एक्स्प्लोर

'अशा मुलींच्या अंगप्रदर्शनामुळेच भारतामध्ये तरुणींवर बला#* होतात', बॉलिवूड अभिनेत्रीच्या बोल्ड लूकवर प्रसिद्ध रॅपरचं वादग्रस्त वक्तव्य, video व्हायरल

या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर वाद उफाळला आहे. अनेक जण त्याच्यावर असंमवेदनशील वक्तव्य केल्याबद्दल टीका करत आहेत.

Khushi Mukharjee controversy: बॉलीवूड अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर खुशी मुखर्जी बोल्ड लुकवर एका प्रसिद्ध रॅपरने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 'अशा मुलींमुळे भारतात जास्त रेप होतात' असे वक्तव्य या गायकाने केले आहे.  रॅपर सँन्टी शर्मा याने त्याचा instagram वर खुशी मुखर्जीचा बोल्ड लुक शेअर करत त्यावर हे वक्तव्य केले आहे. सोशल मीडियावर लहान मुलंही असतात. सोशल मीडियावर सगळ्यांसमोर असे कपडे दाखवणं चुकीचं असल्याचंही त्याने म्हटलं.
या वक्तव्याने सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली असून अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे. अनेकांनी रॅपरच्या असंवेदनशील कमेंटवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केले आहेत. अनेकांनी त्याला 'व्हिक्टिम ब्लेमिंग ' करत असल्याचे म्हटले आहे. (Santy Sharma)

नेमका प्रकार काय ?

अभिनेत्री खुशी मुखर्जीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका बोल्ड फोटो आणि व्हिडिओवरून रॅपर सॅन्टी शर्मा याने सोशल मीडियावर व्हिडिओ टाकत वादग्रस्त वक्तव्य केले.  तो म्हणाला, " अशा मुलींमुळे भारतात बलात्कार जास्त होतात. सोशल मीडियावर लहान मुलंही असतात, त्यामुळे आपण असा कंटेंट पोस्ट केला पाहिजे जो सभ्य आणि समाजासाठी योग्य असेल. प्लॅटफॉर्म्स आणि जबाबदार लोकांनीही याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

"सोशल मीडियावर उघडपणे असे कपडे दाखवणं योग्य नाही, कारण ते लहान मुलंही पाहतात. अशा कंटेंटवर कडक नियम आणि नियंत्रण असणं आवश्यक आहे. दीदी, आपल्याला विनंती आहे की आपल्या येणाऱ्या पिढीचं भविष्य खराब करू नका.” असेही तो म्हणाला. त्याने खाली इन्कलाब झिंदाबाद असा # वापरला आहे .

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Santy Sharma (@santy_sharma_official)

सोशल मीडियावर रंगली चर्चा

या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर वाद उफाळला आहे. नेटकरी रॅपर सॅन्टी शर्माच्या या पोस्टवर कमेंट करताना दिसत आहेत. अनेक जण त्याच्यावर असंमवेदनशील वक्तव्य केल्याबद्दल टीका करत आहेत. कुणी काय घालावं आणि काय नाही हे ठरवण्याचा अधिकार हा त्या व्यक्तीचा असतो. असं काहींनी म्हटलं. तर काहींनी त्याच्या वक्तव्याला समर्थन देत सांस्कृतिक प्रभाव आणि सोशल मीडिया कंटेंट यावर चर्चा होणे गरजेचे असल्याचे म्हटलं.

कोण आहे ख़ुशी मुखर्जी ?

खुशी मुखर्जी ही बॉलीवूड अभिनेत्री मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्ल्युअन्सर आहे. ती MTV Splitsvilla 10, तसेच लव स्कूल 3 या लोकप्रिय रियालिटी शो मधून चर्चेत आली. तिने काही साउथ इंडियन आणि हिंदी चित्रपटांमध्ये ही काम केले आहे. तिच्या बोर्ड फॅशन स्टाईल आणि वेब सिरीज मधील भूमिकांची कायम चर्चा होत असते.

महत्त्वाच्या बातम्या

Jayanti 2 Marathi Movie: 'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री
'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री
Nauheed Cyrusi on Miscarriages: 'मौला मेरे मौला' फेम अभिनेत्री का आई होऊ शकली नाही? म्हणाली, 2 वेळा गर्भपात; तिसऱ्या महिन्यांतच बाळाच्या हृदयाचे ठोके....
'मौला मेरे मौला' फेम अभिनेत्री का आई होऊ शकली नाही? म्हणाली, 2 वेळा गर्भपात; तिसऱ्या महिन्यांतच बाळाच्या हृदयाचे ठोके....
Amol Kolhe On Savitribai Jyotiba Phule Serial: TV वरुन गाशा गुंडाळला, पण युट्यूबर येताच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं; 'सावित्रीबाई जोतीराव फुले'बाबत अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
'टीआरपीपेक्षा प्रेक्षकांचं प्रेम महत्त्वाचं...'; 'सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेबाबत अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
Devoleena Bhattacharjee: पुराच्या पाण्यात अडकली आई, आजी-मावशीचं घर बुडालं; निसर्गाचा विध्वंस पाहून प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला रडू कोसळलं
पुराच्या पाण्यात अडकली आई, आजी-मावशीचं घर बुडालं; निसर्गाचा विध्वंस पाहून प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला रडू कोसळलं

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
Tukaram Mundhe Marathi News: तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
Embed widget