एक्स्प्लोर

Karmaveer Bhaurao Patil: कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर; 'हा' दिग्गज अभिनेता साकारणार अण्णांची भूमिका

Karmaveer Bhaurao Patil Biopic : राज्यातील बहुजनांपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जीवनपट उलगडून दाखवणारा "कर्मवीरायण" प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Karmaveer Bhaurao Patil Biopic :  महाराष्ट्रातील खेडापाड्यातर, बहुजन-वंचित समाजामध्ये शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवण्याचा प्रयत्न करणारे कर्मवारी भाऊराव पाटील (Karmaveer Bhaurao Patil) यांचा  जीवनपट आता रुपेरी पडद्यावर साकारणार आहे. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कर्मवीर अण्णांनी राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. कर्मवीरांचा जीवनपट मांडणाऱ्या  "कर्मवीरायण" या चित्रपटाने अनेक चित्रपट महोत्सव गाजवल्यानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

लहान वयातच महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रभाव भाऊराव पाटील यांच्यावर पडला होता. भाऊराव पाटील हे महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचे महत्त्वाचे सदस्य होते.  भाऊराव पाटील यांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखून ग्रामीण भागात शिक्षण संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या काळात समाजात वर्चस्ववाद बोकाळला होता. त्यामुळे गरीब आणि बहुजनांची मुले शिक्षणापासून वंचित राहत होती. त्या मुलांनाही शिकण्याचा समान हक्क आहे असा भाऊराव पाटील यांचा ठाम विचार होता. त्या काळी अनेक लोकांनी भाऊरावांना विरोध केला. मात्र विरोधाला ज जुमानता शिक्षणाच्या प्रसाराचं कार्य सुरूच राहिलं आणि विविध शिक्षण संस्था उभ्या राहिल्या. शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणेच ग्रामीण भागातील विद्यार्थीही शिक्षणाकडे वळू लागले. त्यामुळेच ग्रामीण भागातील साक्षरतेचे प्रमाण वाढण्यास मदत झाली. महाराष्ट्राला शिक्षणाच्या मार्गावर नेणारे भाऊराव कर्मवीर झाले. शिक्षणासाठी धडपडणाऱ्या एका ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाचा जीवनपट आता चित्रपटाद्वारे पाहता येणार आहे.

कर्मवीर भाऊराव पाटलांची भूमिका कोण साकारणार?

महाराष्ट्राच्या खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गरीब, गरजू, कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र आता मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेते किशोर कदम यांनी कर्मवीरांची भूमिका साकारली आहे. अनेक महोत्सवांमध्ये गौरवलेला हा चित्रपट आता 17 मे पासून महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. कर्मवीर अण्णांच्या जीवनातील काही निवडक प्रसंग आणि घटना यांचा समावेश या चित्रपटात करण्यात आला आहे.

चित्रपटात दिग्गज कलाकारांचा समावेश... 

ट्रान्सएफएक्स स्टुडिओज प्रा. लि. यांनी निर्मिती केलेल्या "कर्मवीरायण" चित्रपटाची प्रस्तुती 7 वंडर्सचे पुष्कर मनोहर यांनी केली आहे. धनंजय भावलेकर यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. अनिल सपकाळ आणि धनंजय भावलेकर यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. किशोर कदम, सुहास शिरसाट, उपेंद्र लिमये, देविका दफ्तरदार, उषा नाईक अशा दिग्गज कलाकारांचा समावेश या चित्रपटात असणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Mangalprabhat Lodha आचारसंहितेचा भंग करतायत, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा आरोपABP Majha Headlines : 11 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सLok Sabha Elections 5th Phase Special Report : मुंबईतल्या 6 जागांवर कोण वरचढ ठरणार?Mumbai Lok Sabha Elections : शिवसेना दुभंगल्यानंतरची पहिली निवडणूक, मुंबईमध्ये कुणाचा झेंडा फडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
Embed widget