Mumbai Crime: नायगावमध्ये प्रेयसीने लिव्ह-इनमध्ये राहायला नकार दिला, प्रियकराने आयुष्य संपवलं, मग तिनेही.... प्रेमकहाणीच्या 'एक दुजे के लिए' स्टाईल शेवटाने नायगाव हादरलं
Naigaon couple ends life: तिने लिव्ह-इनमध्ये राहायला नकार दिला, त्याने लोखंडी अँगलला दोर लावून आयुष्य संपवलं, मग प्रेयसीनेही... नायगाव हादरलं, नेमकं काय घडलं?

Mumbai Crime news: मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या नायगावमध्ये एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जितेंद्र वर्मा (वय 24) असे आत्महत्या केल्याचे नाव असून त्याची प्रेयसी (Girlfriend) अल्पवयीन होती. जितेंद्र वर्मा हा नायगावच्या (Naigaon Crime) कोल्ही गावात अरविंद चाळीत राहायला होता. त्याची प्रेयसी शिक्षण घेत होती. जितेंद्रला त्याच्या प्रेयसीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (live in relationship) राहायचे होते. त्यासाठी त्याने प्रेयसीच्या मागे तगादा लावला होता. मात्र, तिने लिव्ह इनमध्ये राहण्यास नकार दिल्याने जितेंद्र (Jitendra Verma) याने घरातील लोखंडी अँगलला गळफास घेऊन आयुष्य संपवले. ही बातमी ऐकून जितेंद्रच्या अल्पवयीन प्रेयसीनेही गळफास (Suicide news) घेतला. या घटनेमुळे नायगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र वर्मा आणि अल्पवयीन मुलीचे गेल्या काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. जितेंद्रला त्याच्या प्रेयसीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे होते. त्यासाठी जितेंद्र प्रेयसीच्या पाठीशी लागला होता. शनिवारी जितेंद्रची प्रेयसी त्याच्या घरी गेली होती. तेव्हादेखील जितेंद्रने तिला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा आग्रह धरला. मात्र, तिने नकार दिला. यावरुन त्यांच्यात वाद झाला. 'तू लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहा, नाही तर मी आत्महत्या करेन', अशी धमकी जितेंद्रने प्रेयसीला धरली. मात्र, जितेंद्रच्या प्रेयसीने त्याचे म्हणणे गांभीर्याने घेतले नाही आणि ती निघून गेली. यामुळे जितेंद्र वर्मा प्रचंड अस्वस्थ झाला होता.
प्रेयसीकडून लिव्ह इनमध्ये राहण्याला नकार मिळाल्याने जितेंद्र वर्मा प्रचंड नैराश्यात गेला. याच नैराश्यातून शनिवारी रात्री जितेंद्र वर्मा याने घरातील लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार समजताच जितेंद्रच्या प्रेयसीला प्रचंड मानसिक धक्का बसला. त्यामुळे तीदेखील नैराश्यात गेली. तिच्या कुटुंबीयांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती या धक्क्यातून सावरु शकली नाही. तिने दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घरातील लोखंडी अँगलला नायलॉनची दोरी अडकवून गळफास घेतला. यामध्ये तिचाही मृत्यू झाला. पोलिसांकडून या घटनेचा पंचनामा करुन पुढील तपास केला जात आहे.
आणखी वाचा






















