिळून तुम्हाला शिव्या देतील. 

View this post on Instagram
 
A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

जानेवारीत झाले होते शोएब-सना विवाहबद्ध 

शोएब मलिकने 18 जानेवारीला सना जावेदसोबत कराचीमध्ये विवाह केला. या जोडप्याने 20 जानेवारीला याची माहिती दिली. त्यानंतर शोएब आणि सानिया मिर्झाचा घटस्फोट झाल्याचेही समोर आले होते. 2010 मध्ये सानिया मिर्झाने शोएब मलिकसोबत लग्न केले आणि तिला एक मुलगा देखील आहे. सध्या सानिया मिर्झासोबत हा मुलगा आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amol Kolhe : शिरुरमध्ये पोलिंग एजंट बनून सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मनमानी कारभारEknath Shinde on Ghatkopar : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया ABP MajhaGhatkopar Hoarding Accident : मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू, 51 जणांना बाहेर काढण्यात यशEknath Shinde Ghatkopar : घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटना, पालघरची  सभा आटपून एकनाथ शिंदे घटनास्थळी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
Uddhav Thackeray: ''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
Heena Gavit : नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
Embed widget