Siddhant Kapoor : हे शक्यच नाही...; ड्रग्स प्रकरणात मुलाचं नाव समोर आल्यानंतर शक्ती कपूर यांची पहिली प्रतिक्रिया
शक्ती कपूर (shakti kapoor) यांनी एका मुलाखतीमध्ये प्रतिक्रिया दिली आहे.
Siddhant Kapoor : बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर (shakti kapoor) यांचा मुलगा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor) भाऊ सिद्धांत कपूर (Siddhant Kapoor) याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बंगळुरुमधील एका ड्रग्स पार्टीमध्ये सिद्धांत उपस्थित होता. 5 स्टार हॉटेलमध्ये ही हाय प्रोफाईल पार्टी सुरू होती. या ड्रग्स पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. बंगळुरु पोलिसांनी सिद्धांतला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणावर आता शक्ती कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये शक्ती कपूर यांनी सांगितलं, 'मी फक्त एवढंच सांगू शकतो की, हे शक्य नाही, '
'सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांची वैद्यकिय चाचणी केल्यानंतर त्या सर्वांनी ड्रग्सचे सेवन केल्याचं निष्पन्न झालं', अशी माहिती एका वृत्तसंस्थेला पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. बंगळुरुमधील एका ड्रग्स पार्टीमध्ये सिद्धांत उपस्थित होता. 5 स्टार हॉटेलमध्ये ही हाय प्रोफाईल पार्टी सुरू होती. या ड्रग्स पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. बंगळुरु पोलिसांनी सिद्धांतला ताब्यात घेतलं आहे.
सिध्दांत कपूरने 'शूटआउट अॅट वडाला', 'चेहरे', अग्ली या हिंदी चित्रपटांमध्ये सिद्धांतनं काम केले आहे. त्याने 'भूल भुलैया', 'चुप चुप के', 'ढोल', 'भागम भाग' सारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे. 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या भौकाल या सीरिजमध्ये चिंटू देढा नावाची भूमिका सिद्धांतनं साकारली होती. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर 2020मध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं श्रद्धा कपूरची चौकशी केली होती.
संबंधित बातम्या
- Siddhant Kapoor : शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत पोलिसांच्या ताब्यात; ड्रग्सचं सेवन केल्याचं निष्पन्न
- Happy Birthday Disha Patani : अभिनय नाही तर 'या' क्षेत्रात दिशाला करायचं होतं काम; मॉडलिंगनं करिअरला सुरुवात
-
R Madhavan : आर माधवनच्या 'रॉकेट्री' चित्रपटाचा ट्रेलर झळकला टाइम्स स्क्वेअरवर; व्हिडीओ व्हायरल