Gehraiyaan twitter review: दीपिकाचं कमबॅक चाहत्यांसाठी ठरलं मनोरंजनाची मेजवानी! पाहा नेटकरी काय म्हणतायत...
Gehraiyaan twitter review: सोशल मीडियावरील प्रतिसाद पाहता दीपिकाच्या 'अलिशा' भूमिकेचे कौतुक होत आहे. 'जैन'ची भूमिका करणाऱ्या सिद्धांत चतुर्वेदीसोबतच्या तिच्या केमिस्ट्रीवरही कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Gehraiyaan twitter review : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'Gehraiyaan' अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे. बरेच दिवस चाहते या चित्रपटाची वाट पाहत होते. दीपिका पदुकोण-सिद्धांत चतुर्वेदी व्यतिरिक्त या चित्रपटात अनन्या पांडे (Ananya Panday) आणि धैर्य करवा (Dhairya Karwa) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शकुन बत्रा यांनी केले आहे.
'Gehraiyaan' ही आधुनिक काळातील प्रेमकथा आहे, जी प्रेक्षकांसमोर प्रेम आणि नात्यांची वेगळी बाजू मांडते. OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपटाच्या प्रीमियरनंतर, प्रेक्षकांनी तो आवर्जून पाहिला आणि त्यावर आपले विचार मांडण्यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेतला.
प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद
सोशल मीडियावरील प्रतिसाद पाहता दीपिकाच्या 'अलिशा' भूमिकेचे कौतुक होत आहे. 'जैन'ची भूमिका करणाऱ्या सिद्धांत चतुर्वेदीसोबतच्या तिच्या केमिस्ट्रीवरही कौतुकाचा वर्षाव होत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या दीपिका-सिद्धांतच्या इंटिमेट सीन्सने आधीच सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. चित्रपट पाहिल्यानंतर चाहत्यांनी म्हटले की, त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री चांगली दाखवण्यात आली आहे. चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल्याबद्दल दोन्ही कलाकारांचे कौतुक होत आहे.
चित्रपटाची कथा नवी आणि हटके असून, पार्श्वसंगीत कथेला वेगळा आयाम देत असल्याचे ट्विटर वापरकर्त्यांनी म्हटले आहे. प्रेक्षकांच्या मते अनन्या पांडेच्या अभिनयालाही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, तर ‘न्यू कमर’ धैर्य करवाच्या अभिनयाचेही कौतुक होत आहे.
एका नेटकऱ्याने या चित्रपटाबद्दल लिहिताना म्हटले की, ‘या चित्रपटाने अजिबात निराश केले नाही. मला वाटते की 'पिकू' नंतरचा हा दीपिकाचा सर्वोत्तम परफॉर्मन्स आहे. सिद्धांत आणि अनन्याने माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त चांगले काम केले. नेहमीप्रमाणेच नसीरुद्दीन शाह देखील कमाल वाटले!’
पाहा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया :
काही प्रेक्षकांना चित्रपटाची कथा आणि निर्मात्यांची संकल्पना आवडलेली नाही. या चित्रपटाबद्दल आपली निराशा व्यक्त करण्यासाठी देखील प्रेक्षकांनी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे.
हेही वाचा :
- Shamshera : दरमदार टीझरसह रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’ची रिलीज डेट जाहीर, संजय दत्तही दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
- 'व्हॅलेंटाईन डे' च्या दिवशी प्रेक्षकांना गिफ्ट ; ‘नको हा बहाणा’ हा म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला
- Rashmika Mandanna : थिएटरमध्ये बसून रश्मिका मंदान्ना शिट्टी वाजवते तेव्हा...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha