![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
R Madhavan : आर माधवनच्या 'रॉकेट्री' चित्रपटाचा ट्रेलर झळकला टाइम्स स्क्वेअरवर; व्हिडीओ व्हायरल
‘रॉकेट्रीः द नंबी इफेक्ट’ (Rocketry) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
![R Madhavan : आर माधवनच्या 'रॉकेट्री' चित्रपटाचा ट्रेलर झळकला टाइम्स स्क्वेअरवर; व्हिडीओ व्हायरल r madhavan film rocketry the nambi effect trailer shown on times square bill board R Madhavan : आर माधवनच्या 'रॉकेट्री' चित्रपटाचा ट्रेलर झळकला टाइम्स स्क्वेअरवर; व्हिडीओ व्हायरल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/13/91b88f6d3841590f4c37041c35f98b3b_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
R Madhavan : बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेता आर माधवनचा (R Madhavan) ‘रॉकेट्रीः द नंबी इफेक्ट’ (Rocketry) हे आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचे कथानक भारतीय शास्त्रज्ञ नंबी नारायण (Nambir Narayan) यांच्या जीवनावर आधारित आहे. आर माधवन या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार असून तो या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन देखील करणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर टाइम्स स्क्वेअरच्या बिलबोर्डवर झळकला.
नुकताच आर माधवननं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये टाइम्स स्क्वेअरवर 'रॉकेट्री' चित्रपटाचा ट्रेलर दिलत आहे. व्हिडीओमध्ये आर माधवनसोबतच नंबी नारायण हे देखील दिसत आहेत. व्हिडीओ शेअर करुन आर माधवननं त्याला कॅप्शन दिलं, 'टाइम्स स्क्वेअरच्या बिलोबर्डवर रॉकेट्रीचा ट्रेलर लाँच'.आर माधवननं शेअर केलेल्या व्हिडीओला अभिनेत्री ईशा देओल आणि अभिनेता रोहित रॉय यांनी कमेंट करुन शुभेच्छा दिल्या. तसेच आर माधवनच्या चाहत्यांनी देखील या व्हिडीओला लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
‘रॉकेट्रीः द नंबी इफेक्ट’ हा चित्रपट 1 जुलै रेजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि इंग्रजी या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये रॉकेट्री चित्रपटाचा प्रीमियरही झाला. त्यामुळे या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत.
संबंधित बातम्या
- Janhit Mein Jaari : नुसरत भरुचाच्या 'जनहित में जारी'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी केली फक्त 43 लाखांची कमाई
- Marathi Serial : मराठी मालिकांत लगीनघाई; आज नेहा-यश अडकणार लग्नबंधनात
- India’s Laughter Champion : 'इंडियाज लाफ्टर चॅम्पियन' प्रेक्षकांच्या भेटीला; 'द कपिल शर्मा'ला केले रिप्लेस
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)