एक्स्प्लोर

Vishwas Patil : ‘संभाजी’ कादंबरीतील अंत्यसंस्काराचा उल्लेख काल्पनिक, कोरेगाव भीमा आयोगासमोर विश्वास पाटील यांची कबुली

Vishwas Patil : छत्रपती संभाजी महाराज यांच्या अंत्यसंस्काराबाबत कोणत्याही ऐतिहासिक दस्तऐवजात स्पष्ट उल्लेख आढळत नसल्याची कबुली विश्वास पाटील यांनी कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर दिली.

Vishwas Patil : छत्रपती संभाजी महाराज यांच्या अंत्यसंस्काराबाबत कोणत्याही ऐतिहासिक दस्तऐवजात स्पष्ट उल्लेख आढळत नसल्याची कबुली लेखक विश्वास पाटील (Vishwas Patil) यांनी कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर दिली. तसेच त्यांच्या ‘संभाजी’ (Sambhaji) या कादंबरीतील जना परीटिण, गोविंद नाक, दामाजी पाटील आणि पाटलीण यांसारखी पात्रे काल्पनिक असल्याचेही त्यांनी उलटतपासणीत मान्य केले.

कोरेगाव भीमा प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगासमोर शुक्रवारी दिवसभर सुनावणी झाली. राज्य शासनाचे विशेष सरकारी वकील अॅड. शिशिर हिरे यांनी विश्वास पाटील यांची सविस्तर उलटतपासणी घेतली. या वेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना पाटील यांनी त्यांच्या कादंबरीतील अनेक उल्लेख काल्पनिक असल्याचे स्पष्ट केले.

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'संभाजी' या कादंबरीतील महाराजांच्या अंत्यविधीवरील कथनावरून महाराष्ट्रात वाद निर्माण झाले होते. काही गटांनी महाराजांचा अंत्यविधी विशिष्ट व्यक्तीने केला अशी भूमिका घेऊन दोन समुदायांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर 1 जानेवारी 2018 रोजी पुणे जिल्ह्यात कोरेगाव येथे दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती, ज्याची चौकशी सध्या सुरू आहे.

Vishwas Patil: अंत्यसंस्काराचा कोणत्याही ऐतिहासिक दस्तामध्ये उल्लेख नाही

उलटतपासणीदरम्यान अॅड. शिशिर हिरे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विश्वास पाटील म्हणाले की, “संभाजी महाराजांच्या अंत्यसंस्काराबाबत कोणत्याही ऐतिहासिक दस्तऐवजात स्पष्ट उल्लेख आढळत नाही. ‘संभाजी’ या कादंबरीतील जना परीटिण, गोविंद नाक, दामाजी पाटील आणि पाटलीण ही पात्रे पूर्णपणे काल्पनिक आहेत.” संभाजी ही कादंबरी भूभाग आणि काही तथ्य यावर आधारित कल्पना विलास आहे, असे पाटील यांनी सांगितल्याची माहिती अॅड. हिरे यांनी दिली. तसेच कादंबरीतील लिखाणाचा गैरवापर करून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल, तर तो निषेधार्ह असल्याचेही विश्वास पाटील यांनी उलटतपासणीदरम्यान नमूद केले, अशी माहिती अॅड. शिशिर हिरे यांनी दिली आहे. तसेच, जेधे शकवली, मासीरे आलमगिर, ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, खाफी खान या तत्कालीन इतिहासकारांचा उल्लेख करत विश्वास पाटील यांच्या 'संभाजी' कादंबरीमधील कल्पनाविलासाचा फोलपणा कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर मांडण्यात आला.

आणखी वाचा 

LPG Gas Shortage: केंद्र सरकारने व्यावसायिक LPG चा गॅसपुरवठा थांबवला, देशातील हॉटेल, रेस्टॉरंट इंडस्ट्री ठप्प होण्याची भीती

शूट लांबलं अन् प्रेमात पडली...सोनाली खरेचा नवरा खरोखरच तिच्यापेक्षा 27 वर्षांनी मोठा? अभिनेत्रीने सगळंच सांगून टाकलं..

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget