Pushpa 2 Box Office Collection Day 37: आता अल्लू अर्जुन नाही, बॉक्स ऑफिसवर राम चरणचा ताबा; 37व्या दिवशी 'पुष्पा 2' गळपटला, किती कमावले?
Pushpa 2 Box Office Collection: आता पुष्पा 2 चा बॉक्स ऑफिसवरचा ताबा हळूहळू सुटत चालला आहे. अल्लू अर्जुन स्टारर पुष्पा आता बॉक्स ऑफिसवर गटांगळ्या खात असल्याचं पाहायला मिळत आहे.
Pushpa 2 Box Office Collection Day 37: 'पुष्पा 2' (Pushpa 2 The Rule) 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून तब्बल एक महिन्याहून अधिक काळासाठी बॉक्स ऑफिसवर (Box Office) त्याचाच प्रभाव पाहायला मिळाला. पण, आता मात्र, हळूहळू पुष्पाचा प्रभाव कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरीदेखील पुष्पा 2 (Pushpa 2) दररोज नवनवे विक्रम आपल्या नावे करत आहे. रिलीज झाल्यापासून आतापर्यंत अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 चं शुक्रवारच्या कलेक्शनचे आकडे शानदार राहिले आहेत. दरम्यान, हॉलिवूडचा मुफासा आणि बॉलिवूडचा बेबी जॉन सारखे अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित झाले, पण, तेदेखील पुष्पाला बॉक्स ऑफिसवरुन हटवू शकले नाहीत. या चित्रपटांचाही पुष्पा 2 च्या कलेक्शनवर कोणताही विशेष परिणाम झाला नाही.
पण, आता हळूहळू पुष्पाचा बॉक्स ऑफिसवरचा ताबा सुटत चालला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 10 जानेवारी म्हणजेच, शुक्रवारी पुष्पा 2 च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचा आकडा पहिल्यांदाच कमकुवत दिसला. पुष्पा 2 प्रदर्शित होऊन 37 दिवस उलटले. त्यानंतर आता पुष्पा 2 च्या कमाईत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. बॉक्स ऑफिस ट्रॅकर सॅक्निल्कच्या मते, चित्रपटानं आतापर्यंत भारतात 1213 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. पण, आज चित्रपटाच्या कलेक्शनचा आकडा मात्र, अत्यंत निराशाजनक असल्याचं पाहायला मिळालं.
View this post on Instagram
गेम चेंजरनं 'पुष्पा 2' ला नमवलं
राम चरणचा गेम चेंजर हा चित्रपटही आज प्रदर्शित झाला आहे. शंकर दिग्दर्शित या चित्रपटानं पहिल्या दिवशी 51.25 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. तर पुष्पा 2 नं आज जेमतेम एक कोटींचा टप्पा ओलांडला आहे. पुष्पानं फक्त 1.15 कोटी रुपये कमावले आहेत.
पुष्पा 2 ची आतापर्यंतची सर्वात कमी सिंगल डे कमाई
सॅक्निल्कच्या मते, रात्री अकरा वाजेपर्यंत पुष्पा 2 नं आतापर्यंत 37व्या दिवशी फक्त 1.15 कोटींची कमाई केली आहे. जी आजवरच्या चित्रपटाच्या कलेक्शनची सर्वात कमी कमाई आहे.
सोनू सूदच्या फतेहचं बॉक्स ऑफिस कलेक्शन पुष्पा 2 पेक्षा जास्त
सोनू सूदचा हाय ऑक्टेन अॅक्शन चित्रपट 'फतेह' देखील काल (शुक्रवारी) प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाचं पहिल्या दिवसाचं कलेक्शन अपेक्षेपेक्षा जास्त आहे. या चित्रपटानं आतापर्यंत 2.45 कोटी रुपये कमावले आहेत. पुष्पा 2 हा चित्रपट पहिल्यांदाच एका छोट्या चित्रपटाच्या मागे पडला.
बेबी जॉन आणि मुफासा सारखे मोठे चित्रपटही अल्लू अर्जुनच्या चित्रपटाशी स्पर्धा करू शकले नाहीत. आणि आता जेव्हा सोनू सूदचा कमी प्रमोशन आणि कमी बजेटचा चित्रपटही पुष्पापेक्षा जास्त कमाई करत असल्याचं पाहायला मिळत आहे. यावरुनच स्पष्ट होतंय की, दीड महिन्यांपासून बॉक्स ऑफिसचा ताबा स्वतःकडे ठेवलेल्या पुष्पा 2 चं वादळ आता क्षमत चाललं आहे.
दरम्यान, पुष्पा 2 कदाचित 37 व्या दिवशी कमकुवत झाला असेल, पण याचा अर्थ असा नाही की, चित्रपट त्यापेक्षा लहान होतो. हा चित्रपट आधीच देशातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर बनला आहे. हा चित्रपट सर्वाधिक ओपनिंग, सर्वाधिक कमाई करणारा वीकेंड चित्रपट ठरला आहे. तसेच, कोणत्याही भाषेतील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट बनला आहे.